‘शाश्वत कृषी पद्धतींच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण’ या विषयावर, भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद अर्थात आय सी एस एस आर प्रायोजित राष्ट्रीय चर्चासत्र
पुणे – आयसीएसएसआर ने प्रायोजित केलेल्या ‘शाश्वत कृषी पद्धतींच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे मुंबईतील प्रिन्सिपल एल. एन. वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च (पीजीडीएम), वीस्कूल आणि पुणे येथील वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, व्हॅम्निकॉम यांनी यशस्वीरित्या आयोजन केले.
हे राष्ट्रीय चर्चासत्र , विकसित भारत @2047 या दृष्टिकोनानुसार आयोजित करण्यात आले असून याचा उद्देश देशातली आघाडीच्या शैक्षणिक संस्था, संशोधक, धोरणकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी उत्पादक संस्था, सहकारी क्षेत्रातील नेतृत्व, स्वयंसेवी संस्था आणि विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील महिला आणि ग्रामीण अर्थव्यवस्था याविषयावर विचार विनिमय करण्यासाठी एका व्यासपीठाखाली आणणे हा आहे.
व्हॅम्निकॉमच्या संचालक डॉ हेमा यादव यांच्या उदघाटनपर भाषणाने या चर्चासत्राचा आरंभ झाला. क्षमता बांधणी, वित्तीय समावेशन आणि सहकाराच्या आदर्शांनुसार महिलांच्या सक्षमीकरणाचे महत्व त्यांनी विशद केले. शाश्वत शेती आणि कृषी व्यवसायात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था आणि कृषी सहकारी संस्थांमधील सहकार्य वाढीस लागले पाहिजे यावर त्यांनी आपल्या भाषणात भर दिला.
ग्रामीण भागातील समृद्धी आणि देशातील अन्न सुरक्षेच्या व्यापक ध्येयाच्या पूर्ततेसाठी महिला शेतकऱ्यांना सक्षम करणे अतिशय महत्वाचे आहे असे प्रिन्सिपल एल. एन. वेलिंगकर इन्स्टिट्यूटचे ग्रुप डायरेक्टर प्रा. डॉ. उदय साळुंखे यांनी सांगितले.
महाराष्ट्र सरकारच्या स्मार्ट प्रोजेक्टच्या तसेच लिंगभाव आणि सामाजिक विकास तज्ञ, लिंगभाव आणि ग्रामीण विकासावरील तज्ञ डॉ. संगीता शेटे आणि पुण्यातील राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेच्या (एनआयएन) संचालक डॉ. के. सत्य लक्ष्मी यांनी लिंगभाव -संवेदनशील कृषी धोरणे आणि शाश्वत शेती पद्धतींबद्दल त्यांचे दृष्टिकोन मांडले.
या चर्चासत्रात भारतातील संशोधक आणि व्यावसायिकांनी 25 पेपर सादर केले. महिला शेतकऱ्यांसाठी कर्जाची उपलब्धता आणि सूक्ष्म-वित्तपुरवठा हे पर्याय अधिक प्रभावी करण्यासाठी आर्थिक समावेशन धोरणे, महिला शेतकऱ्यांची कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणित साधने, दुग्धव्यवसाय, सेंद्रिय शेती आणि कृषी प्रक्रिया क्षेत्रातील यशस्वी महिलांच्या नेतृत्वाखालील कृषी व्यवसाय उपक्रमांच्या केस स्टडीज आणि हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी आणि शाश्वत शेती पद्धती सुनिश्चित करण्यासाठी हवामान लवचिकतेसाठी नाविन्यपूर्ण दृष्टिकोन यासारख्या विषयांचा यात समावेश होता.
या परिषदेचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे शाश्वत कृषी व्यवसायाद्वारे सहजसाध्य उपजीविका या विषयावर एक उत्कृष्ट गट चर्चा, ज्यामध्ये कृषी सहकारी संस्था, वित्तीय संस्था, वैचारिक धोरणकर्ते समूह (पॉलिसी थिंक टँक) आणि ग्रामीण विकास संस्थांचे तज्ञ उपस्थित होते. कृषी क्षेत्रातील लिंगभाव समानतेसाठी शिफारशी, महिलांच्या नेतृत्वाखालील कृषी व्यवसायांतील आर्थिक समावेशकता वाढवणे आणि ग्रामीण महिलांना त्यांचे कृषी उद्योग वाढविण्यात सक्षम करण्यासाठी सहकारी आणि स्वयं-सहायता गटांची (SHG) भूमिका हा या चर्चेचा केंद्रबिंदू होता.
प्रि एल.एन. वेलिंगकर संस्थेतील वरीष्ठ सहयोगी डीन, आणि भारतीय सामाजिक वैज्ञानिक संशोधन परीषद (कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च ,ICSSR) प्रकल्प समन्वयक डॉ. वैशाली पाटील, यांनी कृषी क्षेत्रातील लिंगभाव -समावेशक धोरणे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सतत संवाद आणि कृती-केंद्रित संशोधनाच्या गरजेवर भर दिला.
परिसंवादातील निष्कर्ष हे धोरणात्मक शिफारस अहवालात संकलित केले जातील, जे संबंधित सरकारी संस्था, सहकारी संस्था आणि संशोधन संस्थांना भविष्यात विविध उपक्रम करण्यासाठी पाठविले जातील आणि “शाश्वत कृषी पद्धतींद्वारे महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण: महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादक संस्थांवर एक अभ्यास” या नावाचा प्रतिष्ठित सहयोगी संशोधन प्रकल्प, ICSSR, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांनी विकसित भारत @2047 या मोहिमेअंतर्गत मंजूर केला आहे.
डॉ. वैशाली पाटील, डॉ. हेमा यादव, डॉ. प्रवीण घुन्नर, डॉ. महेश कदम, आणि डॉ. रचना पाटील यांनी लिंगभाव -समावेशक कृषी संशोधनात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल हा संशोधन प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. या उपक्रमाचा उद्देश कृषी क्षेत्रातील महिलांसाठी शाश्वत उपजीविकेसाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि सहकारी आणि कृषी व्यवसाय प्रारुपांमधील त्यांच्या सहभागास प्रोत्साहन देण्यासाठी शेतकरी उत्पादक संस्था (FPOs) यांच्या भूमिकेचा शोध घेणे हा आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.