पावसाळा सुरु झाला की अनेक रानभाज्यांची पर्वणी असते. रानभाज्या या फक्त पावसाळ्यातच भेटतात. परंतु यांचे गुणधर्म फार महत्वपूर्ण असतात. जेव्हा या भाज्या भेटतात तेव्हा आपण त्या खायला हव्यात.
डॉ. मानसी पाटील
रानभाज्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे या भाज्यांची लागवड केली जात नाही किंवा या शेतात लावल्या जात नाहीत. जंगलात, माळरानांवर या भाज्या नैसर्गिकरित्या उगवतात. त्यामुळे या १०० टक्के नैसर्गिक असतात यावर कोणत्याच प्रकारची फवारणी केली जात नाही. त्यामुळे या भाज्या पोषण तत्वाने परिपूर्ण असतात.
आज आपण अशाच एक रानभाजी विषयी जाणून घेणार आहोत. ती भाजी म्हणजे चिघळ भाजी किंवा घोळ भाजी किंवा चिवळ भाजी. यासारख्या असंख्य नावानी ही भाजी ओळखली जाते. हिंदीमध्ये या भाजीस कुल्फा सब्जी म्हटले जाते. ही भाजी फक्त पावसाळ्यात भेटते. चिवळ ही वनस्पती ओलसर, पाणथळ जागेत शेतात व बागेत तण म्हणून वाढते. चिवळ कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश या ठिकाणी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात वाढते.
शास्त्रीय नाव: Portulaca oleracea
स्थानिक नाव : घोळ, मोठी चिवई उपयोगी भाग : पान, खोड
औषधी उपयोग : हृदय आरोग्य, मूळव्याद, डोळे, त्वचाविकार, एनिमिया, वजन कमी करणे यात उपयोगी
ही वर्षायू वनस्पती जमिनीवर पसरत वाढते. ही वनस्पती अगदी नाजूक असते. खोडांचा, फांद्यांचा व पानांचा आकार लहान असतो. या भाजीत अनेक पोषक तत्वे असतात. यामध्ये व्हिटॅमिन्स, फायबर, प्रोटिन्स मोठ्या प्रमाणात असतात. ही भाजी चवीला थोडीशी बुळबुळीत व मातकट असते. या भाजीमध्ये शुन्य टक्के फॅट्स असतात. पचनास अतिशय सोप्पी असते. ही भाजी खाल्यामुळे यकृताचे कार्य सुधारते. या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए , व्हिटॅमिन सी हे देखील असतात.
व्हिटॅमिन ए चा मोठा स्रोत –
चिघळ या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असते. १०० ग्रॅम भाजीमध्ये १३२०iu व्हिटॅमिन ए मिळते. त्वचेच्या व डोळ्यांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन ए खूप महत्वपूर्ण आहे. तोंडाचा व फुफ्फुसाचा कर्करोग कमी होण्याची शक्यता देखील फार कमी असते.
वजन कमी कारण्यासाठी –
या भाजीमध्ये व्हिटॅमिन ,फायबर ,प्रोटीन यांचे प्रमाणत जास्त असते. त्यामुळे ही भाजी पचनास देखील उत्तम असते. या भाजीतून केवळ १८ टक्के कॅलरीज मिळतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी व नियंत्रित ठेवण्यासाठी चिघळ ही रानभाजी खावी.
हिमोग्लोबिन वाढते-
लोह व तांब्याचे प्रमाण अधिक असल्यामूळे ज्यांच्यामध्ये हिमोग्लोबिन कमी असते अशा लोकांनी ही भाजी जरूर खावी. त्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती देखील वाढेल. ज्या लोकांना ऍनिमिया असेल अशांनी तर या भाजीचे सेवन नक्की करावे. यामध्ये तांबे असते त्यामुळे रक्तातील अशुद्धी दूर होते. त्यामुळे ही भाजी रक्त वाढीसाठी उत्तम आहे.
मुळव्याधावर रामबाण उपाय –
जर तुम्हाला मुळव्याधाचा त्रास असेल तर ही भाजी नक्की खा. यामुळे तुम्हाला साफ लघवी होते. जर लघवी होताना जळजळ होत असेल तर तुम्ही ही भाजी खा. यामुळे तुमचा त्रास बराच कमी होईल. ज्यांना मुतखडा असेल अशा लोकांनी ही भाजी खाणे टाळावे. पालेभाज्यांमध्ये अल्फा लिनॉलेनिक असिड ( precursor of omega 3 fatty acids) असते. ओमेगा 3 फॅटी असिड्सचा उपयोग शरीराची वाढ व विकास तसेच हृदयविकार, उच्चरक्तदाब, मधुमेह, कर्करोग, संधिवात इतर आजारांसाठी होतो.
चिघळ व्यतिरिक्त चिऊ भाजी, तांदुळजा, चवलाई, लाल पोकळा, आंबूशी, लसणाची पात, मोरशेंड, गोठण वेलीचे लाल कोंब, भारंगीच्या कोवळ्या फांद्या, बांबूचे कोंब, चवळी शेंगा कोंब, हळदीचे पान या भरपूर स्थानिक हिरव्या पालेभाज्या आहेत.
घोळापासून भाजी कशी तयार करायची अर्थात पाककृती
• सर्वात पहिले घोळ निवडून घेणे. निवडलेली पान पाण्या खाली स्वच्छ धुवून घेणे.
• कढई मध्ये एक चमचा तेल टाकायचं, त्या मध्ये जीरा आणि हिंग टाकायचं.
• जीरा ताडताडला की हिरव्या मिरच्या टाकायच्या.
• मिरच्या भाजल्या की त्यात बारीक कापलेला कांदा घालायचा.
• कांद्याचा रंग बदलला की त्या मध्ये धुतलेली घोळ ची पाने घालायची आणि भाजी हलवायची.
• शेवटी भिजवलेली मूग डाळ घालायची. पाणी घालायची गरज नसते करण घोळच्या पानं मध्ये पाणी असता, भाजी शिजताना पाणी सोडते.
• कढई झाकून मंद आचेवर 5-10 मिनिटे भाजी शिजू द्यावी.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.