चिपळूण – येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या विविध साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे, अशी माहिती वाचनमंदिराचे कार्याध्यक्ष अरुण गजानन इंगवले यांनी दिली आहे.
‘कवी माधव’ पुरस्कार प्रा. सुहास बारटक्के यांच्या कथा विविधा या पुस्तकास, तर कवी आनंद ‘पुरस्कार प्रा. अविनाश बापट यांच्या शापित हवेली या पुस्तकास, कवी द्वारकानाथ शेंडे ‘मनबोली’ पुरस्कार डॉ. श्रीकांत पाटील यांच्या ऊसकोंडी या पुस्तकास, कवी द्वारकानाथ शेंडे ‘मोक्षदा ‘ पुरस्कार विजय जोशी यांच्या वृत्तबद्ध कविता ते गझल तंत्र आणि मंत्र, तर कवी द्वारकानाथ शेंडे ‘ मृदुंगी’ पुरस्कार धनाजी घोरपडे यांच्या जामिनावर सुटलेला काळा घोडा या पुस्तकास जाहीर झाला आहे.
रविवार दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी सहा वाजता वाचनालयाच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह, शाल असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
