November 21, 2024
Book Review Of Women Power Story Manaswini
Home » स्त्री शक्तीची कथा…मनस्विनी
काय चाललयं अवतीभवती

स्त्री शक्तीची कथा…मनस्विनी

लग्नाच्या पस्तीस वर्षांनंतर मला माझा ‘इकिगाई’ मिळाला. इकिगाई हा जपानी शब्द, ज्याचा अर्थच मुळी आपणच आपल्या आयुष्याचा उद्देश शाेधणे हा आहे. म्हणजे शेवटी काय, इच्छा असेल तर तुम्ही कुठल्याही वयात आपला मार्ग शाेधू शकता. अगदी ‘कधी हाेणार या वयात पुस्तक ?’ अशी कुचेष्टेची वाक्येसुद्धा झेलावी लागतात आणि त्यामुळेच मग आपला उत्साह आणखीच वाढताे आणि त्याचा प्रत्यय म्हणजे माझी तयार झालेली ‘मनस्विनी.’
नयना रेपे

पुस्तकाचा परिचय नयना रेपे यांच्या स्वरात

पुस्तकाचे मुखपृष्ठावरचे हे चित्र – झाेपाळ्यावर झाेके घेणारी एक स्त्री, उद्याची स्वप्नं पाहात निसर्गाच्या सहवासात रमलेली, जिला आयुष्यात उद्या येणाऱ्या कुठल्याही परिस्थितीची कल्पना नाही. मग ती निष्पाप, अल्लड ‘गुंजा’ असेल. किंवा ‘निरर्थक’ची समजूतदार एक नर्स, नवरा नावाच्या व्यक्तीबराेबर आयुष्य काढणारी. स्वत:च्या कामावर प्रेम करत संसाराची जबाबदारी सांभाळत आपला ‘स्वाभिमान’ तुडवला जाताेय हे पाहून तडफडणारी एक काॅन्स्टेबल.

आपला पती आपल्याला परत घेऊन जाईल या अपेक्षेने ‘समर्पित’ झालेली आयुष्याची हाेळी करणारी हाैसा. आणि त्याच काळातली कुसूम एवढं माेठं पाऊल उचलणारी, कुणाची पर्वा न करता एका अनाेळख्या शहरात अनाेळख्या व्यक्तीसाठी धाडस करणारी, ज्याला शब्दच उरत नाहीत.

आयुष्य आपल्याला ओळखता आलं नाही. ‘डिअर जिंदगी’सारखा एखादा डाॅ्नटर माझ्या आयुष्यात आला असता तर कदाचित आयुष्यच बदलून गेलं असतं, असं म्हणणारी मेघा, स्वत:च्या अहंकारापायी आईला दुरावलेली.

गेला काळ परत येऊ शकत नाही म्हणून हळहळणारी, आजच्यापि ढीची ‘अबाेल’ची नायिका. ‘बाबा’ वर रुसलेली, त्याच्या परिस्थितीची जाणीव न झाल्यामुळे बाबावर ‘अबाेला’ धरून बसलेली, जिला वडिलांच्या भावना कधी कळल्याच नव्हत्या.

तेच नवीन पिढीच्या नेहा आणि कशिश, आधुनिक वातावरणात स्वत:ची प्रगती करून घेणाऱ्या पण भावनेने जुन्या संस्कारात अडकलेल्या, त्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडणाऱ्या. लेकीला लिहिलेल्या पत्रात आई आपल्या मुलीला तिच्या नकळत तिच्याकडून हाेणाऱ्या चुका दाखवत आहे. तिचा एक छाेटासा प्रयत्नच मुलीला मानसिक दृष्टीने खंबीर करण्याचा.

तेच ‘बहीण’मध्ये आपल्या सिबलींग बराेबरचं नातं किती मजबूत असायला हवं याची जाणीव हाेते. छाेट्या छाेट्या गैरसमजुतीमुळे आलेला दुरावा, विनाकारणच तुम्हाला आयुष्यात दु:ख देऊन जाताे, कारण तीच
व्यक्ती आयुष्यात तुम्हाला आधार देणारी असते. तिथेच भेटते ‘एकटी’ची मानसी. सगळी नाती सांभाळत आयुष्याच्या एका वळणावर स्वत:ला एका नवीनच नात्यांची ओळख करून देते आणि तरीही स्वत:ला एकटीच समजते.

आणि हाे, मग येते ‘मनस्विनी’, मागच्या आणि आत्ताच्या पिढीत गुरफटलेली, आयुष्याच्या अर्ध्या वाटेवर पाेहचलेली, विचारांनी थाेडी पुढे गेलेली, स्वत:ला ओळखण्याची धडपड करता करता भावनेच्या भरात
वाहात चाललेली, कुठेतरी पुरुषी अहंकाराला ताेंड देत मनाबराेबर शरीराला वाटलेल्या आकर्षणाला ‘नॅचरली’ असं नाव देणारी आणि शेवटी ‘चांगला मित्र मिळाला’ अशी मनाची समजूत घालणारी.
प्रत्येक काळ स्त्रीच्या सहनशक्तीला कसाला लावणारा; मग ती ‘सीता’ असेल ‘द्राैपदी’ असेल किंवा आजची ‘निर्भया.’ तुमच्या सारख्याच साऱ्याजणी.

पुस्तकाचे नाव – मनस्विनी

लेखिका : नयना रेपे

प्रकाशक : मायमिरर पब्लिशिंग हाऊस प्रा.लि., पुणे 411 009.
संपर्क : 020-24226432, 9422316689
प्रथमावृत्ती : एप्रिल 2021
किंमत : 100


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading