July 2, 2025
Author Uday Jadhav with Chinmayee Sumeet and Ajay Kandar at the book launch of Gargi and Other One-Act Plays at Ravindra Natya Mandir.
Home » उदय जाधव यांच्या ‘ गार्गी आणि इतर एकांकिका’ ग्रंथाचे प्रकाशन
काय चाललयं अवतीभवती मनोरंजन

उदय जाधव यांच्या ‘ गार्गी आणि इतर एकांकिका’ ग्रंथाचे प्रकाशन

गार्गी आणि इतर एकांकिका

मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक उदय जाधव यांच्या ‘ गार्गी आणि इतर एकांकिका’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा रविवार २९ जून रोजी मुंबई रवींद्र नाट्य मंदिर मध्ये लोकप्रिय अभिनेत्री चिन्मयी सुमित आणि नामवंत कवी – नाटककार अजय कांडर यांच्या उपस्थित होत आहे. या निमित्ताने या ग्रंथाच्या लेखकाचे मनोगत….

‘गार्गी आणि इतर एकांकिका’, ह्या संग्रहात समाविष्ट झालेल्या ५ एकांकिकाचे विषय हे आजच्या काळात नाविन्यपूर्ण आणि अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि कसदार कलाकार म्हणून ते तितकेच आव्हानात्मकही आहे. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या अनपेक्षित घटना आणि त्याभोवती गुरफटत जाणारं आयुष्य व परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या, अंतर्मुख होतं राहणाऱ्या ह्या सर्वार्थानं प्रयोगशील एकांकिका आहेत.

‘गार्गी’, ह्या निरागस मुलीचा, शोध घेत असतां; त्यात येणारी पात्र, त्यांचे प्रसंगरूप येणारे विचार, भूमिका आणि त्यामागे येणारी हतबलता ठळक दिसते. नांत्यांची नाळ दूर करण्याची गरज नाट्यमय होताना, सतत मनाची घालमेल होत राहते. तर ‘सचित्तपरियोदपन’ मधील पर्ण, आपल्या अगाध मैत्रीनं, वैश्विक शांतीच्या बांधिलकीने अनेक नक्षलग्रस्त मनाला उभारी, प्रेरणा आणि वैचारिक अधिष्ठान देते. तर ‘चस्का’ मधल्या तरुणाईचं रेल्वेच्या फलाटासारखं मर्यादित असलेलं जग अनेक प्रवासासाठी खुलं आहे. मात्र तरीही परिस्थितीने बेफिकीर असलेल्या ह्या तरुणाईत कायम मैत्रीतली सुंदरता अबाधीत आहे. ‘क्वीनसलँड’ मधील बयो आणि राणी आपल्या दूर देशी, न येणाऱ्या राजपुत्राची डोळ्यांची वात करून आतुरतेने वाट पाहत आहेत. मानवी मनाचा ठाव आणि जगण्याची धडपडत घेऊन ‘मौनांतराचे पाहारेदार’, मधल्या एकांकिकेतला कोकणातला तरुण ऋषी भेटतो;
गावं ते शहर आणि दिवसागणिक विकसित होतं जाणारी माणसं, आणि त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न. आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी, यंत्र युगात धावताना काही सहज गळून पडणाऱ्या नात्याला आणि मृत्यूच्या परिघाभोवती रिंगण घालणाऱ्या माणसांना, दूर फेकून दिल्याशिवाय ऋषीकेशला पर्याय उरत नाही; आणि मग उरतात बोचऱ्या आठवणी आणि पडक्या घराचा उद्धवस्त होतं जाणारा चौथरा. आपुलकी, प्रेम, नाती आणि आधुनिक काळातीलं नवनवीन आकलनाच्या दिशा शोधण्याऱ्या ह्या सुजाण, नव्या आव्हानात्मक पिढीला; भान देणाऱ्या ह्या एकांकिकेका आहेत.

ह्या संग्रहातल्या एकांकिकाचे अनेक ठिकाणी प्रयोग झालेले आहेत, बक्षिस पात्र आहेत आणि त्याला रसिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसादही मिळालेला आहे. आवाहनात्मक रंगकर्मी कलाकार मित्र-मैत्रिणीना, पुस्तकं स्वरूपात ह्या एकांकिका सुपुद करत असतानाच, त्या बंधीस्त न राहता, सतत प्रयोगशील राहतील आणि रसिकांनासह, वाचकांच्या मनाला आनंद देतं ठाव घेतील ही अपेक्षा.!!

उदय जाधव हे मराठी रंगभूमीवरील लक्षवेधी तरुण दिग्दर्शकांपैकी एक महत्त्वाचं नाव असून त्यांचे ‘ देवानंप्रिय असोक’ हे आपल्या मूळ परंपरेचा शोध घेणारे वेगळे नाटक बहुचर्चित ठरले आहे. सम्राट अशोकाच्या विषयावर, अभिव्यक्ती आणि कलात्मक स्वातंत्र्याचा गैरफायदा न घेता. इतिहासाशी प्रतारणा न करता तो वास्तववादी रंगभूमीवर नाटकं रूपाने मांडणं. हे एक मोठे आव्हान होते हे आव्हान उदय जाधव यांनी यशस्वीरित्या पेलले आहे. तथापि या नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोगही या प्रकाशन सोहळ्यानंतर आयोजित करण्यात आला आहे.

पुस्तकाचे नाव – गार्गी आणि इतर एकांकिका
लेखक : उदय गणपत जाधव
प्रकाशक – बुकस्टार पब्लिकेशन
किंमत – २०० रुपये


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading