अंकितम या कादंबरी लिहिण्यामागचा लेखिका धनश्री खाडे यांचा उद्देश ऐका सागर माने यांच्या आवाजात….

जीवनाकडे पाहण्याचा एक चांगला सकारात्मक दृष्टिकोन
धनश्री खाडे यांची 'अंकितम' ही कादंबरी इचलकरंजी येथील तेजश्री प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेली आहे. मानवी जीवनात प्रेम ही अनिवार्य बाब आहे. या जगात प्रेम केलं नाही, असा कोणीही सापडणार नाही. या कादंबरीमध्ये लेखिकेने स्वानुभावाला कलात्मक अनुभवाचे रूप दिलेले आहे. त्यामुळे आशय गाभ्यातील अनेक घटना प्रसंग हे हृदयस्पर्शी आहेत. अनुभवाची एक खरी जातकुळी त्यांच्या लेखनातून पानोपानी आपल्याला प्रत्ययाला येते आणि त्यामुळे ही कादंबरी महत्त्वाची वाटते.
दुसऱ्या बाजूला ही कादंबरी आत्मचरित्रात्मकही झालेली नाही. त्यामुळे तिचं कादंबरीपण हे जिवंत आहे. ती अधिक वाचनीय आहे. लेखिकेच्या पुढील अनेक लेखनाची बीजे अशा सुप्त अनुभवांमध्ये लपलेली आहेत. तिच्या मनातील असणारी अनेक स्पंदने या कादंबरीच्या रूपाने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा, निराशा, सुखदुःख, वेदना, संवेदना या सगळ्यांना साकार करत या कादंबरीची शब्दकळा उजळली आहे. सुंदरपणे ती आकाराला आणली आहे. ही कादंबरी केवळ निराशावादी, नकारात्मक दृष्टिकोन न देता जीवनाकडे पाहण्याचा एक चांगला सकारात्मक दृष्टिकोन देते, हे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे ती प्रेरणादायी आहे.
जीवनामध्ये अपयश पचवून जिद्दीने उभे राहून जीवनात यश मिळवायला हवं. असा एक संदेश या कादंबरीच्या निमित्ताने लेखिकेने दिलेला आहे हे महत्त्वाचे.
बाळासाहेब लबडे
"अंकितम"ही धनश्री खाडे लिखित कादंबरी नुकतीच वाचनात आली. या ही कादंबरी म्हणजे एका प्रेम कहाणीची उत्कंठा वाढविणारा प्रेम, संघर्ष, त्याग, याचा समिश्र पट आहे. या कादंबरीची नायीकेने तिच्या प्रेमासाठी केलेला तडजोडी बरोबर वेळ पडली तेव्हा केलेला संघर्ष आणि शुद्ध शुभ्र आणि नितळ निर्मळ प्रेम जेव्हा मिळण्याची वेळ समिप येते तेव्हा या प्रवासात त्या प्रेमाबद्दलची अनिश्चिता हतबल करते. तेव्हा पवित्र प्रेमाचा तिरस्कार सुध्दा करू वाटत नाही, इतकी नायीका शांत रहाते.
प्रेम ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. आणि ती प्रत्येकाच्या आयुष्यात येते. त्या गुलाबी दिवसात मनावर उमटलेले ओरखडे हे आयुष्यभर साथ करतात. असाच एक कोवळ्या मनावर उमटलेला ओरखडा या कादंबरी मधून वाचकांच्या भेटीला आला आहे. कॉलेज वयातील प्रत्येक मुला-मुलीने वाचायला हवी अशी ही तरूण कादंबरी आहे असं म्हणावे लागेल.
तेजश्री प्रकाशनाची ही निर्मिती असून मुखपृष्ठ किशोर माणकापुरे याचे आहे. आपल्या मनाच्या कोपऱ्यात घट्ट घर करणारी आपल्याला हुरहूर लावणारी एक जिवंत कादंबरी वाचल्याचा तर, काही प्रश्न समोर उभे करण्याचा ही कादंबरी नक्कीच प्रयत्न करते.
या कादंबरीची लेखिका तरूण असून त्यांची ही साहित्य विश्वातील पहिली साहित्य कृती आहे. आज कसदार लेखकाला सुध्दा शंभर दीडशे पाने बैठक मारून लिहिण्याचे कसब आहे असे दिसत नाही परंतु एकूण ३२८ पानांची ही कादंबरी या मुलीने लिहून तिची चुनूक दर्शिवली आहे, हे कौतुक करावे तितके कमीच आहे.
कवी अभिजित पाटील
पुस्तकाचे नाव – अंकितम ( कादंबरी )
लेखिका – धनश्री खाडे ९५९५५ ५६२२६
प्रकाशक – तेजश्री प्रकाशन, इचलकरंजी
किंमत – ५०० रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.

