धनाजी घोरपड्यांच्या कवी म्हणून, व्यक्तिमत्व व भूमिकेवर प्रकाश टाकणाऱ्या सहा कविता आहेत.. त्यांची बांधिलकी गट, तट, विचारधारणा अथवा विशिष्ट राजकारणाशी नाही. साहित्यनिर्मिती हेच एक राजकारणच असते. सर्वात मोठं खोटं कौशल्यानं पटवणं म्हणजे साहित्य. ही व्याख्या राजकारणात भाग घेणाऱ्या नोबेल पुरस्कार विजेता लॅटिन अमेरिकन गॅब्रिएल गार्सिया माक्किर्झची आहे. प्रख्यात कादंबरीकार जुजे सारामागोला पुरस्कार देऊच नये म्हणून नोबेल निवड समितीला पत्रं लिहिणारा पोर्तुगालचा पंतप्रधान होता. के. के. रुथवेनने हे साहित्याचे राजकारण वर्गात शिकवण्याचा आग्रह धरला आहे.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तुलनाकार प्रा. डॉ. आनंद पाटील-संकपाळ
८१ ‘गीतानंद’, अरुणोदय हौ. सो., शाहू पार्क,
राजेंद्र नगरजवळ, कोल्हापूर ४१६ ००४
भ्रमणसंवाद – ९४०४१४०९९५
Chaos illuminated by Flashes of lightning.
On Robert Brownings style
Oscar wilde 1854-1900 Ada Leverson Letters to the Sphinx (1930)
धनाजी धोंडीराम घोरपडे ‘जामिनावर सुटलेला काळा घोडा’ प्रकाशक- शशिकांत पवार, ललित पब्लिकेशन, मुंबई, २०२४ यांना इंग्रजी तुलनात्मक कृष्टिक- सांस्कृतिक – Cultural चिन्हमीमांसेत पूर्व-संहिता Epitexts म्हणतात. म्हणजे समीक्षकाने मुख्य संहितेत प्रवेश करण्याआधी पुस्तकाच्या वेष्टणावरचा पुढचा मागचा मजकूर काळजीपूर्वक आधी वाचावा. त्याचे अर्थनिरूपण वाचकाच्या संहितेकडे वळण्याची दिशा सूचित करते. म्हणजे घरात प्रवेश करण्यापूर्वी अंगण, पायऱ्या, बाग, तुळशी वृंदावन, रंगसंगती वगैरे बघून त्या घराची रचना सामाजिक, आर्थिक स्थिती, कृष्टिक-सांस्कृतिक दर्जा इ. बाबत आडाखे बांधतो. ते जेवढे चुकतील तेवढी ती साहित्यकृती उत्तराधुनिक विचार प्रणालीत प्रायोगिक मानली जाते. या पार्श्वभूमीवर बहादुरवाडीच्या तरुण कुणबी कवीचे पूर्ण नाव जन्मजात ‘नांगर’ हे चिन्ह ते बा. गं. टिळकांनी व भिक्षुकांनी तयार केलेल्या ‘नांगरगट्ट्या’ या विशेषणपर्यंतची चिन्हमीमांसा सुरू झाली. काव्यसंग्रहाचे ‘जामिनावर सुटलेला काळा घोडा’ हे शीर्षक आणि प्रकाशकाचे शशिकांत पवार नाव वाचून मी सैद्धांतिक आधार शोधू लागलो. ग्रामीण शिव्या व ओव्यात घोड्याचा मान मोठा आहे, पण क्षत्रियांच्या वरातीत मिरवणारा हा काळा घोडा कैद कुठल्या लढ्यात का झाला? अर्पण पत्रिका हीसुद्धा महत्वाची पूर्वसंहिता असते. कसले हे युद्ध? ते रूढ प्रादेशिक, ग्रामीण वगैरे नपुंसक बुद्धिमंतांनी लावलेली अभ्यासक्रमातील जात जपणारी लेबले उधळू लागले. लेखकाचे मनोगतही मदतीला नाही. अनुक्रम वाचू लागलो. ‘कोरा कागद’, ‘मिशा भादरलेला सूर्य’ ते ‘समृद्ध अडगळ’ अशा ३१ कवितांत ना काव्याचा एक घाट. एक नवे आव्हान तुलनाकारला मिळाले. बहादुरवाडीचा हा क्षत्रिय बहाद्दुर चारच ओळीत वंशशास्त्रीय (Geneological) जळजळीत सत्येच निर्भयपणे मांडतो. साहित्यात जातीचे राजकारण आणू नये म्हणणारेच मर्ढेकरी विषारी राजकारणच करीत राहिले. हे कळायला अनिवासी चिनी तुलनाकार-संस्कृतिस्ट Shu Mei Shin चे Racialization of Literatures (साहित्याचे वंशिकीकरण) आणि विश्वसाहित्याशी जोडणाऱ्या कमानी असे सिद्धांत वापरावे लागतील. त्या आधारे मी भारतीय साहित्याचे जातियीकरण (Castiealization) हा मान्य झालेला सिद्धांत रचला.
भारतात साहित्यनिर्मिती लेखक हा करीत नाही, त्याची जनुकीय जातच ती निर्मिती करते. समीक्षा वैदिक सजावटी पोकळ पदव्या मिरवणारे नपुंसक बुद्धिमंत करीत आले. त्यात तुलना व भाषांतरावर वैदिक बंदी असल्याने विश्वसाहित्याशीच नव्हे, तर जात-वर्ण जोडणाऱ्या कमानी कधीच तयार झाल्या नाहीत, त्यामुळे चोर, दरोडेखोर लफंग्यांची टोळीबाज ‘फेकाफेकी’ वाढली. के. के. रुथवेनने (Faking Literature) मध्ये साहित्यनिर्मितीप्रक्रिया समजून देणारे ३६ शब्द शोधले आहेत. पुनर्लेखन, वेल्डिंग, फिटिंग, टेलरिंग, रीटेलरिंग इ. प्रक्रियांची बोलकी उदाहरणे दिली आहेत. आधी वाङ्मयचौर्य शिकवले तर खरे वाङ्मय कळते. ही रुथवेनची भूमिका स्वीकारली, तर मराठीतील सर्व आधुनिक साहित्य प्रकारांच्या बापांची कत्तल होते.
अपर्णा धारवाडकर अमेरिकेत उचल्या फेकाफेकीवाल्यात ब्राह्मण (तिचा शब्द) वाङ्मयचोर सिद्ध करते, पण दुसऱ्या टोकाला हे धनाजी धोंडीराम घोरपडे या फेकाफेकीपासून दूर उभा आहे. अडाण्याचे शहाणपण विल्यम ब्लेकच्या निष्पापवृत्तीने जपत पहिल्याच कवितेत बहादुरवाडकर २०२४ च्या लोकसभेच्या निवडणूक काळात म्हणतो,
‘आयुष्याच्या या कोऱ्या कागदावर
चार ओळीतरी लिहाव्या म्हणतोय
नाहीतर ही माणसं
असाच जाळतील हा कोरा कागद’
विराम चिन्हाविना उधळलेले शब्द आणि मोडतोड केलेली आशयसूत्रे हे तर उत्तराधुनिकतेचे लक्षण आहे. लय, घाट, आकृतिबंध, शैली आशयाचे सुघटन हे उच्चभ्रूचे आधुनिकतेचे सवजलेले सोंगी भजन उत्तराधुनिकता मोडीत काढते. लिवल्याला शब्द बघून कागदाला श्रद्धेने देव मानणाऱ्या अडाणी खेडुताने ही ब्राह्मणेत्तर सर्वच शूद्रांची युगायुगांची शोकात्मिकाच कवी चार ओळीत मांडतो. शहाजी, जिजाबाई, शिवाजीला इंग्रजीसह सहा भाषा लिहिता वाचता येत होत्या. मला परदेशी कागदपत्रात मिळाले. तेव्हा पुरोहित विद्वानांनी ? निरक्षर त्याचे पुरावे भोसले हे विष (शेजवलकर) मराठ्यांच्या इतिहासात ‘कोरे कागद जाळीतच घेरले’ अशा प्रकारचे वंशविज्ञान आणि जनुकीय समीक्षेची (Genetic Criticism) मागणी या कविता करतात. पण पुरोहित वर्चस्वातील पंचतंत्री अहितोपदेशी अभ्यासक्रमांत हे शब्दच येऊ दिलेले नाहीत. ते यावेत म्हणून गतशतकाच्या मध्यांवर पालकांनी Terrible Curriculum विरोधी देशव्यापी चळवळ युरोपात केली. तसा प्रकार मराठीच्या इतिहासात नाही.
जोतिबा फुल्यांचा ‘शिवाजीचा पोवाडा कुळवाडी भूषण’ पहिली क्रांतिकारी कविता कोऱ्या कागदावरच अवतरली, पण तिच्यात अक्षरशत्रू शिवाजी आणि सवती मत्सराने टाकलेली बायको जिजाबाई हे विष वसाहत काळात ब्रिटिश+मध्यस्थ+ब्राह्मण+विषारीकरण= अभ्यासक्रम या प्रक्रियेतून त्या पोवाड्यात पाझरले. हे अजून कुणालाही कसे कळले नाही ? पुढे समृद्ध अडगळ उच्चश्रूंचे ज्ञानपीठ आणि गोलपिठा यांची गाठ पडत नसल्याचे कटू वास्तव हा क्षत्रिय कवी फार मोठ्या धाडसानं दहा ओळीत मांडतो. मराठीत आंतरसंहितात्मक समीक्षा (Intertextual Criticism) जन्मेल तेव्हाच या छोट्या अप्रतिम कवितेचे मर्म खऱ्या उत्तराधुनिक शहाण्या वाचकाला कळेल. घोरपडे सरदारांनी वंचित नामदेव ढसाळांच्या गोलपिठात सडलेली ‘अडगळ’ नेली हा साधा योगायोग नाही. छोटी कविता असो की कादंबरी महाकाव्य असो, साहित्यकृती हे कृष्टिक-सांस्कृतिक रणांगण असते. या उत्तराधुनिक साहित्याच्या व्याख्येत घोरपड्यांच्या बहुसंख्य कविता बसतात. त्या ‘ग्रामीण’, ‘दलित’ वगैरे नकली लेबलात मावणाऱ्या नाहीत.
संस्कृतीचा गंजीखाना वाचताना तुकाराम गाथेच्या अभंगांची लय मात्र ‘आदिम संस्कृतीच्या नावाखाली गांडीवर फटके मारून’ अशा विषम लांबीच्या ओळीत फुटलेल्या दिव्याच्या उत्तराधुनिक काचा टोचू लागतात. ‘बोगस संस्कृतीच्या निष्ठेखातर विष्ठा खायला लावणाऱ्या ईश्वरांच्या गांडू सेवेकऱ्यांना’ मधील उपरोधी आवेग तुकोबाच्या विद्रोही वस्त्रहरणाच्या अभंगांच्या हद्दी ओलांडून पुढे गेला आहे. अशा या उत्तराधुनिक कवितांना नपुंसक निर्बुद्धांच्या आस्वादक नव कलावादी, आदिबंधात्मक शैलीवादी, मार्क्सवादी वगैरे रद्दी कालबाह्य मराठी समीक्षेतील अज्ञानाचे उत्पादन आज काडीच्या कामाचे नाही. त्यांना खरी गरज कृष्टिक-सांस्कृतिक समीक्षेची आहे. मात्र मी इंग्रजी कल्चरलसह बंगाली कृष्टिक मराठी सांस्कृतिक ही भाषांतरे मुद्दाम दिली. कारण (Culture a Civilization) या दोन्हींचे भाषांतर गतशतकारंभी संस्कृती असे केतकर-राजवाडे यांनी वैदिकच केले. ते जातियीकरणाने केलेले विरुपितच नव्हे, तर विषारी भाषांतर आहे. याचा शोध मला सांस्कृतिक मीमांसा समाज संस्कृती आणि साहित्य हा तीन खंडी बृहदप्रकल्प पूर्ण करताना लागला.
Culture शब्दाची ग्रीक लॅटिन व्युत्पत्ती (Cultivate and Develop) नांगराने मशागत करीत पृथ्वीवर अॅटमबॉम्बपर्यतच्या विकसित केलेल्या सर्व रचना म्हणजे कृष्टी. जंतू कल्चर (Work Culture) चे भाषांतर कामसंस्कृती केले, तर वात्सायनाला आसन ट्यूशन शिक्षक म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्यात नेमावे लागेल. मला या शब्दाच्या दोनशे व्याख्या सापडल्या. तेव्हा खात्री पटली जातश्रेष्ठत्व गंडातूनच पुरोहिती धर्माचा धंदा सोळा संस्कारांच्या बेड्यात वाढवणारे कन्यादान, पदवीदान, मतदानसारखेच हे भाषांतर विषारीच केले आहे. हे धैर्याने उघड करून इंग्लडमधील उच्चभ्रू संस्कृती रक्षकांना डोक्यावर उभे करणारा वेल्समधील काळ्या पर्वतातील पॉण्डी खेड्यातील अल्पभूधारक शेतकऱ्याचा रेमण्ड विल्यम्स मराठीत जन्मलेला नाही. त्याने कृष्टिक कल्चर उच्च-नीच नसते, ती सर्वसाधारण असते, हे सिद्ध केले. जगण्याचा समग्र मार्ग म्हणजे कृष्टी – Culture. ही त्याची व्याख्या उच्चभ्रूना बौद्धिक षंढ ठरवणारी होती. त्याने (Culture and Society 1958) मध्ये लिहिले. ते लगेच श्रीलंकेच्या अभ्यासक्रमात नेमले. भारतात का नाही? त्याने (Culture key Words) शब्दकोशच नव्हे, तर एका शब्दावर डझनभर पुस्तके लिहिली. तो जगभर (Cultue Study) (आपल्या संस्कृतीचा अभ्यास नव्हे) चा पितामह मानला जातो. इंग्रजीतील त्या दोन संज्ञा अपूर्ण पडतात म्हणून तिसरा शब्द ते शोधत आहेत.
आपण उदात्त भाषा आणि मराठी साहित्याच्या कचरा गाडीतील समृद्ध अडगळीचे वाहक. साहित्यकृती आधी जन्मते. ती रूढ समीक्षा प्रकारांना मोडीत काढणारी असेल तर उत्तराधुनिक, उत्तरवासाहतिक स्टायलो मीटरच्या इलेक्ट्रॉनिक युगात समीक्षा प्रकार व त्यांची परिभाषा बदलावीच लागेल, परंतु इम्यॅन्युएल कांटचा अज्ञानाच्या उत्पादनाचा सिद्धांत पुरोहित वर्चस्वात मराठीत ठेवायचा असेल तर अज्ञानाचे उत्पादन वर्चस्व टिकवण्यासाठी करावेच लागते, आलाच नाही. त्याच्या मते, लोक-लोकसमूह-प्रदेश-देश गुलामीत मुठीत तसे ते होतच असते. याची जाणीव ‘संस्कृतीचे उभे गज’, ‘वैचारिक दारिद्र्य’, ‘भरीव अंधश्रद्धा’, ‘भिंग फुटलेल्या लोकशाहीच्या दुर्बिणीतून’ अशा संग्रहातील अनेक कविता करून देतात. तसेच Culture चे कृष्टी हे भाषांतर शेतकरी राजा तुकोबाच्या भाषेत मूर्ख पंडितपेक्षा श्रेष्ठ ठरवणारे आहे, पण त्याचा नांगरगट्ट्या बामणाच्या घरी लिवणं, कुणबाच्या घरी दाणं, महाराच्या घरी तमाशातलं गाणं या पुरोहितांनीच तुरुंग (सुमंत मुरंजन) बनवलेल्या भारतातील पारंपरिक रचनांना हा कवी सुरुंग लावतो.
क्षात्र धर्माचा हा रचनात्मक जागर मराठी कवितेत प्रथमच मांडला आहे. गतशतकात आधुनिकतावादाच्या झुली पांघरलेले बहुजन लांडगे सिंहाची उसनी आयाळे मिरवत पुरस्कारोत्सुक झुंडीत घुसत असत. तेव्हा मार्क्सवादी मजूर कवी नारायण सूयांनी इशारा दिला होता, ‘सारस्वतांनो सावध व्हा, माझ्या हाती तलवार आहे.’ दुसरा अफजलखान महंमदशाहीचा कोथळा फोडून मराठ्यांच्या तलवारी गंजल्याचे घोरपड्यांनी ओळखले असावे. एरवी अफजलखान ही पदवी आहे आणि पहिला जमीर पदवीधर होता, याचा उल्लेख मराठी पुराणेतिहासात कुठेच का नाही. तरी दादू कोंडा कुलकर्णी या शिवाजीच्या लादलेल्या गुरूचा हात घोरपडे बंधूनीच तोडला होता. धनाजीरावांनी ‘इतिहास’ ही वेगळी कविता रचली आहे. आम्हाला खोटा धडा शिकवला. तो शहाजी राजांच्या परवानगीशिवाय त्यांच्या बागेतला आंबा तोडला म्हणून स्वामीनिष्ठ दादाजी कोंडदेवने स्वतःचा हात तोडला आणि कातडी मोज्याने झाकला. म्हणूनच धनाजीराव ‘लेखनीच टिकाव करावं’ मध्ये शेवटी जगभराच्या कृषी रचनांच्या विशाल अर्थाच्या आंतरसंहिताच जाग्या करतात. मात्र, त्यासाठी वाचकाकडे तेवढे वाङ्मयीन प्रभुत्व असले पाहिजे. उत्तराधुनिकतावादी साहित्याच्या खोट्या नकली दिव्य-भव्य व्याख्या ठोकरताना म्हणतो, साहित्य म्हणजे सागर किनाऱ्यावरची चिमूटभर वाळू आहे. कृष्टी-कल्चर-संस्कृती म्हणजे विशाल महासागर आहे. म्हणूनच या कवीचा लेखणीचा टिकाव जिजाबाईंनी शिवबाच्या हाती दिलेल्या सोन्याचा नांगर, गौतम बुद्धाचे पिताजी स्वतः शेतकऱ्याच्या नांगराच्या फाळाच्या टोकाला सोन्याचे टोपण घालून समारंभपूर्वक नांगरट करणारे शुद्धोधन आणि युरोपात हंगामात साम्राज्य सोडून महिनाभर स्वतः राबणारा सम्राट अशा संरचना उकरून काढतो.
…. खणून काढावा संदर्भाचा भूप्रदेश
गुंजभर सोन्यासाठी स्मशानातील राख चाळत बसावी रात्ररात्रभर
असंच काही कवी लेखकांचंही ‘
या सर्वच कविता आजवरच्या नपुंसक बुद्धिमंतांच्या आधुनिकतावादी टोळ्यांनी लिहिलेल्या ‘मर्ढेकरांची प्रतिमासृष्टी’, ‘जी. ए. कुलकर्णीची प्रतिमासृष्टी’ अशा अज्ञानाच्या उत्पादनात बसणाऱ्या नाहीत. हे प्रतिमा विज्ञानसारखे युरोमेरिकन अभ्यासक्रम मराठीत आले तरच कळेल. कारण कवीला स्वप्नात कविता भेटते- सुचते (वर्डस्वर्थ बोरकर) प्रतिभावंत व्युत्पन्न कवी अशा मिथकांवर उत्तराधुनिक विज्ञानवादी विश्वास ठेवत नाहीत. प्रतिमा व प्रतीके वास्तव राजकारणात जन्मतात. त्या घडवणे किंवा बिघडवण्याचे राजकारण जगभर चिरंतन आहे. अशा ज्योप लीर्सनच्या संकल्पना व सिद्धांत भारतीय वाचकांच्या डोक्यावरून जातात. उत्तराधुनिकतेत कृत्रिम प्रतिमा व प्रतीकांची रास रचणे ‘बालिश’ समजले जाते. उत्तरवासहतिक समीक्षेची मराठी वाचकांची निरक्षरता बालिश शब्द बदनामीकारक अर्थाकडे नेते. परंतु वास्तवातला सिद्धांत असा आहे की, साम्राज्यवादी गुलामांना सदैव बालबुद्धीचे, स्त्रैण, बायकी निकम्मेच समजत. या मानसिक गुलामगिरीची जाणीव स्वतंत्र देशातील घरचे साम्राज्यवादी लवकर सहजासहजी निर्माण होऊ देत नाहीत म्हणून तुमच्या गुलामीच्या पायात परदेशी व देशी लोकांच्या वाटा तपासण्याचा आग्रह वाढला आहे. अर्थात, तो इंग्रजीत सडवलेल्या मागास मराठीत नव्हे.
या कवीची प्रवृत्ती प्रतिमा-प्रतीकांची रास अथवा बोगस अलंकारिक सजावटीवर भर देणारी नाही. एका चिनी तुलनाकाराचा ‘रूपक’ या एका शब्दावरचा निबंध आम्ही ‘संगम’ जगभरच्या तुलनात्मक साहित्य व सांस्कृतिक अभ्यासातील निबंध (संपा. मनीषा पाटील) मध्ये छापला आहे. त्याचा निष्कर्ष मराठीतील लेखकांच्या अनेक पिढ्या गारद करणारा आहे. त्याच्या मते, रूपकासारख्या अलंकारांच्या सजावटीआड सडलेली प्रेते लपवलेली असतात. ‘कविता म्हणजे’ या कवितेत धनाजी घोरपडे शेवटी निखळ सत्य सांगतात.
‘तिथं अक्षरं दिसत नसतात फक्त गर्दी करून उभ्या असतात अर्थांच्या अनेक शक्यता’ ‘शीर्षक’ कवितेत काळा घोडा सत्ताधीश नेत्याच्या रूपात भेटतो, पण हे सजवलेलं अलंकारिक कृत्रिम रूपक बनत नाही. त्यात समकालीन राजकारणातील उपरोधी संदर्भ सहजपणे येतात. ‘सत्तेच्या बुलडोझरखाली चेपलेली माणसं मांडू शकत नाहीत त्याच्या विरोधात कुठलंच अभिव्यक्तीचं मत’
‘सुई दोऱ्याचं विधेयक’, ‘ज्योत मालवू शकतात’, ‘रंडकी अवस्था’, कागदातला गांधी दिसावा म्हणून’, ‘तू होतोस नपुंसक’, ‘नमामि गंगा’, पुरुषार्थ’, ‘भिंग फुटलेल्या लोकशाहीच्या दुर्बिणीतून’, ‘लोकशाहीचं काळं घुबड’, ‘संसदीय गौडबंगाल’, ‘फक्त नोंद घेतली जात नाही’, ‘विंचरायची आहेत माणसं’ अशा अनेक कविता हे २०२४ नंतरच्या भारतातील बामण- बनिया मनुवादी राज उर्फ नव हिटलरवादापुढे शेताच्या बांधावरच्या उच्चशिक्षित साहसवीर घोरपडेंनी धरलेले आरसे आहेत. परंतु चालू शतकात प्रसारमाध्यमे नव हुकूमशहाने बनियामार्फत विकत घेतली.
कधीकाळी पी. बी. शेलीने कवीला ‘अनभिषिक्त सम्राट’ म्हटले होते. त्यांना चालू शतकात भारतात षंढ गुलाम केले. अभिव्यक्तीची मुस्कटदाबी वाढत असता, गुजराती कवयित्रीने कोरोना महामारीच्या काळात पवित्र गंगा नदीत तरंगणाऱ्या प्रेतावरच उपरोधी कविता छापली. ती भारतभर गाजली. तिचा छळ झाल्याच्या बातम्या भारतभर झळकल्या. पुढच्यास ठेच मागचा सावध. आधीच नपुंसक – बुद्धिमंत. हिजड्यांच्या बाजारात बत्ताशांचा पाऊस पाडणंच बरं? अशा नववासाहतिक विपरीत दशकात बहादुरवाडीचा धनाजी धोंडीराम घोरपडे ‘तांडव नृत्य’ करतो. ‘सूर्य होण्याच्या भानगडीत पडतो. ‘गेल ऑम्वेटचं शिवार दाखवतो’, ‘रंडकी अवस्था’ चौकात मांडतो. ‘शुक्राणूंच अधिवेशन’ भरवतो. ‘गर्भाशयाची पिशवी काढतो’, ‘बाप दुसऱ्या लिपीत’ असल्याचे दाखवतो. खेकडा पकडतो. कळस म्हणजे गुजराती विद्रोही कवयित्रीप्रमाणेच नमो गंगा लिहिण्याचा क्षात्रधर्म पाळतो. हा शिवशाहीतील विद्रोही तुकारामबांबांचा खरा पाईक आहे त्याचा हा काळा घोडा शर्यतीचा आहे. तो अतुलनीयच आहे. म्हणूनच अभिनंदनास पात्र आहे.
विशेष म्हणजे नवनीतिवादाचे ढोंग करीत अनीतिवादी वर्तन, दलालीचे उदासबोधाचें सोंग, देशीवादाचे नृत्य, नवता आणि परंपरा एफ. आर. लेव्हिस व टी. एस. इलियटच्या कोटातून चोरून मुखवटा मात्र मार्क्सवादाचा, आयसीएसच्या अभ्याक्रमातील निबंधातील मुख्य मुद्दयांचे भाषांतर म्हणजे मराठी युगप्रवर्तक सौंदर्यशास्त्र रचणारा वसाहतवादाचा वाहक. अशा मराठी कवींच्या परेडमध्ये या तुकोबाच्या पाईकाला कदाचित जागा नसेल, परंतु हा कवी ‘पुरस्कारपायचाटू’ झुंडीत मिसळताना दिसत नाही. तो ‘जिथं माणूस माणसाला ओळखू शकेल’ अशा जागेच्या शोधात आहे. ही कविता वाचताना थॉमस हार्डीच्या ‘न जन्मलेल्या बाळास’ या कवितेची आठवण येते. जिथे युद्ध, जात, पंथ, धर्म, संघर्ष, दारिद्र्य व दुःख नसेल असा एखादा जमिनीचा तुकडा शोधतो. मगच तू जन्म घे, असे कवी बाळाला विनवतो.
धनाजी घोरपड्यांच्या कवी म्हणून, व्यक्तिमत्व व भूमिकेवर प्रकाश टाकणाऱ्या सहा कविता आहेत.. त्यांची बांधिलकी गट, तट, विचारधारणा अथवा विशिष्ट राजकारणाशी नाही. साहित्यनिर्मिती हेच एक राजकारणच असते. सर्वात मोठं खोटं कौशल्यानं पटवणं म्हणजे साहित्य. ही व्याख्या राजकारणात भाग घेणाऱ्या नोबेल पुरस्कार विजेता लॅटिन अमेरिकन गॅब्रिएल गार्सिया माक्किर्झची आहे. प्रख्यात कादंबरीकार जुजे सारामागोला पुरस्कार देऊच नये म्हणून नोबेल निवड समितीला पत्रं लिहिणारा पोर्तुगालचा पंतप्रधान होता. के. के. रुथवेनने हे साहित्याचे राजकारण वर्गात शिकवण्याचा आग्रह धरला आहे.
घोरपडे ‘सत्वशोध’ घेणारा साधा सरळ छक्केपंजे माहीत नसलेल्या शेतकरी वर्गातील. हेच जगद्गुरू तुकारामबाबांच्या जातकुळीशी त्यांचे घट्ट नाते आहे. ‘बरां झालो कुणबी केलो नाहीतर दंभे मेलो असतो’ हा त्या थोर संतांचा क्षात्रधर्म होता. तसाच हा कवी छातीठोकपणे ‘संपत नाही माझी कविता’मध्ये त्याची खरी जाणीव बेधडकपणे व्यक्त करण्याची हमी देतो.
*… जोपर्यंत येत नाही कवितेत
तोपर्यंत तरी संपत नाही
माझी कविता’
ती अशीच बहरत राहो हीच सदिच्छा.
पुस्तकाचे नाव – जामिनावर सुटलेला काळा घोडा
कवी – धनाजी धोंडीराम घोरपडे
प्रकाशक – ललित पब्लिकेशन, मुंबई मोबाईल – 9869377806
किंमत – २०० रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.

1 review
bBVyFOWPrQ
RDDOSBJTELBYtN