February 22, 2024
Birds Found in Fields in Vidharbha Region Research article
Home » विदर्भातील शेतीक्षेत्रात आढळतात ‘हे’ पक्षी
संशोधन आणि तंत्रज्ञान

विदर्भातील शेतीक्षेत्रात आढळतात ‘हे’ पक्षी

विदर्भातील शेतीमध्ये कोणते पक्षी आढळतात? या पक्षांची वैशिष्ट्ये काय आहेत? कोणत्या पिकांमध्ये कोणते पक्षी आढळतात? यासंदर्भात पक्ष्यांची जैवविविधता मांडणारा शोधनिबंध ‘न्यूज लेटर्स फॉर बर्ड वॉचर्स’ यामध्ये प्रकाशित झाला आहे. संशोधक डॉ. राजू कसंबे, नंदकिशोर दुधे, डॉ. गजानन वाघ, डॉ. मनोज काळे, किरण मोरे यांनी यासंदर्भात विदर्भातील चार जिल्ह्यांतील सहा विभागांत पाहणी केली आहे. काय आहे हे संशोधन आणि हा अभ्यास का गरजेचा आहे ? हे सांगणारा हा लेख…
राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

महाराष्ट्रातील शेतीप्रदेशात प्रामुख्याने १०२ पक्षी प्रजातींची नोंद झाली आहे. हे सर्वच पक्षी सरसकट पिकाचे नुकसान करतात, असा ठपका ठेवणे मात्र चुकीचे आहे. सध्या कीडनाशक आणि अन्य रासायनिक फवारण्यांमुळे पक्ष्यांच्या प्रजननावर थेट परिणाम होताना पाहायला मिळत आहे. पक्ष्यांची संख्या घटत असल्याचेही दिसून येत आहे. अशावेळी पक्ष्यांच्या वास्तवाला धोका पोहोचू शकतो; पण पक्षी नष्ट झाले तर याचा फटका उलटा पिकांना होणार आहे हे लक्षात घ्यायला हवे. जैवविविधतेच्या दृष्टीने तसेच अन्नसाखळीतील एक महत्त्वाचा घटक म्हणून पक्ष्यांकडे पाहणे गरजेचे आहे.

याबाबत माहिती देताना डॉ. राजू कसंबे म्हणाले, काही पक्षी ‘बिजाहारी’ असतात याचा अर्थ ती प्रजाती शेतीसाठी नुकसानकारकच आहे असे म्हणणे चुकीचे आहे. अनेक पक्षी शेतातील उभ्या पिकावरील धान्य खात नसून, शेतातील पिकांची काढणी झाल्यानंतर शेतजमिनीवर पडलेले दाणेही टिपतात. त्यामुळे असे पक्षी शेतातील पिकाला नुकसान पोहोचवत नाहीत. पक्ष्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन ते शेतकऱ्यांचे मित्र व उपयोगी आहेत असाच असायला हवा. याच अनुषंगाने विदर्भातील पक्ष्यांचा आम्ही अभ्यास केला आहे.

पिकांची हानी करतात म्हणून अमेरिकेतील नागरिकांनी ‘कॅरोलीना पॅराकिट’ या सुंदर पोपटाची प्रजाती १९१८ मध्ये नष्ट केली गेली, असे सांगितले जाते. काही संशोधकांच्या मते प्राण्यातील रोग या पक्ष्यास झाल्याने ही प्रजाती नष्ट झाली, असे मत नोंदवले आहे, पण आता अनुवंशिक विश्‍लेषणावरून पक्षी नष्ट होण्यामागचे नेमके कारण आता स्पष्ट झाले आहे. आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या एका गटाने कॅरोलीना पॅराकिट जीनोमचा क्रम लावला आणि पक्ष्यांची झपाट्याने होणारी घट मानवी हस्तक्षेपामुळे असल्याचा निष्कर्ष काढला आहे. वाढते औद्योगिकीकरण आणि वसाहती यास कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात करंट बायोलॉजी जर्नलमध्ये यासंदर्भातील शोधनिबंध प्रकाशित झाला आहे, असेही डॉ. कसंबे यांनी सांगितले.

तसेच माओच्या आदेशानुसार चिनी नागरिकांनी १९५८ मध्ये चिमण्यांची प्रचंड प्रमाणात कत्तल केली होती, पण याचा उलट परिणाम झाला. चीनला मोठ्या उपासमारीचा सामना करावा लागला होता. त्यात लाखो लोकही मृत्युमुखी पडले होते. कारण, या चिमण्या पिकांचे केवळ दाणे खात नव्हत्या तर पिकातील कीटकही खात होत्या. चिमण्या मारल्याने पिकांवर मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव झाला. अन् पिकांचे मोठे नुकसान झाले. साहजिकच, याचा परिणाम चीनमध्ये उपासमारीची वेळ आली, असेही डॉ. कसंबे म्हणाले.

यासाठी पिकातील पक्ष्यांचे महत्त्व विचारात घेण्याची गरज आहे. याच अनुषंगाने विदर्भातील अमरावती, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर या चार जिल्ह्यांतील पक्ष्यांच्या जैवविविधतेचा अभ्यास डॉ. राजू कसंबे, नंदकिशोर दुधे, प्रा. गजानन वाघ, मनोज काळे, किरण मोरे या संशोधकांनी केला. डॉ. कसंबे आणि वाडटकर यांनी २००३ मध्ये अमरावती जिल्ह्यातील पोहरा-मालखेड संरक्षित वनक्षेत्रात पक्ष्यांच्या १७१ प्रजाती नोंदविल्या होत्या. तर, २०१२ मध्ये चंद्रपूर विभागात १२५ प्रजातींची नोंद नरवाडे आणि राम्हाणी यांनी केली आहे. या नोंदीची मदत या संशोधनात झाली.

पिकातील पक्ष्यांचा सर्व्हे या ठिकाणी झाला :

जिल्हानिहाय सर्व्हे झालेली गावे अन् पिके

जिल्हा………………………गावे…………………………पिके

अमरावती जिल्हा – वालगाव, झाडगाव, भांखेड – तूर, कापूस, सोयाबिन, ज्वारी, मुग
यवतमाळ जिल्हा – दरव्हा तहसील – तूर, कापूस, ज्वारी, मुग, बाजरी
नागपूर जिल्हा – कोरडी – भात
चंद्रपूर जिल्हा – वरोरा तहसील – भात, सोयाबिन

सर्व्हेमध्ये नोंदवण्यात आलेले प्रमुख मुद्दे :

  • विदर्भ भागात सर्व पिकांमध्ये सर्व्हे कालावधीत ४१ कुळांतील ९५ प्रजांतींची नोंद करण्यात आली. यामध्ये पक्ष्यांच्या ३८ प्रजाती या कीटक खाणाऱ्या आढळल्या. त्या खालोखाल २० प्रजाती या बिजाहारी असल्याचे आढळले तर १६ प्रजाती मांसाहारी, १३ प्रजाती सर्व प्रकारचे भक्ष्य खाणाऱ्या, ६ प्रजाती फळे खाणाऱ्या, तर दोन प्रजाती मध खाणाऱ्या आढळल्या आहेत.
  • नोंदविण्यात आलेल्या ९५ प्रजातींपैकी ७६ प्रजाती या स्थानिक असल्याचे नोंदविण्यात आले. हिवाळ्यात स्थलांतरित करणाऱ्या १९ प्रजाती आढळल्या.
  • ज्वारीवर सर्वाधिक ७८ प्रजातींची नोंद करण्यात आली. त्याखालोखाल बाजरीमध्ये ६४, भातामध्ये ५८, सोयाबिन ५०, कापूस ४६, मुग ४५ आणि तूर ४५ यांची नोंद झाली. तर, ३५ प्रजाती ह्या सर्व पिकांत आढळत असल्याची नोंद करण्यात आली आहे.

संशोधकांना विविध पिकांमध्ये आढळलेले पक्षी असे :

१. कॅटल इग्रेट – Bubulcus ibis – मांसाहारी – भात, सोयाबिन
२. लिटल इग्रेट – Egretta garzetta – मांसाहारी – भात, सोयाबिन
३. इंडियन पॉन्ड हेरॉन – Ardeola grayii – मांसाहारी – भात
४. वुली नेकेड स्ट्रोक – Ciconia episcopus – मांसाहारी – भात, सोयाबिन
५. ब्लॅक आयबीस – Pseudibis papillosa – मांसाहारी – भात
६. ब्लॅक हेडेड आयबिस – Threskiornis melanocephalus – मांसाहारी – भात
७. ब्लॅक शोल्डर्ड किट – Elanus axillaris – मांसाहारी – सर्व पिकांमध्ये
८. व्हाईट आईड् बुझ्झर्ड – Butastur teesa – मांसाहारी – सर्व पिकांमध्ये
९. शिकरा – Accipiter badius – मांसाहारी – सर्व पिकांमध्ये
१० . कॉमन केस्ट्रल – Falco tinnunculus – मांसाहारी – सर्व पिकांमध्ये
११. ग्रे फ्रॅनकोलिन – Francolinus pondicerianus – बिजाहारी – ज्वारी, सोयाबिन, तूर, कापूस, मुग, बाजरी
१२. रेन क्वेल – Coturnix coromandelica – बिजाहारी – ज्वारी, सोयबिन, तूर, कापूस, मुग, बाजरी
१३. पेंटेड फ्रॅकोलिन – Francolinus pictus – बिजाहारी – ज्वारी, सोयबिन, तूर, कापूस, मुग, बाजरी
१४. जंगल बुश क्वेल – Perdicula asiatica – बिजाहारी – ज्वारी, सोयबिन, तूर, कापूस, मुग, बाजरी
१५. बॅरेड बटनक्वेल – Turnix suscitator – बिजाहारी – ज्वारी, सोयबिन, तूर, कापूस, मुग, बाजरी
१६. कॉमन क्रेन – Grus grus – सर्वभक्षी – तूर
१७. माळढोक ( ग्रेट इंडियन बुस्टर्ड) – Ardeotis nigriceps – कीटकभक्षी – भात, सोयाबिन
१८. लेसर फ्लोरिकन – Sypheotides indica – कीटकभक्षी – सोयाबिन
१९. व्हाईट-ब्रेस्टेड वॉटरहेन – Amaurornis phoenicurus – सर्वभक्षी – भात
२०. रेड वॉटल्ड लॅपविंग – Vanellus indicus – कीटकभक्षी – भात
२१. रॉक कबूतर – Columba livia – बिजाहारी – ज्वारी, भात
२२. पिवळ्या-पायांचे हिरवे-कबूतर – Treron phoenicoptera – फलाहारी – ज्वारी, भात
२३. युरेशियन कॉलर्ड डव्ह – Streptopelia decaocto – बिजाहारी – ज्वारी
२४. लाफिंग डव्ह ( हसणारा कबूतर) – Spilopelia senegalensis – बिजाहारी – ज्वारी, बाजरी
२५. रेड कॉलर डव्ह – Streptopelia tranquebarica – बिजाहारी – ज्वारी
२६. स्पॉटेड डव्ह – Streptopelia chinensis – बिजाहारी – ज्वारी, बाजरी
२७. प्लम-हेडेड पॅराकिट – Psittacula cyanocephala – बिजाहारी – ज्वारी, बाजरी, तूर, मुग
२८. रोज रिंग्ड पॅराकिट – Psittacula krameri – फलाहारी – ज्वारी, बाजरी, तूर, मुग
२९. अलेक्झांड्रीन पॅराकिट – Psittacula eupatria – फलाहारी – ज्वारी
३०. राखाडी पोट असलेली कोकिळ – Cacomantis passerines – कीटकभक्षी – सर्व पिके
३१. पाईड कोकिळा – Clamator jacobinus – कीटकभक्षी – सर्व पिके
