- प्रभा प्रकाशन आणि अक्षरवैभव यांच्यावतीने आयोजन
- संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी सायमन मार्टिन यांची निवड
कणकवली – येथील प्रभा प्रकाशन आणि अक्षरवैभव वैभववाडी यांच्यावतीने रविवारी ( ता. 16 नोव्हेंबर रोजी ) वैभववाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन सभागृहात अक्षरवैभव साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी तथा यावर्षीच्या ख्रिश्चन मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष सायमन मार्टिन (वसई) यांची निवड करण्यात आली आहे.
संमेलनाचे अध्यक्ष सायमन मार्टिन यांची मराठीतील नामवंत कवी आणि सामाजिक कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे. कवी मार्टिन हे गेली 40 वर्ष निष्ठेने कविता लेखन करत असून मराठीतल्या प्रतिष्ठित प्रकाशन संस्थातर्फे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. लेखनाची आणि जगण्याची पक्की भूमिका तसेच समाजासाठीची कृतीशीलता या विचाराने ते काव्य लेखन करत आले आहेत.
प्रखर वास्तव त्यांच्या कवितेतून आपल्याला वाचायला मिळते. जगण्याची व्यामिश्रता आणि माणसाला माणसापासून तोडत जाणे या वेदनेचा प्रवाह त्यांच्या कवितेत आढळत असल्यामुळे त्यांची कविता वाचताना वाचक अंतर्मुख होत जात असतो. मराठी साहित्यातील अनेक महत्त्वाच्या सन्मानाने सन्मानित करण्यात आलेल्या या महत्त्वाच्या कवीच्या अध्यक्षतेखाली वैभववाडी सारख्या सांस्कृतिक दृष्ट्या अविकसित राहिलेल्या भागात साहित्य संमेलन आयोजित केले जात आहे ही वैभववाडीच्या दृष्टीने महत्त्वाचीच घटना आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
