June 18, 2025
An artistic depiction of Saint Chokhamela with family members, symbolizing a forgotten lineage in the Bhakti movement.
Home » चोखोबांचा परिवार : एक शोध
मुक्त संवाद

चोखोबांचा परिवार : एक शोध

चोखोबाच्या परिवाराचा असा धांडोळा घेण्याची इच्छा त्यांच्यासारख्या अभ्यासकास व्हावी हेच मुळी मला सांस्कृतिकदृष्ट्या फार अर्थपूर्ण वाटते. आजच्या काळात असे अभ्यास मनाला नक्कीच नवी उभारी देणारे आहेत. त्यासाठी मी माधव पुटवाड यांचे अंतःकरणापासून अभिनंदन करतो.

रंगनाथ पठारे

नामदेव, ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम अशी तेरावे ते सतरावे शतक सलग चारशे वर्षे आपल्या भाषेत श्रेष्ठ दर्जाची कविता लिहिली गेली. तिच्यातून जो वारकरी धर्म उभा राहिला, तोच आपला महाराष्ट्र धर्म. यातूनच या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांसारखा अपवादात्मक महापुरुष उदयाला आला. माणुसकी आणि समानता ही या धर्माची मूळ तत्त्वे आणि अंतिम उद्दिष्टे होती. नामदेवाने या भूमीचा पाया घातला. त्याच्या अठरापगड जातींतील सहकवींपैकी एक चोखोबा. आज हे सगळे कवी आपण आपल्या जातीत वाटून घेऊन टिकवले आहेत.

शक्य तिथे त्यांच्या नावे पोटजाती निर्माण केल्या आहेत. जसे की नामदेव शिंपी (!). चोखोबाला तर असा जातीचा आधारही उरलेला नाही. फक्त आपल्या कवितेच्या बळावर आजही हा कवी टिकून राहिलेला आहे. त्याच्या कवित्वाचा आणि जीवनाचा सांगोपांग तपास / अभ्यास करण्याचा अव्वल प्रयत्न माधव पुटवाड यांनी या ग्रंथात अपरिमित आस्थेने केला आहे.

चोखोबा, त्याची पत्नी सोयरा, त्याची बहीण निर्मळा, मेव्हणा बंका आणि मुलगा कर्ममेळा अशा एकाच कुटुंबातल्या सगळ्यांनी कवी असणे आणि उरणे हे केवळ अपवादात्मक आणि दुर्लभ असे वास्तव आहे. त्याचा अत्यंत उचित असा वेध माधव पुटवाड यांनी या ग्रंथात घेतलेला आहे.

चोखोबाच्या परिवाराचा असा धांडोळा घेण्याची इच्छा त्यांच्यासारख्या अभ्यासकास व्हावी हेच मुळी मला सांस्कृतिकदृष्ट्या फार अर्थपूर्ण वाटते. आजच्या काळात असे अभ्यास मनाला नक्कीच नवी उभारी देणारे आहेत. त्यासाठी मी माधव पुटवाड यांचे अंतःकरणापासून अभिनंदन करतो.

पुस्तकाचे नावः चोखोबांचा परिवार :एक शोध
प्रकाशकः लोकवाङ्मय प्रकाशन
लेखक :माधव पुटवाड
किंमत : 400/-₹
घरपोच सवलतमूल्य : 380/-₹
google pay : 9960374739

घरपोच व सवलतीच्या पुस्तकांसाठी संपर्क
सहित वितरण
9960374739
9867752280
9096399397


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading