September 16, 2024
Chinboreyudha A classic novel depicting the artistic struggle of left and right
Home » डाव्याउजव्यांचा कलात्मक संघर्ष रेखाटणारी अभिजात कादंबरी: चिंबोरेयुद्ध
सत्ता संघर्ष

डाव्याउजव्यांचा कलात्मक संघर्ष रेखाटणारी अभिजात कादंबरी: चिंबोरेयुद्ध

चिबोरेयुद्ध कादंबरीअथर्व प्रकाशनाने २०२४ मध्ये प्रकाशित केलेली आहे. तिची काही निरीक्षणे मांडत आहे. कादंबरीची भावात्मक बाजू महत्वाची आहे.आपल्या कादंबरीला प्रारंभापासून अखेरपर्यंत एक गती आहे. खाऊजाची वैशिष्ट्ये मार्मिकपणे मांडली आहेत. उपरोध, स्वप्नाभास, संवाद, उत्तम साधलेत.

यामध्ये साम्यवादाच्या दृष्टीने…
१) भाग १ – भावकी नसलेली भाऊबंदकी ,चँनलवर भुंकणे.
२) भाग ३ – मुलाने जमीन विकू नये म्हणून बाबांचा विरोध.
३) भाग ४ – वाडीला नक्षलवाद्यापासून धोका आहे हा नकारात्मक भाव प्रकट करणे.
४) भाग ६ – स्वप्न विचारशक्ती खुंटवून टाकतील हा इशारा.
५) भाग ७ – गरीबांची मजबुरी (पृ ४३)
६) भाग ८ – मार्क्स चे गुणगाण
७) भाग ९ – या आक्रमणाला तोंड कसे द्यावे, काँम्रेडची बैठक, शाळा, इस्पितळे डागडुजी, ओरिजनल विचारशक्तिची नसबंदी
८) भाग १० – साम्यवादाचा पराभव असे उल्लेख आलेले आहेत.
ह्यातील भाग ९ व भाग १० मध्ये पराभवाचाच साम्यवादाचा भाग आला आहे.

कबुल आहे भांडवलशाहीचे आक्रमण मोठे आहे, पण साम्यवाद संपलेला नाही हेही खरे आहे. मुख्य म्हणजे हे युद्ध असल्यामुळे साम्यवादी विचार प्रतिवाद रूपाने आलेला आहे. भांडवलशाहीचा चढत्या क्रमाणे होणारा विकास या काळात “साधना” (विशेषत:रामचंद्र गुहांचे लेख), “युगांतर” “समाजप्रबोधन पत्रिका” “परिवर्तनाचा वाटसरू” ? राष्ट्रीय पातळीवरचे रवीश कुमार, दीपक शर्मा, हे आणि वायर, लल्लन टाँप, थिंक बँक आदी चॅनेल, निखिल वागळे, कुमार केतकर यांनी अनेक युट्युब चॅनेलवरून भांडवलशाहीचा जोरकस प्रतिवाद केला आहे. लेखकाने भांडवलशाहीचे वर्णन करताना, जाहिरातींचे वर्णन करताना, जाहिरातींचे स्वप्नांचे जे वर्णन केले आहे त्यातील कारूण्य खरंच जानवते.

“चिंबोरेयुद्ध”ही कादंबरी अनोख्या सागरा शेजारील खाडीविश्वाचे पाण्याखालील जग दर्शवते. त्यातील कल्पनावैविध्य सुंदर आहे. वर्णनशैली नितात रमनिय आहे. आपण एखाद्या अनोख्या विश्वाची सफर करत आहोत असे वाटते. जे जग नितांत रमनिय आहे. एका अदभुत जगाचे दर्शन यातुन घडते. कादंबरीची केंद्रवर्ती कल्पना ही अनोखी, अदभुत, आगळी आहे जी तुम्हाला सतत विचारप्रवृत्त करते. हे खरे की ते खरे या दोन हिंदोळ्यावर आपणास वावरायला भाग पाडते. समकालाला एक वेगळ्या परीप्रेक्ष्यातून ती पाहते. आपले चिंतन – मंथन घेऊ नेते. पारंपरिकतेपेक्षा अभिनव बाज मांडते.

आकलनाला सहज – सोपी असी असावी ही कादंबरी आहे. जिचा धागा वैश्विक पातळीवर आहे. लोकल ते ग्लोबल अशी जाणारी ही कादंबरी ग्लोकल आहे. यातील रूपकात्मकता ही अनोखी, सूचक, ब्लँक ह्युमरला जवळ जाणारी आहे. राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, समकालिन वास्तव मांडताना लेखकाची शैली ही कमालिची कलात्मक आहे. त्यामुळे सत्याला एक सुंदर झालर पांघरण्यात लेखक यशस्वी झाला आहे. प्रसंगचित्रे रेखाटण्याची लेखकाची कला सुंदर आहे. तिच्यात ललितरंग ठासून भरले आहेत. यात कल्पना, चमत्कृती, जादुई वास्तव, रूपकात्मकता, अँब्सर्डिटी अशा साऱ्यांचे मिश्रण झाल्याने मराठीत आजवर नसलेली कथनशैली या कादंबरीच्या रूपाने साकार झाली आहे.

“चिंबोरेयुद्ध”कादंबरीत जादुई वास्तववादाच्या कलेच्या एक वेगळी शैलीचे दर्शन घडते आहे. हे जगाचे वास्तववादी दृश्य रंगवते आणि जादूचे घटक देखील जोडते आहे. अनेकदा यात चिंबोरेमँनच्या कल्पनारम्य आणि वास्तव यांच्यातील रेषा अस्पष्ट करत जाते. जो वास्तव आणि आभासी जीवन जगतो. जो नवनविन कल्पनांमध्ये रमून जातो. जलपरीच्या जादुई किंवा अलौकिक घटना सांगत राहतो. वास्तविक-जगात किंवा सांसारिक वातावरणात सादर केल्या जातात त्या बाबींवर तो बोलत राहतो. ही कादंबरी नाट्यमय सादरीकरणांमध्ये सादर होत राहते.

विशिष्ट जादूच्या घटकांचा समावेश असूनही, सामान्यतः वेगळ्या घटकाचा विचार केला गेला आहे. काल्पनिक कथांपेक्षा भिन्न शैली यात आहे कारण जादुई वास्तववाद मोठ्या प्रमाणात वास्तववादी तपशील वापरतो तो यात आहे. आणि वास्तविकतेबद्दल मुद्दा मांडण्यासाठी जादुई घटकांचा वापर करतो, तर कल्पनारम्य कथा अनेकदा वास्तवापासून विभक्त केल्या जातात. जादुई वास्तववाद हे सहसा वास्तविक आणि जादुई घटकांचे एकत्रिकरण म्हणून पाहिले आहे जे साहित्यिक वास्तववाद किंवा कल्पनारम्य पेक्षा अधिक समावेशक लेखन स्वरूप यात आहे.

जादुई वास्तववाद सहसा लॅटिन-अमेरिकन साहित्याशी संबंधित आहे. विशेषतः लेखक गॅब्रिएल गार्सिया मार्केझ, इसाबेल अलेंडे, जॉर्ज लुईस बोर्जेस, जुआन रुल्फो, मिगेल अँजेल अस्तुरियास, एलेना गॅरो, मिरेया रॉबल्स, रोम्युलो गॅलेगोस आणि आर्टुरो उसलर पिट्री. इंग्रजी साहित्यात, नील गैमन, सलमान रश्दी, ॲलिस हॉफमन, लुईस डी बर्निरेस, निक जोक्विन आणि निकोला बार्कर यांचा समावेश होतो. बंगाली साहित्यात, जादुई वास्तववादाच्या प्रमुख लेखकांमध्ये नबरुन भट्टाचार्य, अख्तेरुझमान इलियास, शाहिदुल जहीर, जीवनानंद दास आणि सय्यद वलीउल्ला यांचा समावेश होतो. कन्नड साहित्यात, शिवराम कारंथ आणि देवनूर महादेव या लेखकांनी त्यांच्या सर्वात प्रमुख कृतींमध्ये जादुई वास्तववादाचा अंतर्भाव केला आहे.

