October 18, 2024
Training for Street Food Vendors by FSSI
Home » Privacy Policy » एफएसएसआयद्वारे स्ट्रीट फूड विक्रेत्यांकरिता प्रशिक्षण
काय चाललयं अवतीभवती

एफएसएसआयद्वारे स्ट्रीट फूड विक्रेत्यांकरिता प्रशिक्षण

एफएसएसआयद्वारे स्ट्रीट फूड विक्रेत्यांकरिता प्रशिक्षणाचे 8 ऑक्टोबर रोजी नागपूरमध्ये आयोजन; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे हस्ते होणार प्रशिक्षणाचे उद्घाटन

नागपूर – देशात पुढील दोन वर्षात पर्यंत 25  लाख अन्न हाताळणी सुरक्षा संदर्भात प्रशिक्षित स्ट्रीट फूड विक्रेते तयार करणे हे केंद्र सरकारचे लक्ष असून याच अंतर्गत केंद्रीय आरोग्य आणि कुंटुंब कल्याण मंत्रालया अंतर्गत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण – एफएसएसएआय पश्चिम क्षेत्रातर्फे “स्वास्थ्य सुरक्षा संकल्प” हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविल्या जाणार आहे. 8 ऑक्टोबर मंगळवारी रोजी सकाळी 10 वाजता नागपूरच्या  कविवर्य सुरेश भट सभागृह येथे  केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन होणार होणार आहे.

या प्रशिक्षणामार्फत अन्न हाताळणी, त्याची साठवणुक करणे, अन्न तयार करणे आणि सर्वेक्षण करणे यासंदर्भात कार्यरत असलेल्या स्ट्रीट फूड व्यावसायिक यांना अन्नसुरक्षा विषयी  मार्गदर्शक तत्वे उपलब्ध करून देणार असल्याची माहिती भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या सहायक संचालक ज्योती हरणे आणि इतर अधिकाऱ्यांनी आज नागपूरातील पत्रकार परिषदेत आज दिली.

सदर प्रशिक्षणाला नागपुरातून 2 हजार पेक्षा जास्त स्ट्रीट फूड व्यावसायिक आणि विविध व्यावसायिक संघटनेचे सदस्य हजर राहणार आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रमातून प्रत्येक व्यवसायिकांना उच्च दर्जाचे असे प्रशिक्षण मिळणार असून  भारतीय भारतीय अन्न सुरक्षा मानक प्राधिकरणाचे FOSTAC- ‘फॉस्टॅक’ प्रमाणपत्र सुद्धा मिळणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात व्यावसायिकांना तसेच सामान्य जनतेला अन्नातील भेसळ ओळखण्यासाठी डार्ट बुक उपलब्ध करून देण्यात आला असून प्रशिक्षणार्थींना सुरक्षा किट सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

तसेच  ‘सेफ्टी ऑन व्हील्स’ या माध्यमातून अन्नातील भेसळ ओळखण्यासाठीची चाचणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सदर प्रशिक्षण वर्गाला स्ट्रीट फूड व्यवसायिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

स्ट्रीट फूड एखाद्या समुदायाच्या स्वयंपाकाच्या चालीरीती, चव आणि सामाजिक परिस्थितीची  प्रचिती देत असल्याने  हे खादय  सांस्कृतिक वारशाचा एक घटक बनतो.  आपल्या देशात, त्याच्या सुलभता आणि सांस्कृतिक महत्त्वामुळे तो दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे.  स्ट्रीट फूड अधिकाधिक लोकप्रिय होत असताना, ते खाणे सुरक्षित आहे याची खात्री करून घेणे आणि त्यांचा व्यवसाय वाढण्यास मदत करणे ही गरज वाढत आहे.

एफएसएसआयच्या FOSTAC –  कार्यक्रमाचे उद्दिष्ट अन्न सुरक्षा आणि आरोग्यविषयक आवश्यकतांची हमी देण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि क्षमता असलेले अन्न हाताळणाऱ्यांना – रस्त्यावर विक्रेत्यांसह – प्रदान करणे आहे.  यामध्ये वैयक्तिक स्वच्छता, सुरक्षित अन्न हाताळणी आणि अन्न तयार करतांना  अन्न दूषित होण्यापासून रोखणे यासारख्या गोष्टींना संबोधित करणारे प्रशिक्षण कार्यक्रमांचे विविध स्तर समाविष्ट आहेत.  या प्रशिक्षण कार्यक्रमांचा उद्देश अन्न विक्रेत्यांना सरकारने अनिवार्य केलेल्या अन्न सुरक्षा नियमांबद्दल आणि त्यांचे पालन करण्याच्या साधनांबद्दल शिक्षित करणे हा आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading