📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 19, 2026
काय चाललयं अवतीभवती

महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवडच्या अध्यक्षपदी राजन लाखे यांची बिनविरोध फेरनिवड

महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेच्या अध्यक्षपदी राजन लाखे यांची बिनविरोध फेरनिवड झाली. १५ सदस्यांची संपूर्ण कार्यकारिणीही बिनविरोध निवडली.

पिंपरी: महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष प्रा. राजन लाखे यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. विशेष म्हणजे, राजन लाखे यांच्यासह १५ सदस्यांची संपूर्ण कार्यकारिणीही बिनविरोध निवडण्यात आली.

चिंचवडगाव येथील काशीधाम मंगल कार्यालयात शनिवार, २९ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे जिल्हा प्रतिनिधी डॉ.पुरुषोत्तम काळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया झाली.मसाप पुणेचे कार्यवाह सुनील महाजन हे केंद्र निरीक्षक म्हणून उपस्थित होते. जिल्हा प्रतिनिधी प्रभाकर ओव्हाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली.

अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यवाह, कोषाध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्य अशा एकूण १५ जागांसाठी १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.उपाध्यक्ष आणि कार्यवाह या प्रत्येकी दोन जागांसाठी तीन-तीन अर्ज दाखल झाले होते.मात्र,निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत उपाध्यक्षपदाचे उमेदवार प्रा.डॉ.सुभाष आहेर आणि कार्यवाहपदाचे उमेदवार प्रा.नरहरी वाघ यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.त्यामुळे अध्यक्षांसह संपूर्ण कार्यकारिणीची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले. निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.

या वार्षिक सर्वसाधारण सभेला १६४ सभासद उपस्थित होते.

नूतन पंचवार्षिक कार्यकारिणी
अध्यक्ष : प्रा. राजन लाखे
उपाध्यक्ष : डॉ. रजनी शेठ, मकरंद बापट
कार्यवाह : संजय जगताप, गीता सुतार
कोषाध्यक्ष : विजय नाईक

कार्यकारिणी सदस्य : किरण लाखे, दत्तू ठोकळे, डॉ. मीनल लाड, किरण जोशी, नीलिमा फाटक, इला पवार, बाळासाहेब गोरे, अशोक होनराव आणि संजय होनकळस.

सभेला संबोधित करताना मसाप पुणेचे कार्यवाह सुनील महाजन यांनी आगामी ऐतिहासिक शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर नूतन कार्यकारिणी जोमाने काम करेल आणि पिंपरी-चिंचवड शाखेचा नावलौकिक आणखी वृद्धिंगत करेल, असा विश्वास व्यक्त केला.

निवडणूक प्रक्रियेनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना मसाप सदस्य नितीन शास्त्री,डॉ.मीनल लाड,श्रीकृष्ण पुरंदरे,संदीप राक्षे आणि अद्वैत ऐनापुरे यांनी पिंपरी-चिंचवड शाखेने सातत्याने केलेल्या साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्याचा गौरव केला.संजय जगताप यांनी सूत्रसंचालन केले.

Related posts

कोमसापच्या वाङ्मयीन पुरस्कारांसाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन Konkan Marathi Sahitya Parishad Literature Award

खेड चिपळूणात नवरंगाचे दर्शन…

रत्नागिरी जिल्ह्यातील कलारसिक-साहित्यिकांना माहिती देण्याचे आवाहन

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406