आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.
नैऋत्य मान्सून गेला-
देशात २४ मे ला दाखल झालेला नैऋत्य मान्सून देशात १४६ दिवस कार्यरत राहून त्याच्या सरासरी निर्गमन तारखेच्या एक दिवस उशिरा म्हणजे आज गुरुवार दि. १६ ऑक्टोबर ला देशातून बाहेर पडला.
ईशान्य मान्सून चे आगमन-
नैऋत्य मान्सून देशातून जाताच ईशान्य मान्सूनने आज देशातील दक्षिणेकडील तामिळनाडू, केरळ, माही पॉंडिचेरी, करायकल, सीमांध्र, रायलसीमा व दक्षिण कर्नाटक राज्यात त्याने आपले आगमन प्रस्थापित केले आहे. गेल्या २४ तासात तामिळनाडू व लगतच्या परिसरात मान्सून ने जोरदार हजेरी लावली.
महाराष्ट्रातील पाऊस-
विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यात पावसाच्या चौथ्या आवर्तनातून शनिवार दि. १८ ते बुधवार दि. २२ ऑक्टोबर पर्यंत तुरळक ठिकाणी रब्बीला लाभदायक ठरेल अश्या किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. त्यातही आज १६ तारखेला मराठवाड्यात मध्यम पावसाची शक्यता अधिक जाणवते.
ऑक्टोबर शेवटच्या आठवड्यातील पाऊस-
शनिवार दि. २५ ऑक्टोबर दरम्यान आग्नेय बंगाल उपसागरात कमी दाब क्षेत्र निर्मिती व त्याचे पश्चिमेकडे मार्गक्रमणातून संपूर्ण महाराष्ट्रात त्यातही विशेषतः कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर ह्या जिल्ह्यात ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात मध्यम पावसाची शक्यता जाणवते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
