सोलापूर – येथील सप्तर्षी प्रकाशन आणि सप्तर्षी शैक्षणिक आणि सामाजिक संस्था, शब्दशिवार नियतकालिक यांच्यातर्फे मातोश्री सौ. काशीबाई घुले राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार २०२४ साठी लेखक व प्रकाशक यांचेकडून पुस्तके मागवणेत येत आहेत.
कादंबरी, कथासंग्रह, बालसाहित्य, कवितासंग्रह आणि कृषीविषयक लेखन या प्रकारांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत. पुरस्काराचे स्वरुप रोख २000 रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे आहे.
तरी लेखक/ प्रकाशक /संस्था यांनी १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रती व साहित्यिकांचे छायाचित्र अल्पपरिचय ३१ मार्च २०२५ पर्यंत पाठविण्याचे आवाहन संयोजकांच्यावतीने केले आहे.
पुस्तके पाठविण्याचा पत्ता –
सप्तर्षी प्रकाशन, गट नं ८४/२ नवीन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या समोर, दामाजी कॉलेज पाठीमागे, मंगळवेढा, जि. सोलापूर 413305 अधिक माहितीसाठी संपर्क – ☎️ ०२१८८२९९२९५ व्हॉट्सअप – 9804047077
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.