नेज ( ता. हातकणंगले, जि.कोल्हापूर ) येथील स्फूर्ती साहित्य संघाच्या वतीने कै. सत्यभामा भगवंत पोतदार यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या श्रीशब्द काव्य पुरस्कार 2024 ची घोषणा संघाचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी केली.
पुरस्कार निश्चितीसाठी बाबू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या नेमलेल्या समितीने काव्य पुरस्कारांचा दिलेला निकाल असा : गीतेश शिंदे यांच्या सीसीटीव्हीच्या गर्दछायेत (शब्दालय प्रकाशन श्रीरामपूर) व भीमराव धुलूबुळू याच्या काळजाचा नितळ तळ (प्रतिभा पब्लिकेशन, इस्लामपूर ) या काव्य संग्रहांची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही पुस्तकांसाठी प्रत्येकी एक हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
विशेष पुरस्कारासाठी : मानसी चापेकर यांच्या हळुवार मनाची शाई (अष्टगंध,मुंबई ), रामचंद्र इकारे यांच्या माणुसकीचे आभाळ (ऋत प्रकाशन,बार्शी), प्रा. अशोक दास यांच्या चंद्रनागरीचा शब्द (तेजश्री प्रकाशन, इचलकरंजी ) व सौ. वनिता संभाजी जांगळे यांच्या तिच्या जगण्याची कविता होताना (ललित पब्लिकेशन मुंबई) या पुस्तकांची निवड करण्यात आली आहे. विशेष पुरस्कारासाठी रोख रक्कम रुपये 500 व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून तिन्ही वर्षाचे पुरस्कार लवकरच एकत्रितरित्या समारंभ पूर्वक प्रदान केले जाणार आहेत. असे स्फुर्ती साहित्य संघ नेजचे अध्यक्ष कवी प्रा.डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी सांगितले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.