March 29, 2024
bihu-festival-in-assam-rajan-lakhe-article
Home » आसाममधील बिहू उत्सव…(व्हिडिओ)
पर्यटन

आसाममधील बिहू उत्सव…(व्हिडिओ)

बिहू हे नृत्य आत्तापर्यंत दूरदर्शन बघितले होते पण प्रत्यक्षात बघण्याचा योग आला नव्हता. आसाम दौऱ्याच्या निमित्ताने हा आनंद मला घेता आला. प्रत्यक्ष पाहाण्याचा आनंद काही वेगळाच असतो ! या निमित्ताने बिहू उत्सवाबद्दल थोडक्यात….

राजन लाखे

खूप दिवसापासून इच्छा होती पण योग येत नव्हता, तो कोणता तर पुर्वांचल बघण्याचा, तेथील संस्कृती जाणून घेण्याचा. तो योग आला आणि सोमवारी आसामला पोहचलो. भारताच्या पूर्वेकडे आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपुर, मिजोरम, नागालँड, त्रिपुरा ही सात छोटी राज्ये आहेत. त्याचे सेवन सिस्टर्स असे नामकरण झाले आहे. त्यात आसाम हे सर्वात मोठे राज्य आहे.

आपल्याकडे दिवाळी हा सर्वात मोठा सण तसा आसाम मध्ये ” बिहू उत्सव” हा मोठ्या प्रमाणात साजरा केल्या जातो. हा उत्सव दरवर्षी १४ एप्रिलपासून एक महिना चालतो. १४ एप्रिल पासूनच का? तर आसाम चे नवीन वर्ष १४ एप्रिल पासून सुरु होते म्हणून.

आसाम येथे बिहू हे लोकप्रिय नृत्य आहे. जे इथल्या संस्कृतीचे प्रतिक आहे. हे नृत्य पाहण्याचा योग काझीरंगा येथे आला. बिहू हा उत्सव वर्षातून तीन वेळा साजरा होतो.

पहिला बिहू उत्सव ला ” रंगीला बिहू ” म्हणतात. दुसऱ्या बिहू उत्सव ला ” कंगीला बिहू ” म्हणतात तर तिसऱ्या बिहू उत्सव ला ” भोगली बिहू ” म्हणतात.

पहिला बिहू उत्सव हा एक महिना, दुसरा बिहू उत्सव हा कार्तिक महिन्यात २ दिवस तर तिसरा बिहू उत्सव हा माघ महिन्यात ७ दिवस चालतो. या बिहू नृत्यामध्ये ढोलक, बाही पिपा, टोका, गोगोना ही वाद्ये प्रामुख्याने वाजवली जातात. ढोलक सर्वाना माहित आहेच. बाही म्हणजे बासरी, पिपा म्हणजे पिपाणी. टोका हे वाद्य बांबू पासून तयार केले जात असून त्याचा आवाज लयीत टाळ्या वाजवल्या प्रमाणे येतो तर गोगोना हे वाद्य हे सर्वात छोटे वाद्य असून ते तोंडाने वाजवले जाते आणि त्याचा आवाज एक ताराच्या वाद्या सारखा येतो.

Related posts

“शेवटची लाओग्राफिया” पुस्तकास केशवसूत साहित्य पुरस्कार जाहीर

खेड्यांची जळती वेदना..”काळीज विकल्याची गोष्ट “

कृषि रसायनाबाबत शेतकऱ्यांना साक्षर करणारे पुस्तक

Leave a Comment