यवतमाळ – येथील जीवन गौरव साहित्य परिवारतर्फे यावर्षी ५ वे राज्यस्तरीय जीवन गौरव मराठी साहित्य संमेलन २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. यात उत्कृष्ट कथासंग्रह आणि उत्कृष्ट कवितासंग्रहांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. यासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन तोष्णा महेश मोकडे यांनी केले आहे.
पुरस्कारासाठी १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित झालेले मराठी भाषेतील ‘कथासंग्रह’ आणि ‘काव्यसंग्रह’ मागविण्यात येत आहे. पुरस्काराचे स्वरुप रोख १००१ रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे असून साहित्यिकांनी आपल्या साहित्य कृतींच्या २ प्रती, २ छायाचित्रे, पोष्टाचा पत्ता, संपर्क क्रमांक आणि थोडक्यात परिचय २० फेब्रुवारी २०२५ पर्यंत पाठवावा.
पुस्तके पाठविण्याचा पत्ता –
तोष्णा महेश मोकडे, शाश्वतार्थ, प्लॉट नं ७५ रुपनगर,
वडगाव, यवतमाळ ४४५२०१
अधिक माहितीसाठी संपर्क – गणेश कुंभारे – 97656 06069
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.