2019-20 मधील चौथ्या अखिल भारतीय हातमाग जनगणनेनुसार, देशभरातील 31.45 लाख कुटुंबांमध्ये 35.22 लाख हातमाग विणकर आणि संबंधित कामगार आहेत. त्यानुसार, देशात 31.45 लाख हातमाग कुटिरोद्योग एकक कार्यरत असल्याचे मानले जाते, अशी माहिती केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी राज्यसभेत दिली.
हातमाग क्षेत्र असंघटित आहे, यात सरकार विणकर/कामगारांना थेट रोजगार देत नाही. हातमाग विणकर/कामगार पारंपरिक कुशल उपक्रमांमध्ये सहभागी होतात, त्यामुळे त्यांना स्वयंरोजगार मिळतो. तथापि, वस्त्रोद्योग मंत्रालय देशभरातील हातमागांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हातमाग विणकरांच्या कल्याणासाठी (i) राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रम (एन एच डी पी) आणि (ii) कच्चा माल पुरवठा योजना (आर एम एस एस) राबवत आहे.
या योजनांअंतर्गत, पात्र हातमाग एजन्सी/विणकरांना कच्चा माल, उन्नतीकरण केलेले यंत्रमाग आणि संलग्न उत्पादनांची खरेदी, सौर प्रकाश एकक, कार्य ठिकाणासाठी बांधकाम, कौशल्य, उत्पादन आणि आरेखन विकास, तांत्रिक आणि सामान्य पायाभूत सुविधा, विपणन, विणकरांच्या मुद्रा योजनेअंतर्गत सवलतीच्या दरात कर्ज, सामाजिक सुरक्षा, गरीब परिस्थिती असणाऱ्या पुरस्कार विजेत्या विणकरांना मदत इत्यादींसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
एनएचडीपी आणि आरएमएसएस योजनांतर्गत गेल्या पाच वर्षांत म्हणजेच 2020-21 ते 202-25 या काळात 1,516 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून 1480.71 कोटी रुपये वितरित करण्यात आले.
योजना जारी राखण्यासाठी /नवीन योजना तयार करण्यापूर्वी, विद्यमान योजनांच्या परिणामांचा अभ्यास केला जातो. 2021-22 ते 2025-26 दरम्यान अस्तित्वात असलेल्या मागील योजनांचे तृतीय पक्ष परिणामांचे मूल्यांकन केल्यानंतर एनएचडीपी आणि आरएमएसएस या योजना अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आल्या.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.