जपानी साहित्यात या शैलीतील सर्वात महत्त्वपूर्ण लेखकांपैकी एक म्हणजे हारुकी मुराकामी. चिनी साहित्यात शैलीचे सर्वोत्कृष्ट लेखक मो यान आहेत, दोन हजार बाराचे साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते त्यांच्या “विभ्रम वास्तववाद” साठी. पोलिश साहित्यात, साहित्यातील दोन हजार अठराच्या नोबेल पारितोषिक विजेत्या ओल्गा टोकार्झुक यांनी जादूच्या वास्तववादाचे प्रतिनिधित्व केले आहे. या परंपरेमध्ये समर्थपणे उतरणारी कादंबरी म्हणजे बाळासाहेब लबडे यांची कादंबरी चिंबोरेयुद्ध ही होय.

एखादी कलाकृती अभिजात आहे की नाही ? याचे काही निकष करता येतात.अशी कलाकृती ही अक्षर वाड्मय असते. ती सार्वत्रिक व सार्वकालिक आशय आपणात सामावून असते. तिच्या अभिजाततेचा महत्वाचा निकष हा पुर्वपरंपरेपेक्षा वेगळी असणारी कथनशैली जी स्वतंत्र आहे. सेक्युलर सर्वसामान्यांच्या बाजुने उभे राहून विश्वस्थिरतेला ती मदत करणारी आहे. तिच्या आकृतीबंधात नाविण्य आहे. समूहभावाचे समकालिन चित्र रेखाटण्यात ती यशस्वी तशीच यातील उच्चतर मानवी मूल्ये चिरंतन सत्याचे दर्शन घडवितात. चिंबोरेयुद्ध ही वास्तववादी कादंबरी आहे. समकालिन राजकीय सटायर ती रूपकामधुन व्यक्त करते. खेकडा हे वेगळे रूपक आहे. डाव्या आणि उजव्याचा संघर्ष ही कादंबरी रेखाटते. या साऱ्यातून भांडवलशाहीच्या तत्वज्ञानाचा विजय हे मान्य. पण तो न्याय नाही हे ही खरेच. पण आजही डावी चळवळ न्यायाच्या गोष्टी बोलते आहे. प्रसंगी रस्त्यावर उतरते आहे.

कादंबरीच्या अनेक भागातून मांडले आहे तसे भांडवलशाहीच्या विजयाचे, जनतेच्या स्वप्नाचे, त्यांच्या सुखवादाचे , वर्णन खरे आहे..हे युद्ध शोषक विरूद्ध शोषित आहे हे क़धी संपणार नाही. ते अनादी काळापासून आज पर्यंत व पुढेही चालू राहणार आहे. भांडवलशाहीच्या गुंगीचे तुम्ही केलेले वर्णन कोणासही अंतर्मुख करणारे आहे. त्या त्या प्रश्नांच्या नव्या बाजू उजळूण दाखविणारे आहे हे आपले यश मोलाचे आहे. कादंबरीतून भांडवलशाही व साम्यवाद यांचे समसमान वर्णन येते. ही कादंबरी अभिजात दर्जाची आहे. पात्रांच्या कृतीतून, चिंतनातून, तात्विक पातळी अधिक व्यक्त होते.

भांडवलशाही खुप झगमगती आहे. पण साम्यवाद हा शोषितांच्या अंधाऱ्या आयुष्यातही पणती आहे तिचा प्रकाश खचितच वाढणार आहे. जेव्हा एखादी कलाकृती तत्वज्ञानातील विचारानुभव कलानुभवात रूपांतरीत करते तेव्हा ती कलाकृती श्रेष्ठतेकडे झेपावते. तशी या कादंबरीची कल्पना ही छानच आहे वेगळेपण आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

मनाची स्थिरतेसाठी आवश्यक शास्त्र अभ्यासायला हवे 

जैव विविधता संवर्धनात विद्यार्थ्यांचा सहभाग आवश्यक: एस आर यादव

वेळीच ओळखा निसर्गाचा धोक्याचा इशारा

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading