September 25, 2023
jequieity Gunj medicinal Plant
Home » गुंज ( औषधी वनस्पतीची ओळख )
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गुंज ( औषधी वनस्पतीची ओळख )

ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये  गुंज या वनस्पतीबद्दल माहिती…

– सतिश कानवडे

संस्थापक,
औषधी वनस्पती व आरोग्य पर्यटन केंद्र,
सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगर
मोबाईल – 9850139011,9834884804

वनस्पतीचे नाव- गुंज

वनस्पतीचे वर्णन

गुंज वेलवर्गीय झाड असून यात लाल गुंज, काळी गुंज, पांढरी गुंज, अशा पाच प्रकारच्या गुंज असतात. हिरवी गुंज, पिवळी गुंज.

शास्रीय नाव Abrus Precatorius

English name- Jequieity seed. Zndian Liquorice

हिंदी नाव गुंजा, गुमची

बिया

Abrin नावाचे विष बियामध्ये असते. यामुळे उलटी, चक्कर, बेशुद्ध होणे, घाबरटपणा, तसेच जास्त प्रमाणात पोटात गेले तर मृत्यू होऊ शकतो.

लागवड

याची लागवड शेतात करण्यापेक्षा शेताच्या बाहेरील भागात जेथे झाडे आहेत त्या झाडांच्या शेजारी करता येईल. गुंज हे आधाराने वाढते. त्यामुळे त्याला आधार भेटेल अशा ठिकाणी त्याची लागवड करावी. यासाठी स्वतंत्र खर्च करण्याची गरज पडत नाही. याला मिश्र शेती म्हणून लागवड करू शकतो लागवड बियांपासून करावी.

याचे उत्पन्न पूर्ण वर्ष मिळत राहते. या गुंजला आपण पाहिजे तोपर्यंत ठेऊ शकतो. भारतात हिवाळ्यात याला फुले व फळे येतात. फळे हे शेंगावर्गीय असतात. हिवाळ्यात याचे उत्पन्न वाढते. सगळ्या प्रकारच्या जमिनीत याचे उत्पादन घेऊ शकतो. याचे पान, बिया, खोड, मूळ याचा उपयोग औषधांमध्ये करतात.

आयुर्वेदिक उपयोग

गुंजाच्या मुळांची क्रिया जेष्ठमधासारखी असते. पाल्याचा उपयोग सुद्धा मुळांसारखाच आहे. मधुर, स्नेहन, कफनाशक, मुत्रजनन, व्रणरोपण आदीवर जेष्ठमधाऐवजी गुंजेची मुळे वापरतात. खोकला, मुत्र रोगामध्ये प्रयोजक औषधामध्ये मूळ देतात.

पाला वाटून व्रण शोधावर व व्रणावर बांधल्याने थंडाई येऊन शोध कमी होतो व स्वप्न भंगामध्ये पाल्याची गोळी तोंडात धरतात. तोंडातील दुर्गंधी घालविण्यासाठी, तोंडातील रोगामध्ये अत्यंत उपयुक्त असून तोंडातील व्रण, फोड यामध्ये याचा पाला चावून खावा. तोंड आले असल्यास याच्या पानाचा उपयोग जेष्ठमध बनविण्यासाठी करतात. साखर मुक्त उत्पादनामध्ये याचा वापर केला जातो. बियांचा उपयोग औषधामध्ये तसेच माळा बनविण्यासाठी करतात. विष प्रतिरोधक तसेच कीटकनाशक तयार करण्यासाठी केला जातो. मुळांचा उपयोग चूर्ण बनविण्यासाठी होतो. यात खोकला, श्वसन, घसा यांसारख्या औषधामध्ये केला जातो.

Related posts

कृषी क्षेत्रात ड्रोन वापरास प्रोत्साहन…

सृजनगंधी कवडसे…

अंधश्रद्धेच्या विळख्यातील पक्षीजीवन

Leave a Comment