- सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर तर्फे देण्यात येणारे सन २०२३ चे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
- डॉ. अनंता सूर, गजानन शिले, प्रतिभा खैरनार आदींचा समावेश
- प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, ज्येष्ठ लेखक फुलचंद खोब्रागडे यांचा होणार विशेष सन्मान
चंद्रपूर – येथील सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंचतर्फे देण्यात येणाऱ्या सन २०२३ च्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. हे पुरस्कार संस्थेच्या २५ ऑगस्ट रोजी सरदार पटेल महाविद्यालयात होणाऱ्या कार्यक्रमात प्रदान केले जातील, असे संयोजकांच्यावतीने कळविण्यात आले आहे.
कवितासंग्रहासाठी देण्यात येणारा शिवाजीराव चाळक पुरस्कृत सीताबाई सखाराम चाळक स्मृती पुरस्कार गजानन शिले (वाशिम) यांच्या थकीत एकूण गोषवारा कवितासंग्रहाला देण्यात आला आहे. कथासंग्रहासाठी देण्यात येणारा प्रा. दिलीप बोढाले स्मृती पुरस्कार यंदा विभागून देण्यात आला आहे. यामध्ये प्रतिभा खैरनार (नाशिक) यांच्या ” बाभूळ फूल या कथासंग्रहाला आणि डॉ. अनंता सूर (वणी, जि. यवतमाळ) यांच्या हेळसांड या कथासंग्रहाला जाहीर झाला आहे.
कादंबरीसाठी प्रदान करण्यात येणारा अशोकसिंह ठाकूर पुरस्कृत पुरस्कार डॉ. स्मिता दातार (मुंबई) यांच्या ‘ उर्मिला’ या कादंबरीला तर बालसाहित्यासाठी देण्यात येणारा विमलबाई देशमुख स्मृती पुरस्कार रश्मी गुजराथी (पुणे) यांच्या ‘ बालसाहित्याला आणि डॉ. विद्याधर बन्सोड पुरस्कृत शकुंतला देवदास बन्सोड स्मृती ललित पुरस्कार फारुक काजी (कोल्हापूर) यांच्या शहाण्या बापाची कहाणी या ललित ग्रंथाला जाहीर झाला आहे.
नाटकासाठी अपेक्षित साहित्यकृती प्राप्त न झाल्याने यावर्षी हा पुरस्कार देण्यात येणार नाही. यावर्षी नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त केल्याबद्दल द फियर फॅक्टर या नाटकाचे दिग्दर्शक प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर यांचा आणि साहित्यातल्या योगदानासाठी ज्येष्ठ लेखक फुलचंद खोब्रागडे यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातल्या ज्येष्ठ साहित्यिकाला देण्यात येणारा बाबुराव कोंतमवार स्मृती साहित्य सन्मान एकूण साहित्यविषयक योगदानासाठी कवयित्री डॉ. पद्मरेखा धनकर यांना, कलाक्षेत्रातील योगदानासाठी दिला जाणारा डॉ तुकाराम पत्तीवार स्मृती कलायात्री पुरस्कार नाट्यकलावंत प्रशांत कक्कड आणि नवोदित युवा कलावंताला दिला जाणारा मिलिंद बोरकर स्मृती नवोन्मेष पुरस्कार गायक आणि अभिनेता प्रणय गोमाशे यांना देण्यात येणार आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.