शिरोळ – डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील स्मृती अखिल भारतीय कथा स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. भारती देव (नाशिक) यांच्या मातृत्व आणि संतोष नारायण पाटील (आजरा) यांच्या देव माशाची शेवटची उडी या कथांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला आहे, अशी माहिती इंद्रधनुष्य मासिकाचे कार्यकारी संपादक संजय सुतार व साहित्य सहयोग दिपावलीचे संपादक सुनील इनामदार यांनी दिली आहे.
स्पर्धेचे हे नववे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्पर्धेला लेखकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. मुंबई, नवी मुंबई सह महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि कर्नाटक, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यातून 138 कथाकारांनी 147 कथा स्पर्धेसाठी पाठविल्या होत्या. प्रथम तीन क्रमांकाच्या बक्षिसाबरोबरच आता तीन विशेष उल्लेखनीय कथांना प्रत्येकी पाचशे रुपयांचे पारितोषिक, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले आहेत. तसेच उत्तेजनार्थ तीन कथांचे बरोबरच तीन स्थानिक कथाकरांना उत्तेजनार्थ तीनशे रुपये बक्षीस स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र दिले जाणार आहे.
बक्षिसांच्या नवीन रचनेनुसार स्पर्धा परिक्षकांनी जाहीर केलेला निकाल असा –
द्वितीय क्रमांक विभागून – 1) इतुसा चांद – उदय गणपत जाधव (मुंबई), 2) कौतिक- मुकेश आयाचित (पुणे),
तृतीय क्रमांक विभागून -1) भीतीची व्याख्या – विनय खंडागळे (बुलढाणा), 2) दिवटा – भास्कर बंगाळे (पंढरपूर)
विशेष उल्लेखनीय कथा- 1) एका अबोल्याचे महाभारत- नंदकुमार वडेर (सांगली), 2) एक बाकी एकाकी – रश्मी मदनकर (नागपूर), 3) सत्कार – विजयराज कोळी (शिरोळ ),
उत्तेजनार्थ – 1) जत्रा – सचिन मणेरीकर (फोंडा -गोवा), 2) वधु परीक्षा – शीतल पाटील (बेळगाव), 3) सोनचाफा- नवी चाहूल- स्वाती सारंग पाटील (नाशिक)
उत्तेजनार्थ स्थानिक – 1) फडकऱ्याची पोर – वंदना जाधव (पन्हाळा), 2) अखेर तिने करून दाखविले – माणिक नागावे (कुरुंदवाड), 3) इंदुबाई टू संदीप व्हाया व्यंकाप्पा – सिकंदर गुलाब नदाफ (इचलकरंजी)
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.