📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
November 3, 2026
काय चाललयं अवतीभवती

शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार जाहीर

Award-winning Marathi authors receiving the Shivaji Wagh Memorial Literary Awards 2024 on stage with certificates and mementos.

नाशिक – पिंपळगाव जलाल ( ता. येवला जि नाशिक ) येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानतर्फे आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय चौथ्या साहित्य कलाकृती पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय वाघ यांनी दिली आहे.

प्रतिष्ठानने १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीतील साहित्य कलाकृती पुरस्कारासाठी पाठविणेबाबत आवाहन केले होते. महाराष्ट्रामधून आणि परराज्यातून मराठी भाषिकांचे कथासंग्रह, कविता संग्रह, कादंबरी आणि ललित लेखन याच्या एकूण १४६ साहित्यकृती पुरस्कारासाठी प्राप्त झाल्या होत्या. त्यातून प्रत्येकी एका साहित्य प्रकारातील एक कलाकृती पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती चौथे राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार विजेते असे –
१. कविता संग्रह – जामिनावर सुटलेला काळा घोडा कवी- धनाजी धोंडीराम घोरपडे.
२. कादंबरी- घरंगळण लेखक – डॉ. भीमराव वाकचौरे
३. कथासंग्रह – कोंडमारा लेखक – मा. डॉ. अनंता सूर, यवतमाळ
४. ललित संग्रह- काळीजफुल लेखिका – वर्षा किडे – कुळकर्णी, नागपूर

Related posts

आधुनिकता न सोडताही आपले भारतीयत्व टिकवले पाहिजे हाच आग्रह

परदेशात नोकरीसाठी आंतरराष्ट्रीय रोजगार मेळावा

भरड धान्ये अन् त्याच्या मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्यातीला केंद्राचे प्रोत्साहन

Leave a Comment

Leave a review

    श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406