अननस …किती सरस
अननस हा व्हिटॅमिन सीचा तगडा पुरवठादार आहे. त्वचा तरुण दिसण्यासाठी अननस जरूर खा. यातील मंगेनिज तुमची हाडे बळकट ठेवते. दीर्घ काळ परिणाम करणारे अँटी ऑक्सीडेंटस यात आहे. अननसातील ब्रोमेलाईन हा घटक प्रोटीन पचायला मदत करतो. अननस कॅन्सरला प्रतिबंध करतो. यातील पोटॅशियम रक्तदाब सांभाळते आणि हृदयाला सुरक्षित ठेवते. सर्वात महत्वाचे म्हणजे अननस मधील सेरोटोनिन हे आनंदी हार्मोन मानसिक ताण कमी करायला मदत करते. तरुण आणि आनंदी राहण्यासाठी अननस नक्की खा !
डॉ. प्रिया दंडगे
स्नेह क्लिनिक ,ताराबाई पार्क
सासने ग्राउंड जवळ ,कोल्हापूर
9623895866
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.