शमीच्या (सौंदड) झाडाचे औषधी उपयोग
- दुर्वांप्रमाणेच शमी शरीरातील कडकीचा नाश करतो. शरीरातील उष्णता घालविण्यासाठी शमीच्या फुलांचा किंवा पाल्याचा रस, जिरे व खडीसाखर एकत्र करून १५ दिवस द्यावे.
- उष्णतेमुळे त्वचेवरआगपण होते. या विकारावर शमीचा पाला गाईच्या दुधापासून केलेल्या दह्यात वाटून लेप करतात.
- उन्हाळी लागल्यासही शमीच्या फुलांचे तुरे गाईच्या दुधात वाटून त्यात जिरे व खडीसाखर घालून देतात.
- नखदंतविषारावर शमी, कडुनिंब व वड यांची साल वाटून लेप करतात.
- शरीरावर जखमेचे व्रण राहिल्यास शमीच्या झाडाची साल उगाळून लेप लावतात.
- अतिसारावर शमीच्या झाडाची साल ताकात उगाळून देतात.
- धुपणीवर शमीच्या कोवळ्या शेंगा व जास्वंदीच्या कळ्या तुपात परतून दुधातून देतात.
- शमीचा उपयोग विविध औषधांमध्ये केला जातो. अतिसार, मूळव्याध आणि त्वचेच्या विकारावरील औषधे यापासून बनविली जातात.
- या झाडाचा डिंकदेखील औषधी गुणांनी युक्त आहे. अंगाचा दाह कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो.
- शमीच्या कोवळ्या शेंगांची भाजी केली जाते. फोडणीत दही घालावे म्हणजे ही भाजी चवदार होते.
- शमीच्या झाडावर वाळलेल्या शेंगा कुरकुरीत चवदार लागतात.
- वास्तुशास्त्रात देखील हे झाड शुभ मानले जाते..त्यामुळे घराच्या मुख्य दरवाज्याच्या डाव्या बाजूला लावण्याची प्रथा आहे .
डॉ. मानसी पाटील
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.