किती करणार
आहात
परस्परांवर
चिखलफेक
चिखलच
संपून गेला तर
कमळं तरी उगवतील
कशी ?
ती उगवलीच
नाही तर कोणाला
कोणी अर्पण
करणार कशी ?
अर्पणाऐवजी
तर्पणाचीच
येईल ना
वेळ
चिखलफेक
करणाऱ्यांसाठीही
चिखल
उरणारच नाही
मग
तुमच्याकडे
कुणी ढुंकूनही
बघणारच नाही
तुम्हा लोकांच्याच
या रोजगाराचे
मग
काय होईल ?
बाकी तर काही येतच नाही ना तुम्हाला
नंतर ठेवणार मग
कोण कुठे कामाला ?
श्रीपाद भालचंद्र जोशी
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.