उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी रौप्य महोत्सवी आशीर्वाद पुरस्कार २०२४ सोहळा
राजेंद्र घोरपडे यांच्या कृषि ज्ञानेश्वरीस २०१४ सालचा पुरस्कार
कोल्हापुरातील डॉ. अपर्णा पाटील, डॉ. श्रीकांत पाटील, डॉ. मा. ग. गुरव, चंद्रकांत माळवदे यांचाही सन्मान
मुंबई – आशीर्वाद पुरस्कार प्रदान सोहळा वंदना प्रकाशन व महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब यांच्यावतीने शनिवारी ( ३० नोव्हेंबर २०२४) दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रामध्ये संपन्न झाला. डॉ. भालचंद्र मुणगेकर, डॉ. रवींद्र शोभणे, राजीव श्रीखंडे, डॉ. सुनील सावंत, प्रा. रमेश कोटस्थाने, डॉ. बीरेंद्र प्रताप सिंह, सुनीळ सामंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. पूजा काळे यांनी स्वागत केले.
डॉ. सुनील सावंत यांनी प्रास्ताविक केले, ते म्हणाले की नवोदित साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी वंदना प्रकाशन संस्थेची १९८६ मध्ये स्थापना केली. अनेक दर्जेदार पुस्तकांना शासनाचे किंवा प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त होत नाहीत. अशा पुस्तकांना ही पुरस्कार लाभावेत, या हेतूने १९९८ सालापासून उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी आशीर्वाद पुरस्कार देण्यास सुरूवात केली. ह्या स्पर्धेसाठी दर्जेदार प्रकाशन संस्थांनी पुस्तके पाठवून स्पर्धेला व आशीर्वाद पुरस्काराला श्रीमंत व मौल्यवान बनवले.
गुणवंत साहित्यिकांच्या दर्जेदार साहित्याचा गौरव झाला पाहिजे. असा शोध घेता आला पाहिजे. साहित्यिक समाजाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्यांनी सामाजिक नीती मूल्यांची जाणीव ठेवावी तरच समाजात त्यांना मान मिळतो.
जागतिक साहित्याचे अभ्यासक राजीव श्रीखंडे म्हणाले की कलेच्या प्रांतात काळ कितीही कमी असला तरी निर्मिती मागे खूप मोठी साधना असते. मानवी जीवन समृद्ध करण्यात साहित्याचा जनमानसावर मोठा प्रभाव पडतो. अनेक जागतिक लेखकांनी लिहिलेल्या वास्तवाचा परिणाम समाजावर झाला आहे. हुकूमशाहीचा अभ्यास केला तर विविध लेखकांनी लिहिलेला इतिहास खरा होता. भविष्य सूचक साहित्य लिहिणे व सर्व कलांचा, आस्वाद घेणे ही योग्य संस्कृती होय. त्या त्या काळातल्या लेखकांचे उल्लेखनीय साहित्य ही समाजमनाची शक्ती असते.
सूर्य दिसत राहील तोपर्यंत या काव्यसंग्रहामध्ये अनेक वैविध्यपूर्ण कविता आहेत. सामाजिक बांधिलकी ही प्रांतापुरती मर्यादित नाही. कल्पना, प्रतिमा, व्यक्त होण्यामध्ये विविधताआहे. उपदेश करण्याची थोडीशी पद्धत आहे. पण त्यांची आतून तळमळ असल्यामुळे ती त्यांच्या काव्यात दिसून येते. वाचकांनी त्याचा नक्कीच आस्वाद घ्यावा.
राजीव श्रीखंडे
आशीर्वाद पुरस्कार मराठी व इंग्लिश पुस्तके निवडीचे अध्यक्ष रमेश कोटस्थाने यांचे पुरस्कार निवडीचे पत्र त्यांची मुलगी कृष्णा मेंडोंसा हिने वाचून दाखवले.
सुनील सावंत यांच्या बद्दल अनेक आठवणी सांगितल्या आणि साहित्यिक गुणवत्तेशी तडजोड न करता पुरस्काराची निवड केली हे प्रांजळपणे कबूल केले.
आशीर्वाद पुरस्कार हिंदी पुस्तके निवडीचे अध्यक्ष बीरेंद्र प्रताप सिंह म्हणाले की हर लेखक में एक आग सुलगती है ! ती आग त्याला स्वस्थ बसू देत नाही. तेव्हा तो लिहितो. समाज यदी आत्मा है तो साहित्य उसका शरीर है ! साहित्य समाजाचा आरसा असतो. समाजाला मार्ग दाखवणारा दीपक असतो. साहित्यकाराला जो योग्य सन्मान मिळाला हवा तो मिळतो का ? त्या नवलेखकांना नवसाहित्यांना स्थान देतात का ? असा एक प्रश्न त्यांनी समाजासमोर ठेवला.
डॉ. रवींद्र शोभणे म्हणाले, सातव्या वेतन आयोगाचा आनंद कसा असू शकेल तसा हा साहित्याचा आनंद घेणारी मंडळी इथे हजर आहेत. माणसाच्या आवाजावरून त्याचा स्वभाव सहज कळून येतो. सावंतांच्या फोनवरून त्यांचा स्वभाव सांगताना रमेश कोटस्थाने यांच्या घरात हसरे तारे या नाटकाचा उल्लेख केला. रमेश कोटस्थाने यांनी आपल्या मुलीकडे बघून हे नाटक लिहिले असावे असे मला वाटते. बबन प्रभू यांच्या दिनूच्या सासूबाई राधाबाई इत्यादी नाटकांवरून त्या त्या व्यक्तीचा स्वभाव घरी असाच असतो का असा मला प्रश्न पडला. अशी मिश्किल टिपणी करत सरांनी वातावरण हलकं -फुलकं करण्याचा प्रयत्न केला. पुरस्कारासाठी मधला दहा वर्षाचा कालखंड त्यांनी सोडला नाही. कोरोना काळामध्ये अनेक संस्थांनी आपापले पुरस्कार बंद केले ते कायमचे.
राजसत्ता आणि साहित्यिक यांचा अही नकुलाचं नातं आहे, हे कसं आहे ह्या बद्दल शंका घ्यायला वाव असतो. सहसा पटत नाही. यादव राज्यात कवी नरेंद्र राजकवी होते. रुक्मिणी स्वयंवरसाठी राजाने दिलेल्या सुवर्ण मुद्रा त्यांनी नाकारल्या. आमच्या कवी कुळाला कलंक लागेल अशी त्यांची भावना होती. साहित्य हे विकलं जात नाही. त्याने राजा प्रभावित झाला. आमच्या महानुभव सांकेतिक लिपीत गेलेलं साहित्य हे संचित होतं. महत्त्वाच्या साहित्यावर गदा येणे शक्य असतं. साहित्याच्या पाठीमागे उभी राहणारी माध्यम संपली आहेत. साहित्य विषयी माणसं उदासीन होतात तेव्हा समाजातील निष्ठा लयास जातात. लेखकाची कलाकृती वाचल्यावर माणसं का पेटून उठत नाहीत ? दया पवारांचे दलित साहित्य ओळखले गेले तेव्हा साहित्याच्या पाठीशी उभी राहणारी आज माणसं नाहीत. मासिक नाहीत. समाजाची वास्तवता दाखवणे हे काम लेखकांचे असते. पण मुखवट्यावरचे परीक्षण असते. पुस्तके भरपूर लिहिली जातात, पण जागा नाही म्हणून पुस्तकाची चर्चा होत नाही. पुस्तकाचं परीक्षण सविस्तर दिले जात नाही. मेडिकल क्षेत्रातील घडणारे वास्तव तर सत्य वेगळे आहे. तत्वनिष्ठ लेखक साहित्याबद्दल उदासीन होतात. तेव्हा आजचा लेखक चौकस आहे का ? अनेक पुस्तकांना साहित्य पुरस्कार मिळतात. त्यात वाईट पुस्तकांना सुध्दा दर्जेदार संस्थांचे पुरस्कार मिळालेले आहेत. चार पाने वाचल्यानंतर चांगलं पुस्तक काय आहे हे सहज समजून येतं. तटस्थपणे पुस्तक परीक्षण करणे आणि लेखकांच्या मागे उभे राहण्याची वंदना प्रकाशनची प्रवृत्ती डॉ. सुनील सावंतानी स्वीकारली आहे. आकाशातल्या तेजस्वी ताऱ्याचा शोध घेऊन त्यांनी हे पुरस्कार दिले आहेत. त्यांचे कौतुक करावे तेवढं थोडंच आपण बोलत राहिलो, तर अनेक गोष्टी बोलता येतील.
ई साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनीळ सामंत म्हणाले की मला बोलण्याची सक्ती आहे. आपण अपघाताने याकडे कसे आलो हे त्यांनी नमूद केलं. पुस्तक काढणं सोपं असतं. पण पुस्तकाची विक्री करणं खूप अवघड आहे. कुमार केतकर यांनी या व्यासपीठाची कल्पना दिली. ई साहित्य निर्मितीची प्रक्रिया उलगडून सांगितली. 15 मिनिटात एक लाख लोकांकडे पुस्तकं जात. ई साहित्याला पर्याय नाही. याचा प्रसार वेगाने होत आहे.
भालचंद्र मुणगेकर यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सूत्र संचालिका पूजा काळे यांचे विशेष कौतुक केले. मुणगेकर म्हणाले, मी साहित्यावर घडलो मी खरा अर्थतज्ञ. विचारवंत नाही. सामान्यातल्या सामान्य वाचक म्हणून बोलतो. कुलगुरूपदी असताना अनेक कामांचे व्याप असल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत असत. परंतु व्यक्तिगत आयुष्यावर साहित्याचा खूप प्रभाव पडलेला आहे. साहित्यामुळे मी घडलो. सुगरणीचे घरट बांधणे एका चोचीवर असतं. पण माणसाला दहा बोटं असतात त्या दहाही बोटाने काम करण्याचे प्रात्यक्षिक म्हणजे सुनील सावंत. स्वतःसाठी सगळेच जगतात. दुसऱ्यासाठी जगणं हे मेणबत्ती प्रमाणे आहे. मराठी वाचक चोखंदळ आहे. मराठी कार्यक्रमासाठीआज साडे तीन वाजता जमलेले शेकडो लेखक व रसिक पाहून मराठी भाषेच्या भवितव्याविषयी काळजी वाटण्याचे कारण नाही. साहित्यामध्ये प्रचंड ऊर्जा असते. हल्ली माणसं एकत्र येणं कठीण झालंय. पत्र वाचण्याची आतुरता उत्सुकता राहत नाही. मराठी माणसाच्या मनात आजही खांडेकरांना स्थान आहे. त्यांच्या अनेक कादंबऱ्यांवर मी घडलो. मी साहित्याचं अपत्य आहे.
सामाजिक भावना तीन शब्दात त्यांनी संगितल्या. शब्द, अश्रू आणि रक्त. मी सर्वस्व दान करीन पण अश्रू दान करणार नाही. लोकांच्या सुप्त मनातील भावनांचा एकत्रित अविष्कार म्हणजे संस्कृती. समाजातील प्रगती ही त्या समाजातील स्त्रियांच्या उंचीवर ठरते. आजही सातबारे पुरुषाच्या नावावर आहेत. साहित्याचे प्रयोजन माणसाला सुसंस्कृत करते, नीतिमत्ता शिकवते, चांगलं वाईट सांगते. तेच समजण्याचं मोजमाप असते. साहित्यात प्रेमचंद आणि रवींद्रनाथ टागोर यांचा भारतीय ललित साहित्याचा प्रभाव आहे. मी माझ्या श्वासा इतकं मराठी संस्कृतीवर मराठी भाषेवर प्रेम करतो. साहित्याच्या विविध प्रकारातून लेखक विचारवंत साहित्यिक समाजाला प्रगल्भ करू शकतात. साहित्याचे प्रयोजन माणसाला सुसंस्कृत करते, नीतिमत्ता शिकवते, चांगलं वाईट सांगते. समाज बदलण्याची ताकद साहित्यात असून साहित्यक्षेत्रातील लेखकांमध्ये अशी क्षमता हवी. त्यांचा मान हा शासन दरबारी व्हायला हवा. आज शासन आपलं जगणं ठरवत असते, असेही डॉ. मुणगेकर म्हणाले.
एकूणच रौप्य महोत्सवी आशीर्वाद पुरस्कार महाराष्ट्रातील मराठी ५७, ई बुक मराठी १०, हिंदी १३ व इंग्लिश ३ साहित्यिकांना देऊन सन्माननीत करण्यात आले. या कार्यक्रमासाठी देशातून व परदेशातून आलेले अनेक साहित्यिक हजर होते. तसेच लेखनाला वय नसतं ही ऊर्जा वयाच्या ८१ते ९५ वर्षी सुद्धा असते हे लेखकांनी व्यासपीठावर पारितोषिक घेऊन दाखवून दिले. आशीर्वाद पुरस्कार स्वीकारण्यासाठी ९५ वर्षाच्या लेखिका संगीता जोशी ह्या व्यासपीठावर उपस्थित राहिल्या.
आशीर्वाद पुरस्कार सन २०११ ते २०२३
साहित्य प्रकार | पुस्तकाचे नाव | साहित्यिकाचे नाव |
आशीर्वाद पुरस्कार सन २०११ | ||
व्यक्ती चरित्र | दैवी प्रतिभेचा कलावंत -मायकेल अँजेलो | डॉ. माधवी मेहेंदळे |
आशीर्वाद पुरस्कार सन २०१२ | ||
एकही पुस्तक निवडीस पात्र ठरले नाही. | ||
आशीर्वाद पुरस्कार सन २०१३ | ||
कविता संग्रह | व्यासपीठ | गौरी भालचंद्र कुलकर्णी |
कथा संग्रह | स्पर्शभान | शकुंतला कश्यप |
संकीर्ण | आम्ही बी घडलो | रामदास कृष्णा कामत |
काव्य संग्रह | उजेडाचे कवडसे | अनघा तांबोळी |
आशीर्वाद पुरस्कार सन २०१४ | ||
अनुवाद कविता | ती चिनारची झाडे (मूळ हिंदी कवी नरेश अग्रवाल) | रमेश सावंत |
बाल कविता संग्रह | हिरवाई | शोभा नाखरे |
ऐतिहासिक | धाकट्या राणीसाहेब | वर्षा मुळे |
आध्यात्मिक | कृषी ज्ञानेश्वरी | राजेंद्र घोरपडे |
आशीर्वाद पुरस्कार सन २०१५ | ||
बालकविता | आजीच्या हातात दुधाची साय | आनंद श्रीधर सांडू |
कथा संग्रह | जाईचा मांडव | मोहना कारखानीस |
ललित लेख संग्रह | पाठीवरचा चंद्र | अशोक लोटणकर |
आशीर्वाद पुरस्कार सन २०१६ | ||
बाल काव्यसंग्रह | निसर्गकन्या | डॉ. मा. ग. गुरव |
आशीर्वाद पुरस्कार सन २०१७ | ||
ललित लेख | पाचवा कोन….सो व्हॉट! | गीता सुळे |
काव्य संग्रह | अक्षरे मनातली | नीमा चिटणीस |
आशीर्वाद पुरस्कार सन २०१८ | ||
एकांकिका | कथांकिका | राजीव जोशी |
आशीर्वाद पुरस्कार सन २०१९ | ||
आत्मकथन | पांथस्थ | विनायक जोशी |
चरित्रात्मक | द्रष्टा कर्मयोगी – नामदार नाना शंकरशेठ | रवींद्र माहीमकर |
कथा समीक्षा | सावल्यांच्या प्रदेशात – रत्नाकर मतकरी गूढकथा समीक्षा | डॉ. कृष्णा नाईक |
आशीर्वाद पुरस्कार सन २०२० | ||
कादंबरी | लॉकडाऊन | डॉ. श्रीकांत पाटील |
हायकू काव्य संग्रह | हायकू नाद | प्रकाश पोळ |
आशीर्वाद पुरस्कार सन २०२१ | ||
ललित लेख | प्रकाशाचे अंग | अॅन्थनी परेरा |
प्रवास वर्णन | सागरात हिमशिखरे | मेधा आलकरी |
बाल कादंबरी | तिची लॉकडाऊन डायरी | अमित पंडित |
आत्मकथा | समृद्धी खो खो माझा श्वास (शब्दांकन :संतोष सावंत) | समृद्धी लीलाधर पाटील |
कथासंग्रह | मेवा | प्रा. सतीशचंद्र चिंदरकर |
काव्यसंग्रह | स्पर्श | दीपक शेडगे |
आशीर्वाद पुरस्कार सन २०२२ | ||
आत्मकथन | मी जगलो असा की…. | मनोहर धोत्रे |
अनुभव कथन | जिद्द… एका सैनिकाची | सौ. स्वाती सुधीर वैद्य |
अनुभव कथन | लॉक अनलॉक | अजितेम जोशी |
आध्यात्मिक | अष्टपैलू श्री चक्रधर | प्रा. डॉ. किरण वाघमारे |
नाटक | ना ते आपुले | डॉ. विजयकुमार देशमुख |
काव्यसंग्रह | अजून काही भावतं तिला | वीणा विश्वास चव्हाण |
गझल | गजलामृत | डॉ. लक्ष्मण माधवराव शिवणेकर |
ललित | साठवणीतील आठवणी… हलके फुलके | राजश्री वटे |
बालकविता | ज्ञानपोई | अभ्युब पठाण लोहगावकर |
बालकथा | गंमत जंमत | सौ. सायली वैद्य |
बालकादंबरी | राजमाता जिजाई | अशोक बेंडखळे |
संकीर्ण | अशी घडली राजस्विनी | सौ. विजयालक्ष्मी विजय देवगोजी |
संकीर्ण | परस्पर नात्यांचे वर्तुळ – भाग १ | किरण आचार्य |
कथासंग्रह | ब्रेकिंग न्यूज | दत्तात्रय सैतवडेकर |
बालकविता | अक्षरांची कविता | सूर्यकांत मालुसरे |
आशीर्वाद पुरस्कार सन २०२३ | ||
कथा संग्रह | झिरपत येणारे काही…. | विवेक घोडमारे |
कथा संग्रह | नाते अनामिक | संतोष शामराव देसाई |
कथा संग्रह | अनाकलनीय | प्रतिभा सराफ |
आत्म कथन | गोवऱ्या आणि फुले | चंद्रकांत माळवदे |
चरित्रात्मक | बंध रेशमाचे | सौ. लीना सुनील एकबोटे |
चरित्रात्मक | माझा आत्मविकास माझ्या हाती | राजेंद्र जगे |
काव्यसमीक्षा | शरच्चंद्र मुक्तिबोधांची कविता- आस्वाद आणि आकलन | प्रा. प्रमोद नारायणे |
प्रवास वर्णन | सावळ्या विठ्ठलाच्या देशात | वर्षा कुवळेकर |
काव्यसंग्रह | सहाव्या बोटाचा हिरवा कोंब | छाया कोरेगावकर |
गझल | संगीत श्रावणाचे | कमलाकर राऊत |
बालकथा | म्हंजे काय गं आज्जी ? | अनुजा बर्वे |
काव्यसंग्रह | रक्तफुलांचे ताटवे | नोमेश नारायण |
काव्यसंग्रह | अव्यक्ताचे रंग | अनिता देशमुख |
कथासंग्रह (अलक) | सुलानामा | डॉ. राजेश गायकवाड |
कथासंग्रह (अलक) | गुजगोष्टी शतशब्दांच्या | वीणा रारावीकर |
उत्कृष्ट हिंदी वाङ्मय निर्मितीसाठी जाहीर पुरस्कार असे –
पुस्तकाचे नाव | सन | साहित्य प्रकार | साहित्यिकाचे नाव |
हथेली पर चाँद | २०१५ | काव्य संग्रह | डॉ. मृगेन्द्र राय |
शाहिरीनामा- शाहीरी : महाराष्ट्र की लोकगायन परंपरा | २०१६ | विविध (लोककला) | रमेश यादव |
स्पर्श | २०१९ | कहानी संग्रह | अनिता एस कर्पूर ‘अनु |
