February 1, 2023
Poem by Dilip Gangdhar
Home » संसाराचा गाडा…
कविता

संसाराचा गाडा…

'सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आलेलं हे छायाचित्र… आणि ते पाहून मला सुचलेल्या या काव्यपंक्ती…..'
कवी - दिलीप गंगधर

गाठलीय कवाचीच मी वयाची साठी,
तरी पेलते मी डोईवर शेणाची ती पाटी…

ल्योक माझा चालवितो संसाराचा गाडा,
त्याच्या बाळाचा वढते आवडीनं खेळगाडा…

बाळाची आई म्हणे त्याला, भारी गं व्दाड,
पर मला माझ्या नातवाचं वाटे लई ग्वाड…

कंबार दुखल्यागत कधीमधी वाटतं जरासं,
डोळ्यांलाबी लांबचं दिसं अंधुक थोडसं…

पर नाही याचा मला लई वाटत तरास,
माझ्या लेखी नसं सुख दुसरं या परास…

देवा सदा माझ्या घरी नांदो लक्षुमीचा वास,
सर्व्यांच्या मुखी पडो आनंदानं चार घास…

तुझ्या किरपेने पडो दारी धनधान्याची रं रास,
देवा मागणं माझं, असं चालू दे हे झकास…

Related posts

प्रयत्नात परमेश्वर…

गुरु पौर्णिमा

कागदी फुल…

Leave a Comment