गारगोटी – येथील अक्षरसागर साहित्य मंच यांचे वतीने अक्षरसागर साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके मागविणेत येत आहेत. कादंबरी, कथा कविता, बालसाहित्य (गद्य, पद्य दोन्ही) आणि संकिर्ण (इतर सर्व साहित्य प्रकार) या साहित्य प्रकारांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप असेल.
तरी लेखक, प्रकाशक यांनी 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रती व लेखकाचा अल्पपरिचय दि. 25 डिसेंबर 2025 पर्यंत पोहोचतील अशा रितीने पाठवावीत.
पुस्तके पाठवणेचा पत्ता –
डॉ. मा. ग. गुरव, अध्यक्ष, अक्षरसागर साहित्य मंच,
अनुसया निवास, वाघापूर , ता. भुदरगड, जि. कोल्हापूर – 416209 (संपर्क – 9421114264)
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
