📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 23, 2026
काय चाललयं अवतीभवती

पुण्यात २८ जुलैला ‘तंजावर मराठा साम्राज्यातील राजांचे योगदान’ पुस्तकाचे प्रकाशन Contributions of Thanjavur Maratha Kings Book Publication

The Marathi edition of Contributions of Thanjavur Maratha Kings by Yuvraj Pratapsinh Sarfoji Raje Bhosale will be launched in Pune on July 28, 2026.

पुणे : तंजावरच्या मराठा साम्राज्याचा वैभवशाली इतिहास मराठी वाचकांसमोर आणणाऱ्या ‘तंजावर मराठा साम्राज्यातील राजांचे योगदान’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंगळवार, २८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.४५ वाजता पुण्यातील भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिराच्या नवमल फिरोदिया सभागृहात होणार आहे.

हे पुस्तक सदर महाल पॅलेस ट्रस्ट, तंजावरचे संस्थापक विश्वस्त युवराज प्रतापसिंह सरफोजी राजे भोसले यांनी इंग्रजीत लिहिलेल्या “Contributions of Thanjavur Maratha Kings” या ग्रंथाचा मराठी संक्षिप्त भावानुवाद असून तो प्रा.डॉ. मनोहर इंगळे यांनी केला आहे.

या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गुरुवर्य सुचेता भिडे-चाफेकर राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून युवराज जयसिंहराजे भोसले (सिनियर भोसला पॅलेस, नागपूर) उपस्थित राहणार आहेत.

पुस्तकाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्तावना लिहिली असून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शुभेच्छा संदेश दिला आहे. पुस्तकाच्या संक्षिप्त मराठी भावानुवादाची जबाबदारी प्रा.डॉ.मनोहर इंगळे यांनी सांभाळली आहे.

पुस्तकाच्या मुखपृष्ठावर तंजावरच्या मराठा राजांची चित्रे असून या ग्रंथात तंजावरच्या मराठा राजांनी कला,साहित्य,संस्कृती,प्रशासन,शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा सविस्तर वेध घेण्यात आला आहे. तंजावरचा इतिहास केवळ तमिळनाडूपुरता मर्यादित नसून संपूर्ण मराठी इतिहासाचा महत्त्वाचा भाग असल्याचे या ग्रंथातून अधोरेखित करण्यात आले आहे.

कार्यक्रमास सायंकाळी ५.४५ होणार असून त्यामध्ये तंजावर राजांच्या स्थापत्यकलेवर आधारित भरतनाट्यम सादर (गुरुवर्य सुचेता भिडे-चाफेकर यांच्या शिष्या भावना अरडे पाटील व डॉ.मानसी परचुरे) करणार आहेत. त्यानंतर पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन होईल.

इतिहास संशोधक,साहित्यप्रेमी,विद्यार्थी आणि मराठा इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

तंजावरचा सांस्कृतिक,पराक्रमी इतिहास निश्चितच प्रेरणादायी आहे.तथापि हा इतिहास फक्त तंजावर,तामिळनाडू किंवा संपूर्ण भारतापुरताच मर्यादित न राहता तो जागतिक पातळीवर सुपरिचित होण्यास तंजावर मराठा साम्राज्यातील राजांचे योगदान या पुस्तकाचे मोठे योगदान राहील याची आम्हांस खात्री आहे. युवराज प्रतापसिंह यांनी तंजावर घराण्याचा आणि तंजावर साम्राज्याचा वस्तुनिष्ठ इतिहास जगासमोर अभ्यासू दृष्टिकोनातून आणला ही एक कौतुकास्पद आणि अभिमानाची बाब आहे.

छत्रपती उदयन राजे भोसले
तंजावरच्या मराठा राजांच्या या बहुआयामी कार्याचा परिचय व्यापक समाजाला करून देण्यासाठी प्रतापसिंह सरफोजी राजे भोसले यांनी इंग्रजीत लिहिलेल्या 'कॉन्ट्रीब्युशन्स ऑफ तंजावूर मराठा किंग्ज'या ग्रंथाचे प्रा.डॉ.मनोहर इंगळे यांच्या अभ्यासपूर्ण आणि अनुभवसिद्ध लेखणीतून साकारलेले 'तंजावर मराठा साम्राज्यातील राजांचे योगदान' हे मराठी रूपांतर महाराष्ट्रातील वाचकांना दक्षिणेतील मराठी साम्राज्याचा वैभवशाली इतिहास नव्याने उलगडून दाखवेल आणि इतिहास संशोधक, विद्यार्थी आणि संस्कृति अभ्यासक यांना निश्चितच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरेल असा दृढ विश्वास वाटतो.

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Related posts

अवकाळीचे वातावरण निवळणार 

पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सफरंचदाची आरास…

सम्यक संबोधी काव्य पुरस्कारासाठी आवाहन

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406