चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम नाही.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातील पहिल्या आवर्तना(१ ते ५ सप्टेंबर)चा पाऊस ‘माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ
शनिवार (दि. ३१ ऑगस्ट ) ते गुरुवार (दि. ५ सप्टेंबर) दरम्यानच्या सहा दिवसात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात भागवार स्पष्टीत तीव्रतेच्या पावसाची शक्यता जाणवते. प्रथमता:👇
१. अतिजोरदार पाऊस –
मुंबईसह संपूर्ण कोकण व विदर्भातील १८ जिल्ह्यात दि. ३१ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर (शनिवार ते गुरुवार) दरम्यान तसेच खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अश्या १० जिल्ह्यात दि. ३ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर (मंगळवार ते गुरुवार) दरम्यान आणि संपूर्ण मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात सोमवारी दि.२ सप्टेंबर रोजी अतिजोरदार पावसाची शक्यता जाणवते.
अतिजोरदार म्हणजे अंदाजे १२ ते २० सेमी. दरम्यानच्या श्रेणीतील एका दिवसात होवु शकणाऱ्या पावसाला अतिजोरदार पाऊस संबोधतात. म्हणजे तेव्हढा पाऊस होण्याच्या शक्यतेचे वातावरण त्या ठिकाणी तयार होवु शकते.
२. जोरदार पाऊस –
खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अश्या १० जिल्ह्यात दि.१ व २ सप्टेंबरला (रविवार व सोमवार ) तर मराठवाड्यात दि. १, ३, ४ सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
जोरदार पाऊस म्हणजे अंदाजे ७ सेमी. किंवा त्यापेक्षा अधिक व १२ सेमी. च्या खाली अश्या श्रेणीतील एका दिवसात होवु शकणाऱ्या पावसाला जोरदार पाऊस संबोधतात.
३. मध्यम पाऊस –
संपूर्ण मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात मंगळवार दि.५ सप्टेंबर रोजी मध्यम पावसाची शक्यता जाणवते.
मध्यम पाऊस म्हणजे अंदाजे २ सेमी. किंवा त्यापेक्षा अधिक व ७ सेमी. च्या खाली अश्या श्रेणीतील एका दिवसात होवु शकणाऱ्या पावसाला मध्यम पाऊस संबोधतात.
४. एका दिवसाचा पाऊस कसा ठरवतात.
एका दिवसाचा पाऊस म्हणजे आज सकाळी साडेआठ ते दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजेपर्यन्त (०३ ते ०३ ग्रीनव्हीच मिन टाइम) पडलेल्या पावसाच्या मोजमापाला आजच्या तारखेला पडलेल्या एका दिवसा [२४ तासा] चा पाऊस म्हणतात.
५. धरणातील जलविसर्ग-
रविवार दि.१ सप्टेंबर पासून नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरील धरणांतून चार दिवसासाठी खालावलेला जलविसर्गानंतर, सोमवार दि. २ सप्टेंबरपासून पुन्हा एकदा धरण-जलविसर्गात वाढ होण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे संबंधित नद्यांच्या काठावरील पूर-परिस्थिती ही त्या वेळच्या पाऊस तीव्रतेवर अवलंबुन असेल.
६. चक्रीवादळ-
मागील आठवड्यात उत्तर पश्चिम बंगालमध्ये तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र उ. प्र.,व म. प्र मार्गे २७ ऑगस्टला आग्नेय राजस्थानात अतितीव्र क्षेत्रात रूपांतर झाले आणि आज संध्याकाळी कच्छच्या किनारपट्टीवरून अरबी समुद्रात झेपावेल्यानंतर त्याचे चक्रीवादळात रूपांतर होईल. उद्या शनिवारी मध्यरात्री ओमानच्या किनारपट्टीवर धडकेल. ह्या चक्रीवादळाचा मुंबईसह कोकण व संपूर्ण महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.