‘ओल अनमोल आवानओल’ ग्रंथाविषयी
अजय कांडर १९९० च्या पिढीतील महत्त्वाचे कवी. त्यांच्या ‘आवानओल’ या कवितासंग्रहातील कविता कृषिजन संस्कृतीतील बायांच्या भोगवट्याची वेदना – दुःख, भावविश्व मांडते आणि स्त्रीच्या मानसिक व शारीरिक आंदोलनाची विविध रूपे सूक्ष्मपणे सघनतेने उलगडत नेते. शेती-मातीशी जोडल्या गेलेल्या स्त्रीच्या कष्टप्रद जीवनातील ताणेबाणे समर्थपणे व्यक्त करताना स्त्रीची असीम वेदना अत्यंत संयत तरीही सखोलपणे “आवानओल” मधून व्यक्त झाली आहे.
मराठी कवितेत आजवर एकूण झालेल्या स्त्रीचित्रणात नवे अलक्षित व महत्त्वपूर्ण भर घालणारे हे चित्रण ठरते. त्यातून कांडर यांच्या मराठी कवितेतील काव्य लेखनाचा स्वतंत्र चेहरा प्रकट होतो. लोकपरंपरेजवळ जाणारी चित्रमय शैली आणि मीताक्षरी सामर्थ्य असणारी ही कविता आहे. बदलत्या ग्रामीण वास्तवाची अनेक रूपे रेखाटताना हा कवी वाचकाला अंतर्मुख करतो; हे या कवितेचे मोठे वैशिष्ट्य आहे.
या पार्श्वभूमीवर ‘ओल अनमोल आवानओल’ ग्रंथामधील लेखन या सगळ्याची नेमकेपणाने चर्चा आणि चिकित्सा करते. मराठी कवितेच्या नव्या अभ्यासकांना, संशोधकांना हा ग्रंथ त्यांच्या अभ्यासाची दिशा ठरवायला पुरेसा उपयुक्त असून वाचकही त्याचे स्वागत करतील, असा विश्वास वाटतो !
पुस्तकाचे नाव – ओल अनमोल आवानओल (अजय कांडर यांच्या कवितेची चर्चा आणि समीक्षा)
संपादक – शरयू आसोलकर
प्रकाशन – अक्षरवाड:मय प्रकाशन, पुणे
पाने – १४३, किंमत – २०० ₹
अजय कांडर यांचा युगानु युगे तूच खरेदी करण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://amzn.to/3K8FSbw
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.