July 21, 2024
Invitation to send books for the My-Bap Smriti Literature Award
Home » माय-बाप स्मृती साहित्य पुरस्कारासाठी पुस्तकें पाठविण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

माय-बाप स्मृती साहित्य पुरस्कारासाठी पुस्तकें पाठविण्याचे आवाहन

माय-बाप स्मृती साहित्य पुरस्कारासाठी पुस्तकें पाठविण्याचे आवाहन

सोलापूर – टेंभुर्णी ( ता. माढा, जि. सोलापूर ) येथील काव्यपुष्पांजली मंडळाच्यावतीने माय-बाप स्मृती साहित्य राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणार आहेत. १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेल्या कथासंग्रह, कवितासंग्रह, कादंबरी या मुख्य साहित्यकृतीला प्रत्येकी एक पुरस्कार दिला जाणार आहे. तसेच उत्कृष्ट वाचक पुरस्कारही दिला जाणार आहे, अशी माहिती हरिश्चंद्र दशरथ पाटील यांनी दिली आहे.

उत्कृष्ट वाचक पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविला जात नाही तर कथासंग्रह, कवितासंग्रह आणि कादंबरी या तीन मुख्य वाङ्मयप्रकारास पुरस्कार दिला जाणार आहे. यासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, रोख रक्कम, हार, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. साहित्यिकांनी व प्रकाशकांनी आपल्या साहित्यकृतीच्या प्रत्येकी दोन प्रती, एक पानी अत्यल्पपरिचय, एक फोटोसह ३१ जुलै २०२४ पर्यंत पाठवाव्यात.

साहित्य पाठविण्याचा पत्ता –
श्री हरिश्चंद्र दशरथ पाटील, मु. पो. टेंभुर्णी. (कसबा गल्ली) ता. माढा, जि. सोलापूर ४१३२११
अधिक माहितीसाठी संपर्क – ९८६०८८३६१०


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

कुरुक्षेत्रावरील आत्मज्ञानी विजय

अध्यात्मात आपणच आपली प्रतिमा ओळखायची असते

”कोल्हापुरी चप्पल” घालूया.. कोल्हापूरची ओळख जपूया..! – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading