पडवळ
इंग्रजी नाव – Snake gourd
शास्त्रीय नाव: Trichosanthes anguina, ट्रायकोसॅंथेस ॲंग्विना
कुळ Cucurbitaceae ( कुकुरबिटेसी )
पडवळ ही फारशी न खाल्ली जाणारी भाजी आहे. गौरीच्या नैवेद्याला पडवळची भाजी, भरीत जरूर केलं जातं. पडवळ मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आहे ज्यामुळे मुलांची उंची वाढायला मदत होते आणि मोठ्यांची हाडं बळकट होतात पडवळ मुळे साखर नियंत्रित व्हायला मदत होते.
मधुमेहीनी जरूर आपल्या आहारात ही भाजी ठेवावी. भरपूर फायबर्स असल्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते तसेच यात भरपूर पाणी असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी पडवळ उपयोगी ठरतं.
यातील प्रभावी फ्लेवनोईड आणि अँटिऑक्सिडंट तुमच्या त्वचेला एक वेगळाच ग्लो देतात आणि केसांची वाढ करतात.
यात लोह उत्तम प्रमाणात असल्यामुळे ॲनेमिया दूर करायला पडवळ मदत करत.
हिमोग्लोबिन वाढीसाठी औषधे घेत बसण्यापेक्षा पडवळ जरूर खा. स्त्रियांना शक्ती देणारी पडवळ ही भाजी स्त्री शक्तीचा उत्सव साजरा करणाऱ्या गौरीच्या सणामध्ये म्हणूनच नैवेद्याला केली जाते.
डॉ. प्रिया दंडगे
स्नेह क्लिनिक, ताराबाई पार्क ,सासने ग्राउंड जवळ, कोल्हापूर
9623895866
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.