सातारा – येथील ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयातर्फे 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या काळात प्रसिद्ध झालेल्या ग्रंथातील दोन ग्रंथाना ‘ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण’ आणि ‘ सौ सुमन चव्हाण’ उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार दिले जाणार आहेत. तरी या स्पर्धेसाठी इच्छुक लेखकांनी पुस्तके पाठवावीत असे आवाहन ग्रंथालयातर्फे करण्यात आले आहे.
ग्रंथमित्र डॉ. चव्हाण यांनी महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळीला योग्य दिशा दिली होती. तसेच सातारा जिल्हा ग्रंथालय संघाचे व ग्रंथालय चळवळीचे ते मार्गदर्शक होते. सातारा येथे भरणाऱ्या जिल्हा ग्रंथमहोत्सवाचे ते संस्थापक अध्यक्ष व प्रेरणास्थान होते. यासाठी त्यांच्या स्मरणार्थ तसेच त्यांच्या पत्नी सुमन चव्हाण यांच्या स्मरणार्थ गेली पंधरा वर्षे हे साहित्य पुरस्कार दिले जातात. तरी महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील इच्छुक लेखकांनी 2025 मध्ये प्रकाशित झालेल्या आपल्या ग्रंथांच्या दोन प्रती 20 जानेवारी 2026 पर्यंत पाठवाव्यात. दोन उत्कृष्ट ग्रंथाना प्रत्येकी 2500 रुपये रोख बक्षीस दिले जाते. कोणत्याही साहित्य प्रकारातील स्वलिखित अथवा अनुवादित पुस्तके पुरस्कारासाठी ग्राह्य धरली जातात. या संदर्भात अधिक माहितीसाठी सुनिता कदम – 9822112155, डॉ. राजेंद्र माने 8975981321, प्रा. प्रमोदिनी मंडपे – 8600101063, डॉ. सौ. सुनीता उत्तेकर – 9422401704, डॉ. वैशाली चव्हाण – 98239 86280 यांच्याशी संपर्क साधावा.
पुस्तक पाठवण्यासाठी पत्ता :
ग्रंथमित्र डॉ शिवाजीराव चव्हाण ग्रंथालय
C/O डॉ. अनिमिष शिवाजीराव चव्हाण,
मैत्र क्लिनिक
रुक्मिणी कुंज, सावकार रोड, गुरुवार पेठ,
सातारा – 415002
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
