आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.
प्रश्न – येत्या आठवड्याभरात थंडीची स्थिती कशी राहील ?
माणिकराव खुळे – पुढील ३ दिवस अजूनही थंडीचेच. सध्या महाराष्ट्रात जाणवत असलेली थंडी, शुक्रवार दि. २१ नोव्हेंबर (मार्गशीर्ष प्रतिपदा) पर्यंत अशीच जाणवणार असून बुधवारी दि. १९ नोव्हेंबरपर्यन्त अशीच कडाक्याची थंडी जाणवू शकते..
तीव्र थंडीची लाट –
महाराष्ट्रात आज यवतमाळ व जेऊरला पहाटे पाच वाजता अनुक्रमे ९.६ व ८ अंश से. इतके किमान तापमान नोंदवले असुन ही तापमाने सरासरीपेक्षा अनुक्रमे ७.४ व ६.५ इतक्या अंश से. ने खालावून तेथे व लगतच्या परिसरात तीव्र थंडीची लाट जाणवत आहे.
थंडीची लाट-
जळगांव, नाशिक, मालेगाव, गोंदियाला आज पहाटे पाच वाजता अनुक्रमे ९.८, ९.६, १० व १० अंश से. इतके किमान तापमान नोंदवले असुन ही तेथील तापमान सरासरीपेक्षा अनुक्रमे ५, ५, ५.१ व ५.८ इतक्या अंश से. ने खालावून तेथे व लगतच्या परिसरात थंडीची लाट जाणवत आहे
थंडीच्या लाटे सदृश्य स्थिती –
महाराष्ट्रातील डहाणू, अहिल्यानगर, पुणे, सातारा, नांदेड, परभणी, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा ह्या शहरात व लगतच्या परिसरात आज थंडीच्या लाटेसदृश्य स्थिती अनुभवली गेली.
प्रश्न – महाराष्ट्रात सध्याची थंडी कश्यामुळे ?
माणिकराव खुळे – सध्या उत्तर भारतात एकापाठोपाठ पश्चिमी झंजावात नाही. दोन पश्चिमी झंजावात काही दिवसांच्या गॅपमुळे, अगोदरच झालेल्या बर्फ वृष्टीवरून ताशी २५ ते ३० किमी वेगाने पूर्व दिशेकडून पूर्वीय अतिथंड वारे उत्तर भारतातून महाराष्ट्राकडे झेपावत आहे. शिवाय महाराष्ट्रात आकाश निरभ्र आहेच. तसेच महाराष्ट्र सहित संपूर्ण वायव्य भारतात हवेच्या दाबात ४ ते ६ हेक्टापास्कलने वाढ होवून १०१६ ते १०१८ हेक्टापास्कल अश्या एकसमान व एकजिनसी हवेच्या दाब उत्तर भारताबरोबर सध्या महाराष्ट्रातही जाणवत आहे. त्यामुळे हवेच्या घनतेत वाढ होत आहे. म्हणून सध्या थंडीला अनुकूल वातावरण आहे..
संपूर्ण महाराष्ट्र ओलांडून ही थंडी उत्तर कर्नाटक व उत्तर तेलंगणात झेपावली आहे. अश्या प्रकारे येणाऱ्या थंडीला अडथळा न देणारा हवेच्या दाबाचा पॅटर्नही सध्या महाराष्ट्रासहित दक्षिण भारतात आहे. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात चौफेर थंडी जाणवत आहे.
प्रश्न – थंडी कधी कमी होणार?
माणिकराव खुळे – वारा वहन पॅटर्न मध्ये होणाऱ्या बदलातून शनिवार दि. २२ नोव्हेंबर पासुन महाराष्ट्रात सध्यापेक्षा केवळ काहीशी थंडी कमी होण्याची शक्यता जाणवते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.

गुलाम…