📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 9, 2026
काय चाललयं अवतीभवती मनोरंजन

“ॲड” लघुपटाला पुरस्कार

कोल्हापूरचे युवा दिग्दर्शक स्वप्निल बळवंत पाटील यांच्या “ॲड” लघुपटाला कोडैकॅनाल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्तम पदार्पण लघुपट पुरस्कार मिळाला आहे.

कोल्हापूर – येथील युवा चित्रकार व दिग्दर्शक स्वप्निल बळवंत पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या “ॲड” या लघुपटाला Kodaikanal International Film Festival, Tamil Nadu मध्ये Best Debut Short Film Award मिळाला आहे. तसेच Purgatory Film Festival,Southampton, UK येथे Official Selection झाली आहे.

सरकारी योजनांची भिंती चित्राचे काम करणाऱ्या एका पेंटरच्या आयुष्यावर आधारित असणारा हा लघुपट व्यक्तिगत व सामाजिक विचारांवर भाष्य करतो आहे.

या लघुपटाची विजयालक्ष्मी फिल्म्स ने निर्मीती केली आहे. या लघुपटाची लेखिका व निर्माती स्नेहल जोतीबा कांबळे हिची तर दिग्दर्शक, डि.ओ.पी, एडिटिंग स्वप्निल बळवंत पाटील यांनी केले आहे. ओमकार सुतार यांचे संगीत दिग्दर्शन, वेशभूषा शाहिस्ता मकानदार, रंगभुषा रुपाली सूर्यवंशी, सहाय्यक दिग्दर्शक समीर भोरे यांनी काम पाहिले आहे. तर प्रमोद फडतरे, प्रणोती कुमठेकर, संचिता कुमठेकर, सुरेंद्र बोंगाळे या कलाकारांनी विविध भूमिका साकारली आहेत.

Related posts

मातृमंदिर संस्थेचे संत वाङ्मय पुरस्कार जाहीर

नवोदितांच्या प्रथम प्रकाशनासाठी मराठा मंदिरतर्फे साहित्य पुरस्कार

शनिवार सकाळपासून पुढील ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
Skip to toolbar