22 भारतीय भाषांमधील कवितांचा पंजाबी अनुवादीत ग्रंथ प्रसिद्ध
प्रफुल्ल शिलेदार, अजय कांडर, वर्जेश सोलंकी, पी. विठल आदी मराठी कवींचा समावेश
मराठीत समकालीन कविता फार उत्तम लिहिली जात असून तिची भारतीय पातळीवर विविध भाषेतील भाषांतराने दखल घेतली जात आहे.ही मराठी कवितेच्या दृष्टीने चांगली घटना आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात मराठीतील उत्तम अकरा समकालीन कवींच्या कवितांचा पंजाबी भाषेमध्ये भाषांतरित ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहे.
सत्यपाल भीखी, पंजाबी भाषांतरकार
कोल्हापूर – पंजाब येथील साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बालसाहित्यिक आणि विख्यात पंजाबी भाषांतरकार सत्यपाल भीखी यांनी देशभरातील 22 विविध भाषेतील महत्त्वाच्या कवींचा ग्रंथ पंजाबी भाषेत प्रसिद्ध केला आहे. यात मराठी भाषेतील नामवंत मराठी कवी प्रफुल्ल शिलेदार,कवी अजय कांडर, कवी वर्जेश सोलंकी, कवी पी. विठल आदींच्या कवितांचा समावेश आहे.
सत्यपाल भीखी हे समकालीन पंजाबी साहित्यातील महत्त्वाचे साहित्यकार आहेत. पंजाबी भाषेमध्ये त्यांनी बालसाहित्य, कविता आणि भाषांतर आदी साहित्य प्रकारात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. 2017 साली त्यांना बालसाहित्यासाठी साहित्य अकादमी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. पंजाबच्या प्रोग्रेसिव्ह साहित्य चळवळीत ते कार्यरत असून विविध भारतीय भाषेतील प्रोग्रेसिव्ह काव्य लेखन करणाऱ्या कवींची कविता पंजाबी मध्ये पोचविण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. याच पार्श्वभूमीवर त्यांनी 22 भारतीय भाषांमधील प्रत्येकी चार कवींच्या कविता पंजाबी मध्ये भाषांतरित करून त्या भाषांतरित कवितांचा ग्रंथ प्रसिद्ध केला आहे. यात मराठीतील प्रफुल्ल शिलेदार, अजय कांडर, वर्जेश सोलंकी, पी.विठ्ठल आदींच्या कवितांचा पंजाबी भाषेतील अनुवादाचा समावेश करण्यात आला आहेत. या सर्व मराठी कवींच्या कवितांचा हिंदी अनुवाद आधी प्रसिद्ध झाला होता. या हिंदी अनुवादवरून पंजाबी अनुवाद करण्यात आला आहे.
पंजाबी भाषांतरकार सत्यपाल भीखी आजच्या मराठी कवितेबद्दल बोलताना म्हणाले की, मराठीत समकालीन कविता फार उत्तम लिहिली जात असून तिची भारतीय पातळीवर विविध भाषेतील भाषांतराने दखल घेतली जात आहे.ही मराठी कवितेच्या दृष्टीने चांगली घटना आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात मराठीतील उत्तम अकरा समकालीन कवींच्या कवितांचा पंजाबी भाषेमध्ये भाषांतरित ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.