कविताँगन | २०१९ | काव्य संग्रह | परमजीत कौर |
अनुत्तरित प्रश्न | २०१९ | कथासंग्रह | अनंत के. थत्ते |
राष्ट्रकूट साम्राज्य और जैन धर्म | २०२१ | अनुवाद (इतिहास) | ले. डॉ. नागराजय्य हंप (मूल लेखक अंग्रेजी) अनु. डॉ. प्रतिभा मुदलियार |
घुमक्कड़ का अंतरंग | २०२१ | अनुवाद (आत्मकथा) | ले. कुप्पे नागराज (मूल लेखक कन्नड) अनु. के. एस. करुणालक्ष्मी |
कुटज | २०२१ | काव्य संग्रह | देवेन्द्र प्रकाश सिंह |
राजयोग विश्व | २०२२ | ज्योतिष शास्त्र | रघुवीर खटावकर |
जिया जले – गीतों की कहानियाँ | २०२३ | अनुवाद (फिल्म संगीत) | ले. नसरीन मुन्नी कबीर (मूल लेखिका अंग्रेजी) अनु. युनुस खान |
अम्मा राह देख रही है | २०२३ | अनुवाद (काव्य) | कवयित्री डॉ. अनिता एम. एस. (मूल कवयित्री कन्नड) अनु. डॉ. शाफिया फरहिन |
किरकिरी | २०२३ | कहानी संग्रह | ममता सिंह |
बाप बनाम मैय्या | २०२३ | अनुवाद (जीवनचरित) | डॉ. राजेश गायकवाड (मूल लेखक मराठी) अनुवाद माया महाजन |
उत्कृष्ट इंग्रजी वाङ्मय निर्मितीसाठी जाहीर पुरस्कार असे –
साहित्य प्रकार | पुस्तकाचे नाव | Year | साहित्यिकाचे नाव |
Law Related | The Role of judiciary for Implementation of Pre-conception and Pre-natal Diagnostic Act with special reference to Maharashtra | 2022 1994 | Dr.Ujwala Musale |
Banking Related | Banking – Indian Banking in Retrospect-75 years of Independence | 2022 | Dr.Ashutosh Raravikar |
Novel | Kaveri | 2023 | Aparna Patil |
E-Book – उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीसाठी देण्यात आलेले पुरस्कार असे –
क्र. साहित्य प्रकार पुस्तकाचे नाव साहित्यिकाचे नाव
१) कथा फॉर एव्हरी डॉटर-स्टेशन डायरी – २ रेवण जाधव
आशीर्वाद पुरस्कार सन २०१६
१) अनुभवकथन अविस्मरणीय युगांडा अरविंद साने
२) बालकथा उपद्व्यापी ओवी अनघा हिरे
आशीर्वाद पुरस्कार सन २०१७
१ ) अभ्यासात्मक रसवर्षा भारती बिर्जे-डिग्गीकर
आशीर्वाद पुरस्कार सन २०१८
१) प्रवासवर्णन मध्य भारत माधुरी अरविंद नाईक
आशीर्वाद पुरस्कार सन २०२१
१) विनोदी पुन्हा एकदा असा मी असा मी : भाग १ डॉ. वीरेंद्र वसंत ताटके
२) संकीर्ण कचऱ्यामध्ये लपली आहे लक्ष्मी पंकज कोटलवार
३) संकीर्ण रूपेरी गझल संगीता जोशी
आशीर्वाद पुरस्कार सन २०२२
१) विनोदी लेख हास्यरंगी रंगले श्याम कुळकर्णी
आशीर्वाद पुरस्कार सन २०२३
१) कथासंग्रह मावळतीच्या सावल्या यशवंत कदम
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
1 comment
उत्कृष्ट साहित्य विवेचन