३२. कॉमन हॉक-कोकीळ – Hierococcyx varius – कीटकभक्षी – सर्व पिके
३३. आशियाई कोकीळ – Eudynamys scolopaceus – फलाहारी – सर्व पिके
३४. ग्रेटर कौकल – Centropus sinensis – मांसाहारी – सर्व पिके
३५. बार्न घुबड – Tyto alba – मांसाहारी – सर्व पिके
३६. भारतीय गरुड-घुबड – Bubo bengalensis – मांसाहारी – सर्व पिके
३७. स्पॉटेड घुबड – Athene brama – कीटकभक्षी – सर्व पिके
३८. कॉमन हूपो – Upupa epops – कीटकभक्षी – सर्व पिके
३९. इंडियन रोलर – Coracias benghalensis – कीटकभक्षी – सर्व पिके
४०. पांढरा-गळा असणारा किंगफिशर – Halcyon smyrnensis – मांसाहारी – सर्व पिके
४१. कॉपरस्मिथ बार्बेट – Megalaima haemacephala – फलाहारी – सर्व पिके
४२. हिरवी मधमाशी खाणारा – Merops orientalis – कीटकभक्षी – सर्व पिके
४३. युरेशियन राईनेक – Jynx torquilla – कीटकभक्षी – सर्व पिके
४४. ब्लॅक-रम्प्ड फ्लेमबॅक – Dinopium benghalense – कीटकभक्षी – सर्व पिके
४५. वायर-टेल्ड स्वॅलो – Hirundo smithii – कीटकभक्षी – सर्व पिके
४६. रेड-रम्पड स्वॅलो – Cecropis daurica – कीटकभक्षी – सर्व पिके
४७. पिवळा वॅगटेल – Motacilla flava – कीटकभक्षी – भात
४८. ग्रे वॅगटेल – Motacila cinerea – कीटकभक्षी – भात
४९. पांढरा वॅगटेल – Motacila alba – कीटकभक्षी – भात
५०. भातशेती पिपीट – Anthus rufulus – कीटकभक्षी – भात
५१. वुडश्राइक – Tephrodornis pondicerianus – कीटकभक्षी – सर्व पिके
५२. तांबडा बुलबुल – Pycnonotus cafer – कीटकभक्षी – सर्व पिके
५३. ब्लॅक रेडस्टार्ट – Phoenicurus ochruros – कीटकभक्षी – सर्व पिके
५४. भारतीय रॉबिन – Saxicoloides fulicatus – कीटकभक्षी – सर्व पिके
५५. ओरिएंटल मॅग्पी रॉबिन – Copsychus saularis – कीटकभक्षी – सर्व पिके
५६. ब्राऊन रॉक (भारतीय) चॅट – Cercomela fusca – कीटकभक्षी – सर्व पिके
५७. कॉमन स्टोनचॅट – Saxicola torquata – कीटकभक्षी – ज्वारी
५८. पाईड बुशचॅट – Saxicola caprata – कीटकभक्षी – ज्वारी
५९. रेड-थ्रोटेड (टाइगा) फ्लायकॅचर – Ficedula albicilla – कीटकभक्षी – ज्वारी
६०. कॉमन आयओरा – Aegithina tiphia – कीटकभक्षी – सर्व पिके
६१. लांब शेपटी असलेला श्रीक – Lanius schach – मांसाहारी – सर्व पिके
६२. बे बॅक्ड श्रीक – Lanius vittatus – कीटकभक्षी – सर्व पिके
६३. दक्षिणी राखाडी श्राइक – Lanius meridionalis – मांसाहारी – भात, सोयाबिन
६४. पांढऱ्या-ब्रोव्ड फॅनटेल – Rhipidura aureola – कीटकभक्षी – सर्व पिके
६५. ब्लॅक रेडस्टार्ट – Phoenicurus ochruros – कीटकभक्षी – सर्व पिके
६६. झिटिंग सिस्टिकोला – Cisticola juncidis – कीटकभक्षी – ज्वारी, बाजरी
६७. आशी प्रिनिया – Prinia socialis – कीटकभक्षी – सर्व पिके
६८. जंगल प्रिनिया – Prinia sylvatica – कीटकभक्षी – ज्वारी, भात, कापूस
६९. प्लेन प्रिनिया – Prinia inornata – कीटकभक्षी – कापूस, ज्वारी
७०. कॉमन टेलरबर्ड – Orthotomus sutorius – कीटकभक्षी – कापूस, ज्वारी, सोयाबिन, तूर
७१. बुटेड वार्बलर – Hippolais caligata – कीटकभक्षी – सर्व पिके
७२. पिवळ्या डोळ्यांचा बाब्बलीर – Chrysomma sinense – सर्वभक्षी – ज्वारी, बाजरी, कापूस, मुग, तूर
७३. कॉमन बाब्बलीर – Turdoides caudate – सर्वभक्षी – ज्वारी, बाजरी
७४. जंगल बाब्बलीर – Turdoides striata – सर्वभक्षी – ज्वारी, बाजरी
७५. लार्ज ग्रे बाब्बलीर – Turdoides malcolmi – सर्वभक्षी – ज्वारी, बाजरी
७६. जांभळा सनबर्ड – Cinnyris asiaticus – मधभक्षी – ज्वारी, कापूस, मुग, सोयाबिन
७७. जांभळ्या रंगाचा सनबर्ड – Leptocoma zeylonica – मधभक्षी – ज्वारी, कापूस, मुग, सोयाबिन
७८. ग्रे-नेक बंटिंग – Emberiza buchanani – बिजाहारी – ज्वारी, बाजरी
७९. ब्लॅक-हेडेड बंटिंग – Emberiza melanocephala – बिजाहारी – ज्वारी, बाजरी
८०. रेड हेडेड बंटिंग – Emberiza bruniceps – बिजाहारी – ज्वारी, बाजरी
८१. भारतीय सिल्व्हरबिल – Lonchura malabarica – बिजाहारी – ज्वारी, भात, बाजरी
८२. लाल मुनिया – Amandava amandava – बिजाहारी – ज्वारी, बाजरी, भात
८३. खवले-स्तन मुनिया – Lonchura punctulata – बिजाहारी – ज्वारी, भात, बाजरी
८४. तिरंगी मुनिया – Lonchura malacca – बिजाहारी – ज्वारी, भात, बाजरी
८५. बाया वेव्हर – Ploceus philippinus – बिजाहारी – ज्वारी, बाजरी, भात, सोयाबिन
८६. चिमणी – Passer domesticus – सर्वभक्षी – ज्वारी, बाजरी
८७. चेस्टनट-शोल्डर्ड पेट्रोनिया – Petronia xanthocollis – बिजाहारी – ज्वारी, बाजरी
८८. मैना – Acridotheres tristis – सर्वभक्षी – सर्व पिके
८९. रोझी स्टारलिंग – Sturnus roseus – सर्व भक्षी – ज्वारी, बाजरी
९०. आशियाई पाईड स्टारलिंग – Sturnus contra – सर्वभक्षी – ज्वारी, बाजरी
९१. ब्राह्मणी स्टारलिंग – Temenuchus (Sturnia) pagodarum – सर्वभक्षी – ज्वारी, बाजरी
९२. चेस्टनट-टेल्ड स्टारलिंग – Sturnus malabaricus – फलाहारी – ज्वारी, बाजरी
९३. ब्लॅक ड्रोंगो – Dicrurus macrocercus – कीटकभक्षी – सर्व पिके
९४. कावळा – Corvus splendens – सर्व भक्षी – ज्वारी, बाजरी
९५. मोठ्या आकाराचा कावळा – Corvus macrorhynchos – सर्वभक्षी – भात, ज्वारी

Related posts

कपाशीवरील फुलकिडींचे नियंत्रण

मध्ययुगीन मराठी संत कवयित्रींची काव्यधारा

उन्हाळी मिरचीमधील फुलगळ अशी रोखा…

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More