नागपूर – येथील मारवाडी फाऊंडेशनच्या वतीने समाजप्रबोधनाचे कार्य करणाऱ्या व्यक्तिला थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार दिला जातो. यंदाचा २०२५ चा हा पुरस्कार साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. गिरीश गांधी यांनी दिली आहे.
स्व. प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार या नावे असणाऱ्या या पुरस्काराचे स्वरू एक लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे आहे. 2025 चा ‘‘स्व. प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार“ शिरसाठ यांना देण्यात येत आहे. शिरसाठ हे मराठी लेखक, सामाजिक प्रश्नांचे भान असलेले सजग कार्यकर्ते असून मागील दीड दशकांपासून साधना साप्ताहिकात कार्यरत आहेत. 2013 पासून वैचारिक साधना साप्ताहिकाचे ते संपादक आहेत.
या पुरस्काराचे वितरण गुरुवारी 27 नोव्हेंबर, 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता नागपूर येथील टॅमेरिंड हॉल, चिटणवीस सेंटर सिव्हील लाईन्स येथे दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या हस्ते व वैद्यकीय संशोधक व सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, अशी माहिती डॉ. गांधी यांनी दिली आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
