स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र प्रवेश परीक्षा सूचना सन 2024-25
कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश परीक्षा अर्ज मागविण्यात येत आहेत, अशी माहिती प्रा.डॉ. जगन कराडे यांनी दिली आहे.
पदवीप्राप्त झालेल्या आणि शिवाजी विद्यापिठामध्ये विविध विभागामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विदयार्थ्यांना विद्यापीठ अनुदान आयोग, यु.जी.सी. नवी दिल्ली योजनेअंतर्गत एस.सी, एस.टी, ओबीसी, ई.डब्ल्यू.एस (नॉन क्रिमीलेयर) व अल्पसंख्याक (मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, आणि जैन) आणि खुल्या गटातील विदयार्थ्याकरिता शिवाजी विद्यापीठ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश परीक्षा अर्ज करता येणार आहे.
हा अर्ज व परीक्षा सूचना शिवाजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (www.unishivaji.ac.in) युजीसी सेंटर फॉर कोचिंग फॉर कॉम्पेटिटिव्ह एक्झामिनेशन येथे व केंद्राच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. 22 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट 2024 पर्यन्त प्रवेश अर्ज आवश्यक कागदपत्रासहित केंद्राच्या कार्यालयात सकाळी 10.20 ते सायं 6.00 या कालावधीमध्ये जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवेश परीक्षा 31 ऑगस्ट 2024 रोजी सायं 3.00 ते 4.30 या वेळेत ऑफलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, मानव्यशास्त्र इमारत, शिवाजी विद्यापीठ येथे घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी 0231-2609371 या क्रमांकावर संपर्क साधावा.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.