पिक सल्ला (तूर आणि रब्बी ज्वारी )
तूर पिक फुलोरा अवस्थेतील व्यवस्थापन
तूर पीक ५० टक्के फुलोऱ्यात आले असेल, तर ०-५२-३४ या विद्राव्य खताची ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. मर आणि वांझ रोगग्रस्त झाडे आढळल्यास त्यांची उपटून योग्यरीतीने विल्हेवाट लावावी. अशी झाडे खोल खड्ड्यात गाडून नष्ट करावीत.
रब्बी ज्वारी उशिरा पेरणी
पेरणीचा हंगाम जवळपास संपलेला आहे. तथापि, अपरिहार्य परिस्थितीत नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पेरणी करता येते. परंतु खोडमाशीचा प्रादुर्भाव वाढतो, त्यासाठी पेरणीपूर्वी थायमेथोक्झाम (३० एफएस) १० मि.लि. प्रति किलो बियाणे या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. काणी रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गंधक (३०० मेश) ४ ग्रॅम प्रति किलो बियाणे प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर ॲझोटोबॅक्टर किंवा ॲझोस्पिरिलम २५ ग्रॅम आणि स्फुरद विरघविळणार्या जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. रब्बी ज्वारी पेरणीसाठी फुले माऊली, फुले अनुराधा, परभणी मोती या वाणांची निवड करावी. एकरी ४ किलोऐवजी ६ किलो बियाणे वापरावे.
(सौजन्य – कृषक कृषी सल्ला )
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.