September 8, 2024
Beating for prostitution at the hotel
Home » हॉटेलवर देहविक्री करण्यासाठी मारहाण
मुक्त संवाद

हॉटेलवर देहविक्री करण्यासाठी मारहाण

जॉन भाईंना तनिषाची कुंटणखाण्यापर्यंत आलेली सर्व माहिती हवी होती म्हणून आम्ही तिने सांगितलेल्या वेळेनुसार कामाठीपुरा येथील कुंटणखाण्यात पोहचलो. तर तिथे भयानक चित्र आम्हाला पहायला मिळाले. इथे आम्ही यापूर्वी येऊन गेलो होतो. तेथील देहविक्री करणाऱ्या महिलांशी गप्पा मारल्या होत्या.

तनिषाला तिच्या प्रियकराने मारले तेव्हाची त्यांच्यातील संवेदनशीलताही पाहिली होती. तनिषाला कुशीत घेऊन याच तिच्यासोबतच्या देहविक्री करणाऱ्या महिला तिला समजावून सांगत होत्या. मोठ्या बहिणीच्या प्रेमाने तिच्या पाठीवर हात फिरवत माया देत होत्या. मात्र याच महिला आज तनिषाला मारझोड करतानाच चित्र आमच्या समोर घडत होत. खरं काय अन खोटं काय हे काहीच कळत नव्हतं. ज्या महिलांनी तनिषाला एवढं प्रेम दिलं. त्याच महिला मारझोड करणाऱ्या याच का? असं वाटून गेलं;परंतु वस्तुस्थिती तीच होती. महिला त्याच होत्या. मार खाणारी तनिषाही तीच होती. त्यांच्या मारामुळे तनिषाचा गालही सुजलेला दिसत होता.

आम्ही कुंटणखाण्यात पोहचलो. आम्हाला पाहून मारझोड करणाऱ्या महिला बावचळल्या. एकमेकीत कुजबूज सुरु झाली.त्यातील एकीने तनिषाला जोरदार शिवी हासडली. म्हणाली,
तू काय स्वतःला देव समजतेस का? रोज तेच काम तू करतेस ना? आता तुला कोण राजकुमार न्यायला येणार आहे का? रोज तू तंगड्या फाकून इथे करतेस तेच तुला हॉटेलवरही करायचे होते ना? तेरी मा की….साली तू रंडी है ना…तू रंडीही रहेगी।

हे तनिषाला बोलणारी महिला कुंटणखाना चालविणारी महिला होती.तिने रागाने सोबतच्या इतर सगळ्या महिलांकडे कटाक्ष टाकला आणि त्यांना सांगितलं तुम्ही सगळ्याजणी आतमध्ये जा. त्या सगळ्याजणी आपापल्या रूममध्ये आत गेल्या. बाहेर कुंटणखाना चालविणारी महिला त्या सर्वजणी आतमध्ये गेल्यावर पाय सोडून खुर्चीवर बसली. पदराने चेहऱ्यावर आलेला घाम पुसत पुन्हा तनिषाकडे रागाने बघू लागली. तनिषा एका कोपऱ्यात बसून श्वास घुसमटेपर्यंत रडत होती.

तिच्याकडे बघत ती कुंटणखाना चालविणारी महिला पुन्हा रागात म्हणाली, “तू पण आतमध्ये जाणार आहेस का…की या जॉन भाईंसमोर पुन्हा तमाशा करणार आहेस”.

हे ऐकताच जॉन भाई त्या महिलेला मध्ये थांबवत म्हणाले, “बसू दे तिला तिथेच.” हे ऐकताच ती महिला आमच्याकडे पाहू लागली आणि म्हणाली,”जॉन साहब, आप तो गलत वक्त पर इधर आ गये।” जॉन भाईनी ते बोलणं ऐकून तिला थांबवत ते म्हणाले, “असू दे,हीच वेळ माझ्यासाठी महत्त्वाची आहे. हे ऐकून ती महिला बावरली, थोडी संकोचली”.

