June 8, 2025
Cloudy sky and rainfall during Mrug Nakshatra season over a farm field – traditional Indian monsoon scene forecast by weather expert
Home » मृग नक्षत्राच्या सरी बरसणार !
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मृग नक्षत्राच्या सरी बरसणार !

           

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

गेल्या आठ दिवसापासून पुण्या- मुंबईत पोहोचलेला मान्सून जाग्यावरच खिळलेला असुन त्यात प्रगती नाही. खान्देश, नाशिक व विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात अजुन मान्सून पोहोचलेला नाही.
अजूनही आठ दिवस म्हणजे १९  जूनपर्यन्त पावसासाठी वातावरण विशेष अनुकूल नसले तरी आज व उद्या (७, ८ जून शनिवार, रविवार) आणि १३ जून शुक्रवार असे तीन दिवस  नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर ह्या जिल्ह्यात व मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता जाणवत आहे.

विशेषतः वरीलपैकी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यात आजपासुन पुढील आठ दिवस म्हणजे  शनिवार दि.१४ जूनपर्यंत मृग नक्षत्राच्या मध्यम पावसाची शक्यता अधिक जाणवते. मराठवाड्यातील ८  तसेच विदर्भातील ११ जिल्ह्यात मात्र गुरुवार दि. १२ जून पासून तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता जाणवते. थोडक्यात १३ जून शुक्रवार पासुन मंदावलेल्या मान्सून प्रवाह सक्रिय होवून पुढे वाटचालीस चालना मिळू शकते, असे वाटते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading