गोफणगुंडा
शेपटी
राजकारणात शेपटी असावी
म्हणजे
आपल्या सोईने घोळता येते.
घोळता नाही आली तरी
बुटावर लोळता येते
अशी जाहीरपणे निष्ठा
जनतेला कळवली जाते
वांझ झालेली म्हैससुद्धा
राजकारणात फळवली जाते
-शिवाजी सातपुते ९०७५७०२७८९
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.