📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 19, 2026
काय चाललयं अवतीभवती

प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार विनोद शिरसाठ यांना जाहीर

साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांना २०२५ चा प्रबोधनकार ठाकरे समाजप्रबोधन पुरस्कार जाहीर. वितरण समारंभ नागपूर येथे डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली.

नागपूर – येथील मारवाडी फाऊंडेशनच्या वतीने समाजप्रबोधनाचे कार्य करणाऱ्या व्यक्तिला थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार दिला जातो. यंदाचा २०२५ चा हा पुरस्कार साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. गिरीश गांधी यांनी दिली आहे.

स्व. प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार या नावे असणाऱ्या या पुरस्काराचे स्वरू एक लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे आहे. 2025 चा ‌‘‌‘स्व. प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार“ शिरसाठ यांना देण्यात येत आहे. शिरसाठ हे मराठी लेखक, सामाजिक प्रश्नांचे भान असलेले सजग कार्यकर्ते असून मागील दीड दशकांपासून साधना साप्ताहिकात कार्यरत आहेत. 2013 पासून वैचारिक साधना साप्ताहिकाचे ते संपादक आहेत.

या पुरस्काराचे वितरण गुरुवारी 27 नोव्हेंबर, 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता नागपूर येथील टॅमेरिंड हॉल, चिटणवीस सेंटर सिव्हील लाईन्स येथे दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या हस्ते व वैद्यकीय संशोधक व सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, अशी माहिती डॉ. गांधी यांनी दिली आहे.

Related posts

शेतमाल आणि प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ यांच्या निर्यातीत ३१ टक्क्यांनी वाढ

अंजली ढमाळ लिखित ‘निखळत्या चौकटीत’ कादंबरीवर 30 रोजी परिसंवाद

निगडीतील मातृमंदिर संस्थेच्यावतीने पुरस्कारासाठी संत साहित्यावरील पुस्तके पाठविण्याचे आवाहन

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406