एवढ्यात जॉन भाईनी तिला विचारलं काय झालं? तनिषाला सगळ्या मिळून एवढी मारझोड का करत होत्या? हे ऐकून ती महिला म्हणाली, “साहेब,काय सांगू तुम्हाला?या मुलीला पैसे कमावण्याची संधी आली तरी तिला पैसा नको झाला.कम नशिबवाली ही औरत आहे ही.हिला एका रात्रीसाठी हॉटेलवर जाण्याची ऑफर आली होती.ती गेली असती तर पुढील काही दिवसांची हिची चांदी झाली असती.एक रात के लिये बहुत चंदा मिलता है ऐसे कम उमर वाली लडकियोंको।”

कुंटणखाना चालविणाऱ्या त्या महिलेकडे तिच्या या बोलण्यावर जॉन भाईंनी प्रश्नार्थ नजरेने पाहिले, तेव्हा ती म्हणाली, “एकदा या अशा कम उमरवाली लडकीने चांगली सेवा दिली, तर त्या हॉटेलवरून पुन्हा पुन्हा अशा मुलींना इथून बोलवलं जात, अनेक पुरुषांची रात्र सजविण्यासाठी”.

त्यावेळी जॉन भाई म्हणाले,” पण यात तुम्हाला आणि इथल्या इतर महिलांना याचा उपयोग काय?” हॉटेलवर देहविक्री करून ती पैसे कमवणार. यावर ती महिला म्हणाली, “साहब असं नाहीय.आमच्याकडून जी महिला हॉटेलवर सेवा द्यायला जाईल तेव्हा तिच्या एका रात्रीच्या बोलीवर जे पैसे तिला मिळतात. त्यातील काही वाटा हा इथल्या कुंटणखाना चालविणाऱ्या मालकाचा असतो व हॉटेलवर गेलेल्या पोरीने तेथील ग्राहकाला उत्तम सेवा दिली, तर हॉटेलवरून पुन्हा पुढील ग्राहकांसाठी इथूनच पोरी बोलवल्या जातात;पण या मुलीने नकार देऊन भरपूर मिळणारा चंदा गमावला.”

यावर जॉन भाई तिला म्हणाले, “मग दुसऱ्या मुलीला पाठवायचे.यावर तनिषाकडे बघत ती महिला म्हणाली, “नाही ना पाठवू शकत.कारण तेथील ग्राहकांना हीच पसंत आहे.ही एकवेळ हॉटेलवर जावून आली आहे.तेव्हापासून हिलाच हॉटेलवर बोलवले जाते”.

जॉन भाईंना त्या महिलेचा तनिषावरील संताप लक्षात आला होता.एका महिलेने हॉटेलवर देहविक्रीची चांगली सेवा दिली, तर त्याचा वेगवेगळ्या तऱ्हेने कुंटणखान्यामधील सर्वच देहविक्री करणाऱ्या महिलांना फायदा होत असतो; पण देहविक्री करणे हे वाईटच आहे आणि कुणाच्याही मर्जीविरुद्ध देहविक्री करण्याची बळजबरी करणे ही गोष्ट त्रास दायक आहे, चुकीची आहे,असे जॉन भाई यांनी त्या महिलेला सांगितले. तेव्हा ती कुंटणखाना चालविणारी महिला एवढ्या जोरात किळसवणी हसली, की तिच्या त्या उपरोधिक हसण्याचे पडसाद संपूर्ण कुंटणखाण्यात उमटले.

ती हसता हसता म्हणाली, “साहब काय चांगल? अन काय वाईट? हे ठरवण्याची वेळ या धंद्यात आलेल्या मुलींची कधीच निघून गेलेली असते. त्या जो पर्यंत या धंद्यात उतरत नाहीत तो पर्यंतच त्या आपल्या मर्जीने जगू शकतात.एकदा या धंद्यात उतरल्या, की कायमच पुरुषाची मर्जी सांभाळतच तिला जगावं लागतं.”

अजय कांडर


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

मीपणा गेल्यावरच आध्यात्मिक प्रगती

मालवणी मुलखातील इतिहासाचे पहारेकरी

फळ खाण्यापूर्वी त्याचे निरिक्षण पक्षी करतो, पण मनुष्य…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading