बदलत्या जीवनशैलीमुळे मानसिक स्वास्थ बिघडले आहे. नेहमी तणावपूर्ण वातावरणात आपण असतो. हा तणाव कमी कसा करायचा ? किंवा या तणावावर मात कशी करायची ? दररोजच्या व्यायामाची काय गरज आहे ? तुम्ही तणावात असता तेव्हा बऱ्याचदा झोपी जाता. हे सुद्धा मानसिक कमजोरीचे लक्षण आहे. यासाठी काय करायला हवे ? तणाव कमी करण्यासाठी कोणता डायट घ्यायला हवा ? जेवण्यात कोणते पदार्थ घ्यायला हवेत ? कोणते व्यायाम करायला हवेत ? यावर टीप्स जाणून घ्या डाॅ. नीता नरके यांच्याकडून…
डाॅ. नीता नरके कोल्हापूर येथे गेली 15 वर्षे 'फेस अँन्ड फिगर' हे क्लिनिक चालवतात. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या त्या कार्यकारी व्यवस्थापकिय संचालक आहेत. मानव अधिकार आणि पत्रकार संघटनेच्या त्या कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस आहेत. कोल्हापूर रोटरी क्लब ऑफ गार्गिग्जच्या त्या माजी अध्यक्ष आहेत.