February 22, 2025
Rana of Shegavi Shri Sant Gajanan Maharaj appearance day
Home » शेगावीचा राणा ! श्री संत गजानन महाराज
मुक्त संवाद

शेगावीचा राणा ! श्री संत गजानन महाराज

23 फेब्रुवारी १८७८ रोजी प्रथमतः ऐन तारुण्याच्या दशेत शेगावला दिसले. तोच प्रगट दिन भारतात तसेच इतर देशात सुद्धा भारतीय वंशाचे लोक साजरा करतात.

सौ पुष्पा सुनीलराव वरखेडकर
माजी पर्यवेक्षिका
पी डी कन्या शाळा; वरुड
९४०४८६०११३

ऐसी कळवळ्याची जाती !
करी लाभाविन प्रीती!

या संत वचनानुसार जगात एक जन्मदात्री आई व दुसरे संत हेच मानवी जीवनाच्या कल्याणासाठी झटत असतात. ‘सर्व भूतमात्रा विषयी ज्यांच्या अंतकरणात निरहेतुक प्रेम व दया वसत असते. श्री गजानन महाराज एक संत रत्न वऱ्हाडात शेगाव येथे होऊन गेले. 23 फेब्रुवारी १८७८ रोजी प्रथमतः ऐन तारुण्याच्या दशेत शेगावला दिसले. तोच प्रगट दिन भारतात तसेच इतर देशात सुद्धा भारतीय वंशाचे लोक साजरा करतात.

निमंत्रण पत्रिका नाही, व्हाट्सअप मेसेज नाही तरी हा भव्य दिव्य प्रमाणात जनसागर कसा उसळतो व या जनसागरावर सुखदुःखांच्या लाटा उसळतात. प्रत्येक भक्त आपले आर्त; आपले गाऱ्हाणे, मनोकामना पूर्ण होण्यासाठी श्री गजाननाच्या चरणी लोटांगण घालतात. प्रगट दिनाच्या दिवशी प्रत्येक गावोगावी श्रीच्या दर्शनासाठी दैनंदिन व्यवहारातील सर्व कामे दूर सारून या अफाट जनसागरात सम्मिलित होतात, व माऊलीच्या चरणी लोटांगण घालतात नतमस्तक होतात.

,”जगी ज्यास कोणी नाही,!
त्यास देव आहे!
निराधार आधारचा तोचि भार साहे!

या वचनावर विश्वास ठेवणारी भक्तमंडळी महाराजांच्या चरणी स्वतःला समर्पित करतात. श्री संत गजानन हा भक्त कल्पद्रुम; चिंतामणी; कामधेनु; भक्तवत्सल आहे. असा अखंड विश्वास व श्रद्धा ठेवतात. दर गुरुवारी श्री गजाननाची शेगावची वारी करतात.
जो मज होय अनन्य शरण!
त्याचे निवारी मी जन्म मरण!
शरणांगताशरण! मीच येकु!
म्हणून शरण आलेल्यांना मरण नाही: श्री संत गजाननाच्या चरणी जर आपला जीव भाव वाहिला तर ती माऊली आहे असा कित्येकांना प्रत्यय आला आहे.

परंतु विश्वासम फलदायकम!
निस्सीम प्रेम असल्याशिवाय अनुभूती येत नाही विश्वास, श्रद्धा असल्यास दगडातही देव दिसतो.इथे तर्काला वाव नाही. स्वतःच्या आईवर प्रेम करताना ती जशी फक्त आई आणि आईच असते अगदी त्याचप्रमाणे संत गुरु ईश्वर यांचे देखील तसंच असते.

श्री संत गजानन महाराज 23 फेब्रुवारी १८७८ रोजी शेगावात प्रगट झाले हे गजानन कमल उदयास आले. देविदास पातुरकरांच्या मुलाची ऋतुशांती होती व जेवणावळ आटोपल्यानंतर उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकल्या होत्या. त्या पत्रावळीवरील श्री संत गजानन अन्नाचे ग्रहण करीत होते: सतेज कांती, आजानू बाहू असलेले या उष्ट्या पत्रावळीवरील अन्न, का सेवन करत आहे ? हे कुणाच्याच लक्षात येईना. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे उपनिषदातील वाक्य खरे करून दाखविण्याकरता ही कृती केली. देविदास पातुरकरांनी सर्व पक्वान्न एकत्र करून पात्र गजानना समोर आणून ठेवले परंतु गजानन माऊलीने ते एकत्र करून” निरिच्छ”हा गुण त्यांनी दाखवून दिला.

श्री संत गजानन महाराज एक अधिकारी पुरुष होते: गोविंद बुवांनी भागवताचा पूर्वार्ध सांगितला व श्री गजानन महाराजांनी त्याचा उत्तरार्ध सांगितला. गजानन महाराज हे चालते बोलते ईश्वर होते त्यांनी अनेक लीला करून आपले संतत्व सिद्ध केले: फक्त चमत्कारच नाही तर त्यांना श्रीमद् भगवत गीता ही मुखोद्गत होती.

तया सिद्ध प्रज्ञेचेनी लाभे!
मन सारस्वत दुभे!
मग सकळ शास्त्र स्वयंभे!
निघती मुखे!
श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात संत पुरुषाला सिद्ध बुद्धी प्राप्त झाल्यामुळे त्याचे मन आपोआप सर्व विद्या प्रगट करते.

हे श्री संत गजाननाच्या मुखोद्गत असलेल्या श्लोकावरून दिसून येते ज्ञानेश्वरीत सहाव्या अध्यायात योगेश्वरांना योगाच्याद्वारे स्वर्गलोकीच्या कथा समजतात. त्याप्रमाणे गोसाव्याने गांजाचा नवस केला तेव्हा श्री गजानन महाराजांनी त्यांच्या झोळीतील पोटडीला काढायला सांगितले, त्यांना व्यसनाधीनता नव्हती. पद्मपत्राप्रमाणे अलिप्त होते. वेदरूचा त्यांना अस्खलित पाठ होत्या. बंकटलाला कडे झुणका भाकरीचे जेवण होते जेवणानंतर बंकटलालाने विडा देऊन काही पैसे दिले. त्यावर संत गजानन महाराजांनी सडेतोड उत्तर दिले
“मला तू व्यापारी समजतो काय? ते या सर्व व्यवसायापासून दूर होते.

संत गजानन महाराजांचा कृपाप्रसाद तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा खरी तळमळ तहान आर्तता निर्माण होईल तेव्हाच. सर्व सुख ऐशोआराम प्राप्त झाले तर अनुभव येत नाही.

विवहळता; दुःख दैन्य पदरात असेल, आर्थिक चंचन असेल तेव्हा गणगोत मित्र काम करीत नाही. तेव्हा श्री संत गजानननाचा अनुभव येतो.

श्री संत गजानन महाराजांवर लिहिणे म्हणजे लेखणी अपुरी पडेल आज जगात श्री संत गजानन संस्थेचा व्याप भव्य दिव्य आहे: तिथे कमालीची स्वच्छता; शांतता; पारदर्शकता आहे तशी शिस्त कुठेही दिसत नाही: तिथली भव्य दिव्य वास्तु, भक्तनिवास देखावा, सृष्टी सौंदर्य, स्वयंपाक घर कमालीचे डोळे दिपविणारे आहे:

इतर समाजसेवा; शैक्षणिक क्षेत्रातील सेवा; अभियांत्रिकी महाविद्यालय; निवासी मतिमंद शाळा; आदिवासी आश्रम शाळा; वारकरी शिक्षण संस्था; अपंग पुनर्वसन केंद्र; भोजन;सुविधायुक्त खोल्या व पर्यायी निवास व्यवस्था असे संस्थेचे नेत्रदीपक कार्य कुठेच पहावयास मिळत नाही हा चमत्कार नाहीतर काय? इथे श्री संत गजाननाची शक्ती कार्यकर्ते

गजानना गुनागरा!
परम मंगला पावना!
अशीच अवघी हरी दुरीत तेची दुर्वासना!
नसे त्रिभुवनामध्ये तुजविणे आम्हा आसरा!
करी पदतांवरी बहु दया; न रोषा धरा!


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading