June 19, 2024
Eclipta Prostrata Maka Medicinal Plant
Home » माका ( ओळख औषधी वनस्पतीची )
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

माका ( ओळख औषधी वनस्पतीची )

ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये माका या वनस्पतीबद्दल माहिती…

– सतिश कानवडे

संस्थापक,
औषधी वनस्पती व आरोग्य पर्यटन केंद्र,
सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगर
मोबाईल 9850139011, 9834884804

वनस्पतीचे नाव- माका Eclipta Prostrata

वनस्पतीचे वर्णन

माका ही ऑस्ट्रेसी  या कुलातील सुगंधी झुडुपवर्गीय वनस्पती आहे. ही वनस्पती पाणथळ जागेत दिसते. पिवळ्या फुलांचा माका हा 0.५० ते १ मीटर उंच वाढतो. त्याची पाने मोठी असतात.

औषधी उपयोग

या संपूर्ण झाडाचा औषधामध्ये उपयोग केला जातो. ते कफवात प्रवृत्ती कमी करणारे आहे. या वनस्पतीचा उष्णतावर्धक वात, कफ, कमी करण्यासाठी उपयोग होतो. इक्लेटीन अल्कालाइड कातडीच्या रोगांवर, सुजेवर, रक्तप्रवाह थांबवण्यासाठी वापर. तेलाचा उपयोग केस वाढीसाठी करतात.

हवामान व जमीन

सर्व प्रकारच्या पाणथळ जमिनीत ही वनस्पती वाढताना दिसते. विशेषतः विहिरीजवळ व पाटाच्या जवळील पाणथळ जागेत जोमाने वाढते. उष्ण व दमट हवामान वाढीस मानवते. वनस्पतीच्या वाढीस  २० अंश ते ३५ अंश सेल्सिअस तापमान आणि ८० टक्क्यापर्यंत आद्रता लागते.

लागवड

माक्याची लागवड बिया टोचून/छाट कलमाद्वारे लावून करता येते. या पिकास वेगळी खते देण्याची आवश्यकता भासत नाही. मुख्य पिकास पाणी देतेवेळी संपूर्ण जमीन ओळी होईल याची दक्षता घ्यावी. जमीन सतत ओळी ठेवावी.

कापणी

पहिली कापणी साधारणपणे १०० ते १२० दिवसांनी करावी. ५० टक्के फांद्या कापाव्यात. सर्व फांद्या व काड्या स्वच्छ धुवून सावलीत सुकवाव्यात. पहिल्या कापणीनंतर पुढील कापणी ७५ ते ९० दिवसांनी करावी. एका जमिनीत साधारणपणे २ ते ३ वर्षे हे पिक घेता येते.

उत्पन्न

पहिल्या वर्षी २.५ ते ३ टन ओल्या फांद्या मिळतात व दुसऱ्या वर्षी ३.५ ते ४ टन ओल्या फांद्या मिळतात. ताजा माका ८ ते १० रुपये किलो व वाळलेला माका ५० ते ६० रुपये किलो दराने विकला जातो.

Related posts

मुलांच्या अभ्यासाची चिंता सतावतेय …मग हा करा उपाय

नर्सरी आणलेली रोपे जगत नाहीत ? यावर उपाय…

नित्य सिद्ध आत्म्यास जाणणे हेच आत्मज्ञान

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406