June 24, 2025
Successful beekeepers invited to apply for Maharashtra Beekeeping Awards 2025 before May 8 – Ratnagiri
Home » यशस्वी मधमाशा पालन उद्योग करणाऱ्या मधपाळांनी 8 मे पर्यंत अर्ज करावेत
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

यशस्वी मधमाशा पालन उद्योग करणाऱ्या मधपाळांनी 8 मे पर्यंत अर्ज करावेत

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई व मध संचालनालय, महाबळेश्वर यांच्यावतीने 20 मे रोजी जागतिक मधमाशी दिनानिमित्त मध उद्योगामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्यांना प्रशस्तीपत्रक, मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे.

तरी जिल्ह्यातील यशस्वी मधमाशा पालन उद्योग करणाऱ्या मधपाळ /प्रगतशील मधपाळ यांनी 8 मे पर्यंत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जेल रोड, बीएसएनएल ऑफीस शेजारी कुलकर्णी कम्पाउन्ड, रत्नागिरी येथे विहीत नमुन्यात अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी शैलेंद्र कोलथरकर यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा. कार्यालयाचा दूरध्वनी क्र.02352-222379 आहे. तर ई मेल आयडी dvioratnagiri@mskvib.org असा आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading