October 22, 2024
Gram and wheat crop advice
Home » Privacy Policy » हरभरा अन् गहू पिक सल्ला
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

हरभरा अन् गहू पिक सल्ला

हरभरा पिकासाठी कोणते वाण चांगले आहे. या वाणांची वैशिष्ट्ये काय आहेत. यासह गहू पिकाची पैरणी केंव्हा करावी याबाबत जाणून घेण्यासाठी वाचा हा कृषी सल्ला…

हरभरा पिक सल्ला

✨देशी वाण
वाण: कालावधी (दिवस): सरासरी उत्पादन (क्विं/हे): वैशिष्टये

👉🏽 विजय: जिरायत ८५-९०, बागायत १०५-११०: जिरायत १४, बागायत २३, उशिरा १६: पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता, मररोग प्रतिकारक्षम, जिरायती, बागायत आणि उशिरा पेरणीस योग्य

👉🏽 दिग्विजय: जिरायत ९०-९५, बागायत ११०-११५: जिरायत १४, बागायत २३, उशिरा पेरणी २१: पिवळसर तांबूस टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक्षम, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य

👉🏽 आरव्हीजी-२०४: १०८-१११: बागायत २५-३०: यांत्रिक काढणीस उपयुक्त, मध्यम मररोग प्रतिकारक्षम

👉🏽 फुले विक्रांत: १०५-११०: बागायत २०: पिवळसर तांबूस मध्यम दाणे, मररोग प्रतिकारक्षम, बागायत पेरणीस योग्य

👉🏽 फुले विक्रम: जिरायत ९५-१००, बागायत १०५-११०: जिरायत १६, बागायत २२, उशिरा पेरणी २१: यांत्रिक काढणीस उपयुक्त, मध्यम दाणे, मररोग प्रतिकारक्षम, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य

👉🏽 फुले विश्वराज: जिरायत ९५-१०५: जिरायत १५-१६: पिवळसर तांबूस मध्यम दाणे, मररोग प्रतिकारक्षम, जिरायती पेरणीस योग्य

.👉🏽 जाकी-९२१८: १०५-११०: १८-२०: पिवळसर तांबूस टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक्षम, जिरायत तसेच बागायत पेरणीस योग्य

👉🏽 बीडीएनजी-७९७: १०५-११०: जिरायत १४-१५, बागायत २०-२२: मध्यम आकाराचे दाणे, अवर्षण प्रतिकारक्षम, मररोग प्रतिकारक्षम

👉🏽 परभणी चणा-१६: ११०-११५: २३-३०: यांत्रिकीकरणासाठी सुलभ, टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक्षम

👉🏽 पीडीकेव्ही कांचन: १०५-११०: बागायत १८-२०: पिवळसर तांबूस टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक्षम, जिरायत तसेच बागायत पेरणीस योग्य

👉🏽 पीडीकेव्ही कनक: १०८-११०: बागायत १८-२०: मध्यम टपोरे दाणे, यांत्रिक काढणीस उपयुक्त, संरक्षित ओलीताखाली लागवडीसाठी शिफारस, मररोग सहनशील

👉🏽 जवाहर ग्राम-२४: ११०-११५: २५-३०: यांत्रिक पद्धतीने काढणी उपयुक्त, मररोग प्रतिकारक्षम


गहू पिक सल्ला 🌾🌾

पेरणीची वेळ

जिरायती गव्हाची पेरणी ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. तर बागायती वेळेवर पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. या कालावधीत पेरणी केल्यास फुटव्यांची संख्या, ओंबीची लांबी, ओंबीतील दाण्यांची संख्या, दाण्याचा आकार आणि वजन वाढून अपेक्षित उत्पन्न मिळते. बागायती गव्हाची पेरणी १६ नोव्हेंबरनंतर उशिरा केल्यास प्रत्येक उशिराच्या पंधरवड्यात गव्हाचे उत्पादन एकरी १ क्‍विंटलने घटते.

थंडी उशिरा चालू झाल्यास उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास त्याचा फायदा होतो. बागायत उशिरा पेरणी १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरच्या दरम्यान करावी. काही ठिकाणी, उसाची तोडणी झाल्यानंतर गव्हाचे पीक घेतले जाते. तथापि, १५ डिसेंबरनंतर गव्हाची पेरणी केल्यास उत्पादनात लक्षणीय घट येते.

(सौजन्य – कृषक कृषी सल्ला )


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading